जिल्ह्यात पुन्हा 20 पॉझेटिव्ह रुग्णांची भर ; 3 जणांना डिस्चार्ज


Ø सद्यस्थितीत 150 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह

यवतमाळ, दि. 13 : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आज (दि. 13) रोजी 20 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यापैकी 10 जणांचे नमुने प्रयोगशाळेत तर 10 जण रॅपिड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच सुरवातीला पॉझेटिव्ह आलेले 3 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना आयसोलेशन वॉर्डातून सुट्टी देण्यात आली आहे.

सोमवारी नव्याने पॉझेटिव्ह नागरिकांमध्ये 13 पुरुष आणि 7 महिलांचा समावेश आहे. यात दिग्रस शहरातील बारभाई मोहल्ला येथील 1 महिला, काझीपुरा येथील 6 पुरूष व 3 महिला, वणी शहरातील तेली फैल येथील 1 महिला, 2 पुरूष आणि पुसद येथील 5 पुरूष आणि 2 महिला आहे.

जिल्ह्यात कालपर्यंत (दि.12) 133 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह होते. यात रविवारी 20 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडल्याने हा आकडा 153 झाला होता. मात्र 'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या 3 जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 150 झाली आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 462 आहे. यापैकी 299 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 13 मृत्युची नोंद आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने 7124 नमुने पाठविले असून यापैकी 6965 प्राप्त तर 159 अप्राप्त आहेत. जिल्ह्यात 6503 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

000000000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी