निवडणूक निरीक्षकांनी घेतली नोडल अधिका-यांची बैठक




v आयोगाच्या सुचनांवर अंमल करण्याचे निर्देश
यवतमाळ दि. 9 : विधानसभेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी निवडणुकीच्या कामकाजासंदर्भात नोडल अधिका-यांची बैठक घेतली. या बैठकीला निवडणूक निरीक्षक सुशीलकुमार मौर्य, पी. विजयन, आशिष सक्सेना आणि जे. आर. डोडीया उपस्थित होते.
निवडणुकीच्या कामाकरीता सेवा घेण्यात आलेल्या कर्मचा-यांना आठ ते दहा तास काम द्यावे. शिफ्टनुसार त्यांच्याकडून काम करून घेऊन एकाच व्यक्तीवर जास्त ताण येणार नाही, यादी दक्षता घ्या, असे आशिष सक्सेना यांनी सांगितले. पुढ बोलतांना ते म्हणाले, विविध पथकांद्वारे तपासणी नाक्यांवर कारव्यतिरिक्त मोठ्या ट्रकचीसुध्दा तपासणी करा. आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या प्रकरणांसाठी विधानसभा क्षेत्रनिहाय एक वेगळी टीम गठीत करा. निवडणुकीची टक्केवारी वाढविण्यासाठी ध्येय निश्चित करून त्याचे सुक्ष्म नियोजन करा. महिला, पुरुष, तरुण – तरुणी, कामगार, शेतकरी आदी घटकांमध्ये मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी बुथ जनजागृती ग्रुप तयार करा.
जे दिव्यांग मतदार घरातून बाहेर पडू शकत नाही, त्यांच्यापर्यंत पोहचणे प्रशासनाचे काम आहे. अशा दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करून त्यांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन या. लहान मुलांसोबत मतदार आले तर त्यांच्या खेळण्याचे नियोजन किंवा त्यांना बसण्याकरीता वेगळी व्यवस्था करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. व्होटर स्लीप केवळ बीएलओच्या माध्यमातूनच नाही तर त्या त्या परिसरातील अंगणवाडीसेविका, आशा स्वयंसेविका व इतर कर्मचा-यांच्या माध्यमातून वाटप करा. एसएसटी, व्हीएसटी, एफएसटी या पथकांच्या जागा नियमित बदलविणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी इतरही निवडणूक निरीक्षकांनी संबंधितांना सुचना दिल्या. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी सविता चौधर, माहिती व सुचना अधिकारी राजेश देवते, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लीकर, योगेश लाखानी आदी उपस्थित होते.
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी