एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु : 19 नव्याने पॉझेटिव्ह


Ø ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ : तीन जणांना डिस्चार्ज
यवतमाळ, दि. 24 : शुक्रवारी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाल्याने मृत्युची एकूण संख्या 23 झाली आहे. तर आज  जिल्ह्यात 19 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. तसेच आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझेटिव्ह आलेले तीन जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
आज (दि.24) मृत झालेली व्यक्ती ही 50 वर्षीय महिला असून त्या पुसद तालुक्यातील चोंडी येथील रहिवासी होत्या. तर नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 19 जणांमध्ये 15 पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळ शहरातील इस्लामपुरा येथील एक पुरुष, यवतमाळ शहरातील वसंत नगर येथील एक पुरुष, प्रभात नगर येथील एक पुरुष, दिग्रस येथील एक पुरुष, दिग्रस तालुक्यातील खडसा येथील एक पुरुष, महागाव येथील सहा पुरुष व दोन महिला, उमरखेड येथील एक महिला, पुसद शहरातील वसंत नगर येथील एक महिला, घाटंजी येथील तीन पुरुष, नेर तालुक्यातील मोझर येथील एक पुरुष पॉझेटिव्ह आले आहेत.  
जिल्ह्यात गुरुवारपर्यंत 219 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह होते. यात शुक्रवारी 19 जणांची भर पडल्याने हा आकडा 238 वर पोहचला. मात्र एकाचा मृत्यु झाल्याने आणि ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या 3 जणांना सुट्टी झाल्यामुळे ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 234 झाली आहे. यात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे 159 तर रॅपीड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझेटिव्ह आलेले 75 जण आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 708 झाली आहे. यापैकी 451 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात एकूण 23 मृत्युची नोंद आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज 66 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 11557 नमुने पाठविले असून यापैकी 10930 प्राप्त तर 627 अप्राप्त आहेत. जिल्ह्यात 10222 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी