कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना पीक कर्जवाटपाची कार्यवाही सुरू


यवतमाळ, दि.23 : जिल्हयामध्ये आतापर्यंत एकूण 1 लाख 36 हजार 616 शेतकऱ्यांना 1060 कोटी 82 लाख खरीप पीक कर्जवाटप बँकांमार्फत करण्यात आले आहे. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 76 हजार 241 शेतकऱ्यांना 453 कोटी 13 लाख पीक कर्जवाटप केले असून ही टक्केवारी 82.68  आहे. तसेच महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत जिल्ह्यामध्ये कर्जमुक्ती मिळालेल्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्जवाटप करणेसंबंधीची कार्यवाही देखील बँकेने सुरु केली आहे. याअंतर्गत 106 पात्र शेतकऱ्यांना 60 लाख 68 हजार पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जमुक्ती मिळालेल्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्जवाटप करण्याचे नियोजन केले असून पुढील 15 दिवसांमध्ये पात्र शेतकऱ्यांना बँकेमार्फत पीक कर्जवाटप करण्यात येणार आहे. यासाठी कर्जमुक्ती मिळालेल्या शेतकऱ्यांनी कर्जवाटपासबंधाने संबंधीत संस्थेचे सचिव यांचेशी संपर्क करुन आवश्यक कागदपत्रे सादर करावी.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत जिल्ह्यामध्ये 1 लाख 8 हजार शेतकरी कर्जमुक्तीकरीता पात्र आहेत. कर्जमुक्तीची रक्क्म 745 कोटी आहे. आता पर्यंत एकूण 1,01,068 शेतकऱ्यांच्या खात्याची माहिती पोर्टलवर अपलोड झाली आहे. यातील 89,804 शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणिकरण करुन घेण्यासाठी प्राप्त झाली असून यापैकी 76,153 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करुन घेतले आहे. तर 13,651 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण होणे बाकी आहे. ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण व्हायचे आहे, अशा शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यासाठी त्यांनी सेतु सुविधा केंद्र, संबंधीत बँक शाखा, येथे जाऊन त्यांचे आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे.

कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये एकूण 64,085 शेतकऱ्यांना 472 कोटी 69 लाख कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 17,256 शेतकऱ्यांची रु. 122 कोटी 59 लाख कर्जमुक्ती झाली आहे. कर्जमुक्ती मिळालेल्या शेतकऱ्यांचे लेजर अपडेशन करुन घेण्याची कार्यवाही बँक स्तरावर सुरु आहे.

कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप मिळण्याचे दृष्टीने संबंधीतांनी बँक शाखेशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड व जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केल्याचे जिल्हा उपनिबंधक आर.एन.कटके यांनी कळविले आहे.

००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी