रोज 25 कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवा - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख


जिल्हाधिकारी कार्यालयात बँक अधिका-यांची आढावा बैठक
यवतमाळदि. 30 : खरीप हंगामात शेतक-यांना कर्ज वाटपासाठी सर्व शासकीय यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत. आता बँकेच्या कर्मचा-यांनी लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. रोज 25 कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे बँकांनी उद्दिष्ट ठेवावे, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात बँक अधिका-यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अग्रणी बँक व्यवस्थापक विजय भगत, सहकारी संस्थेच्या सहायक निबंधक अर्चना माळवे, नाबार्डचे दीपक पेंदाम आदी उपस्थित होते.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने गावस्तरावर कर्जवाटप पालक अधिकारी नेमण्यात आले आहेत, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, कर्जवाटपाची गती वाढविण्यावर बँकांनी भर द्यावा. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून नियमित दहा कोटी रुपयांचे कर्ज वाटप होणे गरजेचे आहे. कर्ज देणा-या विविध महामंडळांचे ज्या बँकेत कर्ज प्रकरणे थकीत आहेत, अशा बँकांकडे महामंडळांच्या व्यवस्थापकांनी नियमित पाठपुरावा करावा. ज्या होतकरू नागरिकांना व्यवसायाकरीता कर्ज आवश्यक आहे, अशी महत्वाची प्रकरणे बँकांच्या निदर्शनास आणून द्यावी. लोकांना व्यावसायिकदृष्ट्या उभे करण्यासाठी बँकांनी आणि महामंडळांच्या व्यवस्थापकांनी समन्वयातून काम करावे. तसेच महामंडळांच्या अधिकारी-कर्मचा-यांनी लाभार्थ्यांच्या भेटी घेऊन त्यांना मार्गदर्शन करावे. कर्ज वाटपाबाबत सर्वांचा उद्देश सारखा आहे, त्यासाठी मोठे व्हीजन समोर ठेवून काम करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.
यावेळी त्यांनी प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, अटल पेंन्शन योजना, मुद्रा बँक योजनेची अंमलबजावणी तसेच पीक कर्ज वाटपाची प्रगती, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आदींचा आढावा घेतला.
बैठकीला विविध बँकाचे प्रतिनिधी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी