Posts

Showing posts from July, 2020

यवतमाळ, दारव्हा,पांढरकवडा, नेर, पुसद व दिग्रस येथील संचारबंदी कायम

यवतमाळ, दि. 31 : यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, दारव्हा,पांढरकवडा, नेर, पुसद, दिग्रस शहरात व या शहरालगतच्या परिसरात 31 जुलैपर्यंत लागू करण्यात आलेली संचारबंदी पुढील आदेशापर्यंत वाढविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी वरील आदेश निर्गमित केले आहे.             संचारबंदीच्या कालावधीत पुढील बाबींना मुभा देण्यात आली आहे. भाजीपाला व फळे गल्ली, कॉलनी, सोसायटीमध्ये जाऊन विक्री करण्यास सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत मुभा राहील. एका ठिकाणी बसून विक्री करता येणार नाही. दुध संकलन व दुध विक्रीला सकाळी 7 ते सकाळी 10 वाजेपर्यंत मुभा राहील. तसेच फिरते दुध विक्री या बाबीस सायंकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत मुभा राहील. पेट्रोल, डिझेल पंप सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तसेच अत्यावश्यक सेवेकरिता 24 तास सुरू राहील.   कृषी साहित्याची, रासायनिक खत विक्री, बि-बियाणे विक्री व त्यांची गोदामे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजतापर्यंत सुरू राहील. स्वस्त धान्य दुकाने सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील.   यवतमाळ, दारव्हा,पांढरकवडा, नेर, पुसद व दिग्रस शहरातील व शहरालगतच्या भागातील सर्व बँका ग्राहकांसाठी सकाळ

जिल्ह्यात 121 पॉझेटिव्ह रुग्णांची भर ; 31 जणांना सुट्टी

Ø पुसद   50, दिग्रस 44, पांढरकवडा 20, यवतमाळ   6 तर दारव्हामध्ये 1 यवतमाळ, दि. 31 : जिल्ह्यात आतापर्यंत दुहेरी अंकात वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शुक्रवारी अचानाक तीन अंकात वाढली. ही आतापर्यंत एका दिवसात झालेली सर्वात मोठी वाढ आहे. आज (दि.31) रोजी जिल्ह्यात तब्बल 121 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने   जिल्ह्यात हजारचा आकडा पार केला आहे. तर आयसोलेशन वॉर्ड आणि विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 31 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आज नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 121 जणांमध्ये 66 पुरुष व 55 महिलांचा समावेश आहे. यात सर्वाधिक 50 रुग्ण पुसदचे, 44 रुग्ण दिग्रसचे, पांढरकवडा येथील 20 रुग्ण, यवतमाळचे सहा तर एक रुग्ण दारव्हा येथील आहे. यात यवतमाळ शहरातील साईनाथ लेआऊट येथील एक महिला, यवतमाळ शहरातील पोलीस हेड क्वार्टर येथील एक पुरूष, तेलीपुरा येथील एक पुरुष, लक्ष्मीनगर येथील एक महिला, चिंतामणी नगरी वाघापूर येथील एक पुरूष, यवतमाळ शहरातील एक पुरूष, पुसद येथील द्वारका नगरीमधील दोन पुरूष, गांधी वार

तालुकास्तरीय यंत्रणेच्या अधिका-यांनी प्रतिबंधित क्षेत्रात कार्यरत राहावे - जिल्हाधिकारी सिंह

Image
Ø पांढरकवडा, पुसद, दिग्रसने कामगिरी सुधरविण्याचे निर्देश यवतमाळ, दि. 31 : कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणायचा असेल तर ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट ही त्रिसुत्री अतिशय महत्वाची आहे. काही तालुक्यांमध्ये याची चांगली अंमलबजावणी होत आहे तर काही तालुक्यांची कामगिरी निराशाजनक आहे. यात सुधारणा करायची असेल व कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवायचा असेल तर तालुकास्तरीय यंत्रणेच्या अधिका-यांनी कार्यालयात नव्हे तर प्रतिबंधित क्षेत्रात कार्यरत राहावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिले. कोरोनाबाबतच्या उपाययोजने संदर्भात नियोजन सभागृहात यवतमाळ, पुसद, दिग्रस, वणी, पांढरकवडा, आर्णी या तालुक्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, सहाय्यक जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.पी.सिंह, कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. मिलिंद कांबळे आदी उपस्थित होते. कोरोना पॉझेटिव्ह रुग्ण आढळताच त्याच्या संपर्कातील

जिल्ह्यात 54 पॉझेटिव्ह रुग्णांची भर

यवतमाळ, दि. 30 : जिल्ह्यात गुरुवारी नव्याने 54 पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. तसेच आयसोलेशन वॉर्ड आणि जिल्ह्यातील विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 37 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आज (दि. 30) नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 54 जणांमध्ये 40 पुरुष व 14 महिला आहेत. यात नेर शहरातील वैष्णवी नगर येथील दोन पुरुष व एक महिला, नेर शहरातील शिवाजी नगर येथील तीन पुरुष, तोलीपुरा येथील एक पुरुष, वणी शहरातील तेलीफैल येथील सहा पुरुष व चार महिला, आर्णि शहरातील मोमीनपुरा येथील एक पुरुष, यवतमाळ शहरातील लोहारा येथील एक पुरुष, महावीर नगर येथील एक पुरुष, वारको सिटी येथील एक पुरुष व एक महिला, कळंब तालुक्यातील देवनाळा येथील एक पुरुष, जोडमोह येथील एक पुरुष व एक महिला, वटबोरी येथील एक पुरुष, पांढरकवडा शहरातील महादेव नगर येथील दोन पुरुष, दारव्हा शहरातील तेलीपुरा येथील एक पुरुष, दारव्हा तालुक्यातील नायगाव येथील एक पुरुष, पुसद शहरातील जाम बाजार येथील तीन पुरुष व दोन महिला, पुसद शहरातील मोमीनपुरा येथील एक पुरुष व खातीब वॉर्ड येथील 13 पुरुष व पाच महिला पॉझेटिव्ह आले आहेत.   ज

कलेक्टर, सीईओ, एसपी प्रतिबंधित क्षेत्रात

Image
Ø पांढरकवडा, जोडमोह, झरीजामणी, मारेगावचा आढावा यवतमाळ, दि. 30 : कोरोना विषाणूचा संसर्ग शहरी भागातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात झाल्याने तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत लगातार वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासन ‘हाय अलर्ट’ वर आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना दिलासा देण्यासोबतच येथील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह खुद्द सीईओ आणि एसपींसह प्रतिबंधित क्षेत्रात दाखल झाले. यावेळी त्यांनी पांढरकवडा, जोडमोह (ता. कळंब), झरीजामणी व मारेगावाचा आढावा घेतला. जोडमोह येथील वॉर्ड क्र. 1 आणि वॉर्ड क्र.4 चा काही भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे. या क्षेत्रात एकूण 305 घरे असून लोकसंख्या 1355 आहे. तर संपूर्ण गावाची लोकसंख्या जवळपास 3500 आहे. प्रतिबंधित क्षेत्रासाठी आरोग्य विभागाच्या सात व इतर भागासाठी आठ अशा एकूण 15 पथकाद्वारे नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच प्रशासनाच्यावतीने या भागात जीवनावश्यक वस्तु, किराणा, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी तालुका प्रशासनाला सुचना देतांना जिल्हाधिकारी एम.डी.सिंह म्हणाले, पॉझेटिव्ह आलेल्या नागरिकांच्या संपर्कातील 100

एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु ; 46 नव्याने पॉझेटिव्ह

Ø 26 जणांना डिस्चार्ज यवतमाळ, दि. 29 : जिल्ह्यात बुधवारी एका कारोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाल्याने मृत्युची एकूण संख्या 27 झाली आहे. तर आज नव्याने 46 पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. तसेच आयसोलेशन वॉर्ड आणि जिल्ह्यातील विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 26 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  आज (दि. 29) मृत झालेल्यामध्ये उमरखेड तालुक्यातील खरूज येथील 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर जिल्ह्यात नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 46 जणांमध्ये 30 पुरुष व 16 महिला आहे. यात दिग्रस शहरातील 13 पुरुष व पाच महिला, दिग्रस शहरातील संभाजी नगर येथील एक पुरुष, पांढरकवडा शहरातील 10 पुरुष व आठ महिला, झरी जामणी शहरातील तीन पुरुष, पुसद शहरातील एक पुरुष व दोन महिला, दारव्हा येथील अंबिका नगर येथील एक महिला आणि नेर शहरातील दोन पुरुष यांचा समावेश आहे.   जिल्ह्यात दि. 28 पर्यंत ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 324 होती. यात आज 47 नवीन रुग्णांची भर पडल्याने हा आकडा 371 वर पोहचला. मात्र एका जणाचा मृत्यु व 'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या 26 जणांना रुग्णालयातून सुट्टी

जिल्ह्यात 40 पॉझेटिव्ह रुग्णांची भर

Ø 16 जणांना डिस्चार्ज यवतमाळ, दि. 28 : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच असून आज (दि.28) पुन्हा 40 पॉझेटिव्ह रुग्णांची नव्याने भर पडली आहे. तर आयसोलेशन वॉर्ड आणि विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 16 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.   मंगळवारी नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 40 जणांमध्ये 23 पुरुष व 17 महिलांचा समावेश आहे. यात पांढरकवडा येथील मजीद वार्डातील 17 पुरुष व 14 महिला, पुसद येथील 3 पुरुष व 2 महिला, दिग्रस शहरातील एक पुरुष, दारव्हा येथील दोन पुरुष व एक महिलेचा समावेष आहे.   जिल्ह्यात सोमवारपर्यंत ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 300 होती. यात आज 40 नवीन रुग्णांची भर पडल्याने हा आकडा 340 वर पोहचला. मात्र 'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या 16 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 324 आहे. यात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे 292 तर रॅपीड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझेटिव्ह आलेले 32 जण आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या

पुसद व दिग्रस शहरात 31 जुलैपर्यंत संचारबंदी

यवतमाळ दि.28 : कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी पुसद व दिग्रस शहरात व या शहरालगतच्या भागात 31 जुलै 2020 च्या मध्यरात्रीपर्यंत   संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या कालावधीत पुढील बाबी, आस्थापना, व्यक्ती व समूहाला सुट राहील. सर्व शासकीय कार्यालये त्यांचे संपूर्ण अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सुरू राहतील. शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयीन ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक असेल तसेच त्यांच्या वाहनांना कार्यालयात येणे व घरी जाणे याकरीता मुभा राहील. पुसद व दिग्रस शहरातील व शहरालगतच्या क्षेत्रातील संपूर्ण अत्यावश्यक सेवेची व इतर सेवेची, वस्तुंची दुकाने व बाजारपेठ संपूर्णत: बंद राहतील. सर्व शासकीय व खाजगी दवाखाने, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय रुग्णालयातील कर्मचारी, पशुवैद्यकीय दवाखाने व त्यांचे औषधालये दररोज 24 तास (24 X 7) सुरू राहतील. ऑनलाईन औषध वितरण सेवा व शासकीय, खाजगी दवाखान्यालगत असलेली औषधीविक्री दुकाने (24 X 7) सुरू राहतील. तसेच इतर ठिकाणी असलेली एकल औषधी दुकानेसुद्धा सुरू रा

मानव व बिबट्या सहसंबध समजून घेण्यासाठी वन विभाग व वाईल्ड लाईफ कंझर्वेशन सोसायटी संयुक्तपणे अभ्यास करणार - वनमंत्री संजय राठोड

Image
                                                                                  यवतमाळ, दि. 27 : मानव व बिबट्या सहसंबध अधिक समजून घेण्यासाठी बिबट्याच्या टेलिमेट्रि (दूरमिती ) अभ्यासाला पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाची नुकतीच मान्यता मिळाली आहे. त्यामुळे या विषयाचा अभ्यासाचा मार्ग मोकळा झाला असून व पुढील दोन वर्षात याचे निष्कर्ष हाती येतील, असा विश्वास वनमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला. या प्रकल्प अंतर्गत शहरी भागाच्या आसपास वावर करणा-या पाच बिबट्यांना कॉलर जीपीएस   व जीएसएम लावले जाणार असून त्यानंतर बिबट्याचा दोन वर्ष अभ्यास केला जाणार आहे. हा अभ्यास वन विभाग व वाईल्ड लाईफ कंझर्वेशन सोसायटी ऑफ इंडिया हे संयुक्तपणे करणार आहे. हा प्रकल्प 62 लाख रुपयाचा असून त्यातील 40 लाख वन विभाग तर 22 लाख हे वाईल्ड लाईफ कंझर्वेशन सोसायटी इंडिया यांचेकडून उपलब्ध करून दिले जाणार आहेत . या अभ्यासातून बिबट्याचा प्रसार, अधिवास व आवास क्षेत्र समजून घेण्यास मदत होणार आहे. मानव आणि बिबट्या यांचे परस्पर संबध कसे निर्माण होतात तसेच बिबट्या हे मानवी जीवन सोबत कसे जुळवून घेतात याचा अभ्यास यात

जिल्ह्यात एकाच दिवशी 68 पॉझेटिव्ह रुग्णांची भर

Ø पांढरकवडा येथील 42 जणांचा समावेश ; सहा जणांना डिस्चार्ज यवतमाळ, दि. 27 : जिल्ह्यात सुरवातीला एकेरी अंकात वाढणारा कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा गत काही दिवसांपासून रोज दुहेरी अंकात वाढत आहे. सोमवारी जिल्ह्यात तब्बल 68 पॉझेटिव्ह रुग्णांची नव्याने भर पडल्याने चिंतेत भर पडली आहे. तर आयसोलेशन वॉर्ड आणि विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले सहा जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.   सोमवारी नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 68 जणांमध्ये 40 पुरुष व 28 महिलांचा समावेश आहे. यात पांढरकवडा येथील 24 पुरुष व 18 महिला, यवतमाळ शहरातील संजय गांधी नगर भोसा रोड येथील एक महिला, यवतमाळ शहरातील रोहिदास नगर येथील एक पुरुष तसेच यवतमाळातील तीन पुरुष व दोन महिला, पुसद शहरातील चार पुरुष व तीन महिला, नेर शहरातील नवीन नगरी येथील दोन पुरुष व एक महिला, दिग्रस शहरातील तीन पुरुष, कळंब तालुक्यातील जोडमोहा येथील एक महिला, उमरखेड शहरातील एक पुरुष व एक महिला, महागाव येथील एक पुरुष, आर्णि शहरातील ग्रीन पार्क येथील एक पुरुष व आर्णि येथील एक महिला पॉझेटिव्ह आले आहेत.  जिल्ह्यात रविवारपर्यंत ॲक्टीव्

'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' : 29 जणांना सुट्टी

Ø एक मृत्यु ; 25 पॉझेटिव्ह रुग्णांची नव्याने भर यवतमाळ, दि. 26 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात तसेच विविध ठिकाणी कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या 29 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना आज (दि.26) सुट्टी देण्यात आली. तर जिल्ह्यात रविवारी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला असून 25 पॉझेटिव्ह रुग्णांची नव्याने भर पडली आहे. आज मृत झालेली महिला (वय 60) ही आर्णि शहरातील मोमीनपुरा भागातील रहिवासी होती. तर नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 25 जणांमध्ये 14 पुरुष आणि 11 महिला आहेत. यात पांढरकवडा शहरातील 10 पुरुष व नऊ महिला, पुसद तालुक्यातील भंडारी येथील एक पुरुष, पुसद शहरातील नवीन पुसद येथील एक महिला, वणी शहरातील एक पुरुष व एक महिला, यवतमाळ शहरातील टॅक्सी नगर येथील एक पुरुष आणि नेर शहरातील एक पुरुष पॉझेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात शनिवारपर्यंत 242 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह होते. यात आज 26 पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडल्याने हा आकडा 268 वर पोहचला. मात्र एकाचा मृत्यु झाल्याने व 'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या 29 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याने सद्यस्थ

कोरोनाबाधित मृत्यु थांबविण्यासाठी गांभिर्याने काम करा - जिल्हाधिकारी एम.डी.सिंह

Image
                                        Ø संपर्क शोधणे, नमुन्यांची चाचणी, सारी व आयएलआयच्या लक्षणांवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश यवतमाळ, दि. 25 : जिल्ह्यात मृत्युंच्या संख्येत दिवसाआड वाढ होत आहे. ही आपल्या जिल्ह्यासाठी अतिशय दुर्देवी बाब आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु थांबविणे याला शासन आणि प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे पॉझेटिव्ह व्यक्तिंच्या संपर्कातील नागरिकांचा शोध, जास्तीत जास्त नमुन्यांची चाचणी, सारी किंवा आयएलआयसारख्या लक्षणांचे वेळीच निदान यावर विशेष लक्ष केंद्रीत करणे अत्यावश्यक आहे. त्यादृष्टीने सर्वांनी अतिशय गांभिर्यपूर्वक कामे करावीत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिले. कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर नियोजन भवनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, सहाय्यक जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. मिलिंद कांबळे आदी उपस्थित ह

कापूस खरेदीत यवतमाळ जिल्हा राज्यात अव्वल

Image
Ø जिल्ह्यात 55 लक्ष 69 हजार क्विंटल कापसाची खरेदी यवतमाळ, दि.25 : खरीप हंगामात बियाणे व खते घेण्यासाठी शेतक-यांच्या हातात पैसा असावा, तसेच पीक कर्जासाठी त्याला सावकाराच्या दारात जावे लागू नये, यासाठी शेतक-यांकडील कापूस हमी भावाने खरेदी करण्यासाठी शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यात पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी कापूस खरेदीबाबत वेळोवेळी सहकार विभागाचा आढावा घेतला. नोंदणी झालेल्या शेतक-यांचा कापूस खरेदी करण्यासाठी योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिले. त्याची फलनिष्पत्ती म्हणून जिल्ह्यात 55 लक्ष 69 हजार 500 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कापूस खरेदीमध्ये यवतमाळ जिल्हा राज्यात अव्वल असल्याचे सहकार विभागाने म्हटले आहे.     यवतमाळ जिल्ह्यात एकूण 2 लाख 69 हजार 534 शेतकऱ्यांकडून तब्बल 55 लाख 69 हजार 500 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे सुरवातीपासूनच नोंदणीकृत शेतक-यांच्या कापूस खरेदीबाबत अतिशय आग्रही होते. ठराविक वेळेत कापसाची खरेदी होऊन शेतक-यांना त्वरीत चुकारे मिळाले पाहिजे, अ

एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु : 19 नव्याने पॉझेटिव्ह

Ø ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ : तीन जणांना डिस्चार्ज यवतमाळ, दि. 24 : शुक्रवारी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाल्याने मृत्युची एकूण संख्या 23 झाली आहे. तर आज   जिल्ह्यात 19 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. तसेच आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझेटिव्ह आलेले तीन जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आज (दि.24) मृत झालेली व्यक्ती ही 50 वर्षीय महिला असून त्या पुसद तालुक्यातील चोंडी येथील रहिवासी होत्या. तर नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 19 जणांमध्ये 15 पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळ शहरातील इस्लामपुरा येथील एक पुरुष, यवतमाळ शहरातील वसंत नगर येथील एक पुरुष, प्रभात नगर येथील एक पुरुष, दिग्रस येथील एक पुरुष, दिग्रस तालुक्यातील खडसा येथील एक पुरुष, महागाव येथील सहा पुरुष व दोन महिला, उमरखेड येथील एक महिला, पुसद शहरातील वसंत नगर येथील एक महिला, घाटंजी येथील तीन पुरुष, नेर तालुक्यातील मोझर येथील एक पुरुष पॉझेटिव्ह आले आहेत.   जिल्ह्यात गुरुवारपर्यंत 219 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह होते. यात शुक्रवारी 19 जणांची भर पडल्याने हा आकडा 238 वर

जिल्ह्यात पुन्हा 40 जण पॉझेटिव्ह ; 1 मृत्यू

8 जणांची कोरोनावर मात यवतमाळ, दि. 22 :   जिल्ह्यात आज (दि.23) पुन्हा 40 पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली आहे तर पूसद शहरातील श्रीरामपूर येथील 56 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझेटिव्ह आलेले 8 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 40 जणांमध्ये 25 पुरुष व 15 महिला आहे. यात दिग्रस येथील पाच पुरूष व तीन महिला, पुसद येथील पार्वतीनगरातील एक महिला, पुसद येथील तीन पुरुष व एक महिला, वणी येथील एक पुरूष, पांढरवकडा येथील अकरा पुरूष व दोन महिला, यवतमाळ शहरातील साईनाथ लेआऊट येथील एक पुरूष, यवतमाळ येथील दोन पुरूष व तीन महिला, दारव्हा येथील एक पुरूष व पाच महिला, तर आर्णी येथील एक पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात बुधवारपर्यंत 187 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह होते. यात 40 जणांची भर पडल्याने हा आकडा 227 वर पोहचला. तर पुसद येथील 1 महिलेचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचा अहवाल आल्याने ही संख्या 228 होऊन परत 227 झाली होती. मात्र ‘पॉझ

पुन्हा एक बालविवाह थांबविण्यात यश

यवतमाळ, दि.23 : नागरिकांच्या सतर्कतेमुळे जिल्ह्यात पुन्हा एक बालविवाह थांबविण्यात यश आले आहे. लॉकडाऊनच्या काळातील हा 12 वा बालविवाह जिल्हा बाल संरक्षण कक्षाद्वारे थांबवण्यात आला आहे.               दारव्हा तालुक्यातील सावंगी या गावातील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह ता. मानोरा, जिल्हा वाशिम येथील व्यक्तीसोबत शेजारच्या गावातील स्वयंघोषीत समाज सेवकाच्या मदतीने 23 तारखेला आप्तेष्ठाच्या उपस्थितीत होणार होता. याबाबत गोपनीय तक्रार महिला बाल विकास कार्यालयास प्राप्त झाली होती. त्यानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांनी सावंगी व सावळा या गावातील पोलीस पाटील, ग्रामसेवक, सरपंच, अंगणवाडी सेविका व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या मदतीने मुलीच्या पालकांची भेट घेऊन मुलीचे लग्न सज्ञान झाल्यानंतर करण्याबाबत समजावून सांगितले. तसेच बालविवाहाचे शारीरिक, मानसिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21   पेक्षा कमी असेल तर असा विवाह करणे हा बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अन्वये दखलपात्र गुन्हा असल्याची जाणीव करून देण्यात आली. त्यामुळे पालकांनी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यावरच तिचे

शेतकऱ्याशी उद्धट वागणूकीच्या वृत्ताची पालकमंत्र्यांनी घेतली दखल

Image
Ø बाजार समिती सचिवाचा प्रभार काढला यवतमाळ, दि.23 :   “ कापसाची गाडी पेटवून शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न" या मथळ्याखाली   शेतकऱ्यास उद्धटपणे वागणूक देवून दोन दिवस ताटकळत ठेवले व आत्महत्तेस प्रवृत्त केले, या आशयाची बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली होती.   सदर बातमीची दखल पालकमंत्री संजय राठोड यांनी तात्काळ घेवून प्रशासनाला संबंधित बाजार समितीच्या प्रभारी सचिवावर कारवाईच्या सूचना केल्या. तसेच सर्व बाजार समिती सचिवांनी शेतकऱ्यांना सन्मानाने वागणूक द्यावी, असे निर्देश पालकमंत्री राठोड यांनी दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी संबंधित आर्णी बाजार समिती सचिवाकडील प्रभार तात्काळ काढून त्यांना निलंबित करणेबाबत आदेश दिले. कृषी उत्पन्न बाजार समिती आर्णी येथील सचिव पदाचा अतिरिक्त पदभार पर्यवेक्षकाकडे सोपविण्यात आला आहे. वरील प्रकरणात संबंधीतास नोटीस देण्यात आली असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरु करण्यात आली असल्याचे जिल्हा उपनिबंधक आर.एन.कटके यांनी कळविले आहे. ००००

कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना पीक कर्जवाटपाची कार्यवाही सुरू

यवतमाळ, दि.23 : जिल्हयामध्ये आतापर्यंत एकूण 1 लाख 36 हजार 616 शेतकऱ्यांना 1060 कोटी 82 लाख खरीप पीक कर्जवाटप बँकांमार्फत करण्यात आले आहे. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 76 हजार 241 शेतकऱ्यांना 453 कोटी 13 लाख पीक कर्जवाटप केले असून ही टक्केवारी 82.68   आहे. तसेच महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत जिल्ह्यामध्ये कर्जमुक्ती मिळालेल्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्जवाटप करणेसंबंधीची कार्यवाही देखील बँकेने सुरु केली आहे. याअंतर्गत 106 पात्र शेतकऱ्यांना 60 लाख 68 हजार पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जमुक्ती मिळालेल्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्जवाटप करण्याचे नियोजन केले असून पुढील 15 दिवसांमध्ये पात्र शेतकऱ्यांना बँकेमार्फत पीक कर्जवाटप करण्यात येणार आहे. यासाठी कर्जमुक्ती मिळालेल्या शेतकऱ्यांनी कर्जवाटपासबंधाने संबंधीत संस्थेचे सचिव यांचेशी संपर्क करुन आवश्यक कागदपत्रे सादर करावी. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत जिल्ह्यामध्ये 1 लाख 8 हजार शेतकरी कर्जमुक्तीकरीता पात्र आहेत. कर्जमुक्तीची रक्क्म 745 कोटी आहे. आता

यवतमाळ, पांढरकवडा, नेर व दारव्हा शहरात 31 जुलै पर्यंत संचारबंदी

यवतमाळ, पांढरकवडा, नेर व दारव्हा शहरात 31 जुलै पर्यंत संचारबंदी Ø शहरालगतचा भागही राहणार बंद Ø नागरिकांच्या सोयीसाठी वरील चारही शहरात फक्त 24 जुलै रोजी दुकाने उघडी ठेवण्याची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत यवतमाळ दि.23 : जिल्ह्यात कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव व कोरोना विषाणुच्या संसर्गाची साखळी तोडण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी यवतमाळ, पांढरकवडा, नेर व दारव्हा शहरात व या शहरालगतच्या भागात दिनांक 24 जुलै च्या मध्यरात्रीपासून ते 31 जुलै 2020 च्या मध्यरात्रीपर्यंत   संचारबंदी लागू केली आहे. यवतमाळ, पांढरवकडा, नेर आणि दारव्हा आणि या शहराच्या लगतच्या परिसरात 25 जुलै पासून संचारबंदी लागू होत असल्याने नागरिकांच्या सुविधेसाठी उद्या दिनांक 24 जुलै रोजी (एकच दिवस) दुकाणे उघडी ठेवण्याची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत राहणार आहे. संचारबंधीच्या कालावधीत पुढील बाबी, आस्थापना, व्यक्ती व समूहाला सुट राहील. यवतमाळ, पांढरकवडा, नेर व दारव्हा शहरातील व शहरालगतच्या क्षेत्रातील संपुर्ण अत्यावश्यक सेवेची व इतर सेवेची, वस्तुंची दुकाने व बाजारपेठ संपूर्णत: बंद राहतील.

आरोग्य सेवेबाबत येणाऱ्या योजनांच्या तक्रारींचा जलद निपटारा करा - जिल्हाधिकारी

Image
यवतमाळ, दि. 22 : आरोग्य विभागामार्फत बहुतेक योजना दीर्घ कालावधीसाठी राबविल्या जातात. त्यामुळे योजनेची अंमलबजावणी करतांना नेहमी येणाऱ्या अडचणींची तपासणीसूची ठेवावी व त्यानुसार तक्रारींचा जलद निपटारा करून लाभार्थ्यांना योजनेचा लाभ त्वरीत देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आज राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण, राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रम, गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा व प्रधानमंत्री मातृवंदना योजना यांचा त्रैमासिक आढावा घेण्यात आला.   यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण, नगरपरिषदेचे मुख्याधीकारी सुनिल बल्लाळ, जिल्हा परिषदेचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नगर प्रशासन अधिकारी हर्षल गायकवाड, आदी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी आपल्या कार्यालयाच्या ठेवणीनुसार आपली प्रतिमा ठरते असे सांगून कार्यालयाच्या आवारात