दिग्रस व आर्णी मतदार संघात निवडणूक निरिक्षकांनी केली खर्चाची तपासणी



यवतमाळ, दि. 15 : जिल्ह्यातील 79 –दिग्रस व 80 – आर्णी विधानसभा मतदार संघाचे निवडणूक खर्च निरिक्षक मुकुंद कुमार यांनी पांढरकवडा येथील निवडणू‍क निर्णय अधिकारी कार्यालयात उमेदवारांच्या खर्चाबाबत दुसरी तपासणी केली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. आर. जी. पुरी, तहसिलदार धीरज स्थुल, नायब तहसिलदार रविंद्र कापसीकर आदी उपस्थित होते.
खर्च निरिक्षकांद्वारे मागील तपासणीदरम्यान ज्या उमेदवारांना नोटीस पाठविण्यात आल्या होत्या, त्या उमेदवारांचे खुलासे प्राप्त न झाल्यामुळे सदर उमेदवारांविरुध्द निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उचित कारवाई करावी, असे निर्देश खर्च निरिक्षकांनी दिले. फ्लाईंग्स स्कॉड, एसएसटी, एफएसटीने विविध परवान्यांबाबत सक्त पडताळणी करावी. तसेच गावागावात लावण्यात येणारे फ्लेक्स, होर्डिग्स इत्यादीबाबत उमेदवारांनी आवश्यक त्या सर्व परवानग्या घ्याव्यात. वाहन प्रदुषणाचा त्रास सामान्य माणसांना होणार नाही याची काळजी उमेदवारांनी घ्यावी. जे उमेदवार आपला दैनंदिन खर्चाचा अहवाल निवडणूक विभागास सादर करणार नाही अशा उमेदवारांविरुध्द कलम – 171 (1) नुसार कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या तपासणीदरम्यान 11 उमेदवारांपैकी 8 उमेदवारांचे प्रतिनिधी अनुषंगीक दत्तऐवजांसह उपस्थित होते. तर कृष्णा तुकाराम आडे, राहुल सुभाष सोयाम आणि सोनेराव लखुजी कोटनाके  हे उमेदवार प्रत्यक्ष किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित नसल्यामुळे या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटीस द्यावी, असे निर्देश खर्च निरिक्षकांनी दिले. 24 तासात नोटीसचे उत्तर न देणाऱ्या उमेदवारांविरुध्द निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे योग्य ती कारवाई करण्यात येईल. सर्व उमेदवारांनी आपला दैनंदिन खर्च तपासणी पथकास सादर करावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी खर्च पथकाचा कामाचा आढावा घेण्यात आला.
बैठकीला संपर्क अधिकारी योगेश क्षिरसागर, सहाय्यक खर्च निरिक्षक बाबाराव काळपांडे, पथक प्रमुख राजीव रंजन, मुकुंदा सलाम, ओमप्रकाश गौरकार, मंगेश पांगारकर, अरूण लखमापूरे, मिनल भडंगे, राजेश आढाव, निलेश नारनवरे, प्रमोद पुरी, दिनेश दाताळकर, राम हंसकर यांच्यासह खर्च पथकाचे प्रतिनिधी, उमेदवारांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी