Posts

Showing posts from May, 2017
Image
डिसेंबर 2018 अखेर राज्यातील सर्व शाळा होणार डिजिटल ‘ मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती ·          शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र 18 वरुन तिसऱ्या क्रमांकावर ·          ग्रामीण भागातील 44 हजार शाळा झाल्या डिजिटल ·          राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक प्रतिपूर्ती योजनेचा विद्यार्थ्यांना मिळणार लाभ ·          50 हजार शिक्षक ‘टेकसॅव्ही’ यवतमाळ, दि. 21 : शालेय शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानामुळे राज्यातील शाळा डिजिटल करण्यात येत असून डिसेंबर 2018 पर्यंत राज्यातील सर्व शाळा डिजिटल होतील आणि त्यातून विद्यार्थ्यांना या अभियानांतर्गत आनंददायी , गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल , असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील युवा पिढीशी संवाद साधला. या कार्यक्रमाच्या प्रसारित झालेल्या पहिल्या भागात मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की , यश आणि त्यातून वि