'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' : 29 जणांना सुट्टी


Ø एक मृत्यु ; 25 पॉझेटिव्ह रुग्णांची नव्याने भर

यवतमाळ, दि. 26 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात तसेच विविध ठिकाणी कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या 29 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना आज (दि.26) सुट्टी देण्यात आली. तर जिल्ह्यात रविवारी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला असून 25 पॉझेटिव्ह रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

आज मृत झालेली महिला (वय 60) ही आर्णि शहरातील मोमीनपुरा भागातील रहिवासी होती. तर नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 25 जणांमध्ये 14 पुरुष आणि 11 महिला आहेत. यात पांढरकवडा शहरातील 10 पुरुष व नऊ महिला, पुसद तालुक्यातील भंडारी येथील एक पुरुष, पुसद शहरातील नवीन पुसद येथील एक महिला, वणी शहरातील एक पुरुष व एक महिला, यवतमाळ शहरातील टॅक्सी नगर येथील एक पुरुष आणि नेर शहरातील एक पुरुष पॉझेटिव्ह आले आहे.

जिल्ह्यात शनिवारपर्यंत 242 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह होते. यात आज 26 पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडल्याने हा आकडा 268 वर पोहचला. मात्र एकाचा मृत्यु झाल्याने व 'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या 29 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 238 आहे. यात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे 212 तर रॅपीड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझेटिव्ह आलेले 26 जण आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 744 झाली आहे. यापैकी 480 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 26 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 67 जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रविवारी 93 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत महाविद्यालयाने 12685 नमुने पाठविले असून यापैकी 11447 प्राप्त तर 1238 अप्राप्त आहेत. तर 10703 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

०००००००


Comments

  1. Our district is actively managing the pandemic,surel contact tracing is primary step towards stopping this outrage.Posting review as a MBBS student.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी