पालकमंत्र्यांच्या हस्ते सेल्फ वॉटरिंग ट्री-गार्ड सिस्टीम वृक्षारोपणाचा शुभारंभ




      यवतमाळ,दि. 23 : राज्य शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते धामणगाव रोडवरील टिंबर भवन येथे सेल्फ वॉटरिंग ट्री-गार्ड सिस्टीम वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी न.प.आरोग्य सभापती दिनेश चिंडाले, सुजीत रॉय, नगरसेविका कीर्ति राऊत, साधना काळे, मंदा जिरापूरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मारपल्लीकर, लाखाणी, राजू पडगीलवार आदी उपस्थित होते.
            वृक्ष लागवड मोहीम लोकसहभागामुळे गतिमान झाली, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, यावर्षी राज्य शासनाने वृक्षलागवडीचे 13 कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. कालपर्यंत 11 कोटींचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. शहराच्या विकासासाठी 250 ते 300 कोटी रुपयांचा निधी आणला. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. रस्त्यांच्या रुंदीकरणाकरीता अनेक इंग्रजकालीन झाडे हस्तांतरीत करण्यात आली.  तर काही झाडे मृत झाली. त्यामुळे रस्त्याच्या बाजुला नवीन झाडे लावणे कंत्राटदारांना बंधनकारक केले. सेल्फ वॉटरिंग ट्री-गार्ड सिस्टीमबाबत वृक्षप्रेमी श्री टावरी यांच्याकडून सर्वप्रथम माहिती मिळाली. वृक्षारोपणाच्या या नवीन तंत्रज्ञानामुळे झाडाला 15 दिवसातून एकदाच पाणी द्यावे लागते. विशेष म्हणजे ठिबकद्वारे हे सर्व पाणी झाडाच्या मुळापर्यंत जात असल्याने शहरात एकूण तीन हजार झाडे या नवीन तंत्रज्ञानाद्वारे लावण्याचे नियोजन आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
            या तंत्रज्ञानानुसार  सदर झाडे एक वर्षापर्यंत वाढविण्याची जबाबदारी श्री. टावरी यांच्याकडे असली तरी ज्यांनी झाडांच्या सावल्या बघितल्या त्यांनी भावी पिढीसाठी वृक्षसंवर्धन करावे. आपले यवतमाळ, हिरवे यवतमाळ करीता सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
            कार्यक्रमाचे संचालन राजू पडगीलवार यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
00000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी