स्वयंसहायता समुहाने महिलांच्या आर्थिक उन्नतीचा आधार व्हावे



Ø घाटंजी येथील महिलेशी पंतप्रधानांनी साधला थेट संवाद
      यवतमाळ,दि.12 : देशातील लोकसंख्येचा पन्नास टक्के वाटा महिलांचा आहे. ग्रामीण भागात स्वयंसहायता बचत गटाचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. देशातील पाच कोटी महिला या समुहाशी जुळल्या आहेत. त्यामुळे स्वयंसहायता समुहाने महिलांच्या आर्थिक उन्नतीचा आधार व्हावे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत सुचना व विज्ञान केंद्रात आयोजित स्वयं सहायता बचत गटातील महिलांसोबत संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी घाटंजी तालुक्यातील कोळी (बु.) येथील रंजना वसंतराव कामडी या पशुसखीसोबत थेट संवाद साधला. महिलांना मार्गदर्शन करतांना पंतप्रधान म्हणाले, कुटुंब आणि समाजाचे कल्याण महिला शक्ती करू शकतात.  निराशा पसरविणा-यांकडे दुर्लक्ष करून चांगल्या कामातून महिलांनी आर्थिक प्रगती करावी. या यशस्वी महिलांच्या यशोगाथा चांगल्या विचारांनी ऐकूण आत्मसाद केल्यास देशाचे चित्र नक्कीच बदलेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
कोळी (बु.) येथील गजानन महाराज महिला स्वयं सहायता गटाच्या सदस्या असलेल्या रंजना यांनी शेती व शेळीपालन या व्यवसायासोबतच पशुसखी म्हणून काम करतांनाचे अनुभव आणि त्यातून साधलेली आर्थिक प्रगती याबाबत पंतप्रधानांना माहिती दिली. बकरीच्या माध्यमातून एवढा मोठा व्यवसाय होऊ शकतो, ही नवीन माहिती मिळाल्याचे पंतप्रधानांनी म्हटले. तसेच बकरीला आजार झाल्यास कोणते उपचार करावेत हे देखील पंतप्रधानांनी रंजना यांच्याकडून जाणून घेतले. यावेळी सुचना व विज्ञान केंद्रात मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी