राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी यवतमाळकरांची एकता दौड







v कलेक्टर एसपींसह नागरिकांचा सहभाग
यवतमाळ, दि. 31 : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने एकता दौड आयोजित करण्यात आली. पोलिस मुख्यालयातून सुरू झालेल्या ‘रन फॉर युनिटी’ मध्ये जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांच्यासह अधिकारी, विद्यार्थी, युवक, युवती व नागरिकांनी सहभाग नोंदविला.
सुरवातीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दीप प्रज्वलन करून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळी जिल्हाधिका-यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. हिरवी झेंडी दाखविल्यानंतर उपस्थित सर्व अधिकारी व नागरीक एकता दौडमध्ये सहभागी झाले. पोलिस मुख्यालयातून निघालेली ही दौड बसस्टँड मार्गे एलआयसी चौक, पोलिस अधिक्षक कार्यालय, नगर परिषद मार्गाने गेल्यानंतर पोलिस मुख्यालयात समारोप करण्यात आला.
एकता दौडमध्ये उपजिल्हाधिकारी सविता चौधर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर, पोलिस उपअधिक्षक (गृह) एम.एम.बागवान, उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बाविस्कर, इयत्ता दुसरीमध्ये असलेली सिया धिरेंद्रसिंग बिसवाल (वय 7 वर्षे) यांच्यासह जिल्हा पोलिस दल, ॲथलेटिक्स संघटना, वेट लिफ्टिंग संघटना, मास्टर फेडरेशन, पोलिस बॉईज, जिल्हा होमगार्ड तसेच नागरिकांनी सहभाग घेतला.


जिल्हाधिकारी कार्यालयात सरदार पटेलांना अभिवादन
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, उपजिल्हाधिकारी सविता चौधर, जिल्हा खनीकर्म अधिकारी राजेंद्र गोसावी आदी उपस्थित होते.


०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी