Posts

Showing posts from July, 2018

पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेत चार रुग्णालयांचा नव्याने समावेश

v जिल्हयातील रूग्णांना दिलासा v योजनेतील हॉस्पीटलची संख्या 13 यवतमाळ, दि. 30 : सामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी राज्य शासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील नऊ रुग्णालयांचा समावेश होता. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्या पाठपुराव्यामुळे आता या योजनेत जिल्ह्यातील चार रुग्णालयांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी आग्रही असलेले पालकमंत्री मदन येरावार यांच्या पाठपुराव्यामुळे शहरातील महात्मा फुले जनआरोग्य योजनेत कॉटनसिटी मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पीटल अॅंड रिसर्च सेंटर, चिंतामणी हॉस्पीटल, संजीवन मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पीटल अॅंड रिसर्च इन्स्टीटयूट आणि श्री दत्त हार्ट हॉस्पीटल यांचा समावेश करण्यात आला आहे. या चार रुग्णालयाच्या समावेशमुळे सदर योजनेतील रुग्णालयांची संख्या 13 पर्यंत पोहचली आहे. त्यामुळे जिल्हयातील गोरगरीब रूग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी सदर योजनेत वसंतराव नाईक शासकीय रूग्णालय, शांती ऑर्था हॉस्पीटल, तवाडे मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पीटल, साई श्रध्दा मल

पालकमंत्र्यांच्या हस्ते सेल्फ वॉटरिंग ट्री-गार्ड सिस्टीम वृक्षारोपणाचा शुभारंभ

Image
      यवतमाळ,दि. 23 : राज्य शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते धामणगाव रोडवरील टिंबर भवन येथे सेल्फ वॉटरिंग ट्री-गार्ड सिस्टीम वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी न.प.आरोग्य सभापती दिनेश चिंडाले, सुजीत रॉय, नगरसेविका कीर्ति राऊत, साधना काळे, मंदा जिरापूरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मारपल्लीकर, लाखाणी, राजू पडगीलवार आदी उपस्थित होते.             वृक्ष लागवड मोहीम लोकसहभागामुळे गतिमान झाली, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, यावर्षी राज्य शासनाने वृक्षलागवडीचे 13 कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. कालपर्यंत 11 कोटींचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. शहराच्या विकासासाठी 250 ते 300 कोटी रुपयांचा निधी आणला. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. रस्त्यांच्या रुंदीकरणाकरीता अनेक इंग्रजकालीन झाडे हस्तांतरीत करण्यात आली.   तर काही झाडे मृत झाली. त्यामुळे रस्त्याच्या बाजुला नवीन झाडे लावणे कंत्राटदारांना बंधनकारक केले. सेल्फ वॉटरिंग ट्री-गार्ड सिस्टीमबाबत वृक्षप्रेमी श्री टावरी यांच्याकडून सर्वप्रथम माहिती

मालमत्ता हक्कासंदर्भात सिंधी समाजाला त्वरीत पट्टे प्रदान करा - पालकमंत्री मदन येरावार

Image
                              v निर्वासित व्यक्तीच्या मालमत्तांचा धारणाधिकार ‘अ’ होणार       यवतमाळ,दि. 23 : भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी पश्चिम पाकिस्तानातून आलेल्या विस्थापितांना देण्यात आलेल्या जमिनीच्या धारणाविकाराचे पुनर्विलोकन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार कागदपत्रांची पुर्तता करणा-या सिंधी बांधवाना त्वरीत पट्टे प्रदान करा, असे निर्देश पालकमंत्री मदन येरावार यांनी प्रशासनाला दिले.             शहरातील गोधडीधाम येथे सिंधी बांधवांकरीता आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार सचिन शेजाळ, भुमी अभिलेख कार्यालयाचे उपअधिक्षक डी.आर. गोसावी, नगरसेविका रिता धावतळे, नानिकराम बगई, मनोहरलाल तुलवाणी, जगदीश आडवाणी आदी उपस्थित होते.             सिंधी बांधवांचा मालमत्ता धारणाधिकार हा विषय अनेक वर्षांपासून हा विषय प्रलंबित होता, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, राज्य शासनाने या संदर्भात 14 जून 2018 रोजी शासन निर्णय काढून या समाजाला न्याय दिला आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मुलभूत गरजा आहे. स्वातंत्र्याच्या वेळी

स्वयंसहायता समुहाने महिलांच्या आर्थिक उन्नतीचा आधार व्हावे

Image
Ø घाटंजी येथील महिलेशी पंतप्रधानांनी साधला थेट संवाद       यवतमाळ,दि.12 : देशातील लोकसंख्येचा पन्नास टक्के वाटा महिलांचा आहे. ग्रामीण भागात स्वयंसहायता बचत गटाचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. देशातील पाच कोटी महिला या समुहाशी जुळल्या आहेत. त्यामुळे स्वयंसहायता समुहाने महिलांच्या आर्थिक उन्नतीचा आधार व्हावे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत सुचना व विज्ञान केंद्रात आयोजित स्वयं सहायता बचत गटातील महिलांसोबत संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी घाटंजी तालुक्यातील कोळी (बु.) येथील रंजना वसंतराव कामडी या पशुसखीसोबत थेट संवाद साधला. महिलांना मार्गदर्शन करतांना पंतप्रधान म्हणाले, कुटुंब आणि समाजाचे कल्याण महिला शक्ती करू शकतात.   निराशा पसरविणा-यांकडे दुर्लक्ष करून चांगल्या कामातून महिलांनी आर्थिक प्रगती करावी. या यशस्वी महिलांच्या यशोगाथा चांगल्या विचारांनी ऐकूण आत्मसाद केल्यास देशाचे चित्र नक्कीच बदलेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कोळी (बु.) येथील गजानन महाराज महिला स

रद्द झालेल्या सिंचन विहिरी पूर्ण कराव्यात - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
उद्दीष्टापेक्षा 150 टक्के अधिक शेततळे पूर्ण                              * पुनर्विकासांतर्गत घरांसाठी पट्टे देणार * पोलिसांच्या घरांचा प्रश्न लवकरच निकाली नागपूर , दि . 10 : यवतमाळ जिल्ह्यात सुमारे 16 हजार सिंचन विहिरींचे बांधकाम अपेक्षित होते . यापैकी आठ हजार विहिरी पूर्ण झाल्या आहेत . उर्वरीत रद्द झालेल्या विहिरींना पुन्हा मंजुरी देऊन त्या प्राधान्याने पूर्ण करण्याची कार्यवाही करावी , असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले . आज विधानभवन येथे यवतमाळ जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला . यावेळी ते बोलत होते . बैठकीला विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे , यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार , सहपालकमंत्री संजय राठोड , आमदार सर्वश्री ख्वाजा बेग , डॉ . तानाजी सावंत , मनोहर नाईक , राजेंद्र नजरधने , डॉ . अशोक उईके , राजू तोडसाम , संजीवरेड्डी बोदकुरवार , जिल्हाधिकारी डॉ . राजेश देशमुख , मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा , जिल्हा पोलिस अधीक्षक एम . राजकुमार आदी उपस्थित होते . मुख

वृक्ष संवर्धनासाठी ‘ऑक्सीजन पार्क’ येथे श्रमदान

Image
Ø दर रविवारी होणार आयोजन यवतमाळ, दि.8 : राज्य शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत यवतमाळ शहरातील ‘ऑक्सीजन पार्क’ येथे एकाच वेळी पाच हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षांच्या संवर्धनासाठी यवतमाळकर तसेच विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. याच संकल्पनेतून रविवारी ‘ऑक्सीजन पार्क’ येथे मोठ्या संख्येने नागरिकांनी श्रमदान केले. जिल्हा प्रशासन व वनविभाग यांच्या प्रयत्नातून शहरालगत अमोलकचंद विधी महाविद्यालयासमोर 25 एकर परिसरात ‘ऑक्सीजन पार्क’ साकारण्यात आला आहे. ‘माझं यवतमाळ, माझं झाड’ या संकल्पनेनुसार 1 जुलै 2018 रोजी पालकमंत्री मदन येरावार यांच्या उपस्थितीत 13 कोटी वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. विविध संस्था, शाळा-महाविद्यालय आदींच्या प्रयत्नातून येथे एकाच वेळी पाच हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्षांच्या लागवडीसोबतच वृक्षांचे संवर्धन ही नागरिकांची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येकाने यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री मदन येरावार आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नागरिकांना केले. त्यानुसार यवतमाळचे उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे यां

‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ योजनेंतर्गत 11 लक्ष घनमीटर गाळाचा उपसा

Image
v पाच हजार हेक्टर शेतजमिनीवर टाकला गाळ v शेतक-यांचे उत्पन्न वाढण्यास मदत यवतमाळ, दि.5 : शासनाच्या ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 101 लघु व मध्यम प्रकल्पातून अंदाजित 11 लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. धरणातून काढण्यात आलेला हा गाळ 2 हजार 54 शेतक-यांनी 5 हजार हेक्टरवर शेतजमिनीवर टाकल्याने शेतक-यांचे उत्पन्न वाढीस मदत होईल. जिल्हयात असलेल्या तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचून साठवण क्षमतेत घट झाली होती. त्यातच मागील वर्षी जिल्हयात अत्यल्प झालेल्या पावसामुळे धरणामध्ये अत्यंत कमी पाणीसाठा होता. बहुतांश धरणे जानेवारी – फेब्रुवारी पासून कोरडी होण्यास सुरूवात झाली. यावर्षीच्या पावसाळ्यात या धरणांमध्ये जास्तीत जास्त पाणी साठविल्यास त्याचा फायदा पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीलासुध्दा होईल, या उद्देशाने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ योजनेला गती दिली. यासंदर्भात जिल्हाधिका-यांनी जलसंधारण विभाग व अशासकीय संस्थाच्या नियमित बैठका घेतल्या. जिल्हयामध्ये एकूण 101 लघु व मध्यम प्रकल्प, पाझर तलाव आहेत. यातून अंदाजित 11 ल