जिल्ह्यात 19 जणांची कोरोनावर मात


Ø 14 जण नव्याने पॉझेटिव्ह

यवतमाळ, दि. 21 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझेटिव्ह आलेले 19 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात आज (दि.21) नव्याने 14 पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली.

नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 14 जणांमध्ये नऊ पुरुष व पाच महिला आहे. यात पुसद शहरातील रहमत नगर येथील एक पुरुष, नेर शहरातील शिवाजी नगर येथील एक पुरुष, यवतमाळ शहरातील इस्लामपुरा येथील एक पुरुष, यवतमाळ शहरातील तारपुरा येथील एक पुरुष व दोन महिला आणि यवतमाळ येथील पाच पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे.

जिल्ह्यात सोमवारपर्यंत 156 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह होते. यात 14 जणांची भर पडल्याने हा आकडा 170 वर पोहचला. मात्र ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या 19 जणांना सुट्टी झाल्यामुळे ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 151 झाली आहे. यात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे 81 तर रॅपीड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझेटिव्ह आलेले 70 जण आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 594 झाली आहे. यापैकी 423 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 20 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 96 जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज 23 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 10103 नमुने पाठविले असून यापैकी 9742 प्राप्त तर 360 अप्राप्त आहेत. जिल्ह्यात 9148नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

०००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी