जिल्ह्यात 54 पॉझेटिव्ह रुग्णांची भर


यवतमाळ, दि. 30 : जिल्ह्यात गुरुवारी नव्याने 54 पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. तसेच आयसोलेशन वॉर्ड आणि जिल्ह्यातील विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 37 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आज (दि. 30) नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 54 जणांमध्ये 40 पुरुष व 14 महिला आहेत. यात नेर शहरातील वैष्णवी नगर येथील दोन पुरुष व एक महिला, नेर शहरातील शिवाजी नगर येथील तीन पुरुष, तोलीपुरा येथील एक पुरुष, वणी शहरातील तेलीफैल येथील सहा पुरुष व चार महिला, आर्णि शहरातील मोमीनपुरा येथील एक पुरुष, यवतमाळ शहरातील लोहारा येथील एक पुरुष, महावीर नगर येथील एक पुरुष, वारको सिटी येथील एक पुरुष व एक महिला, कळंब तालुक्यातील देवनाळा येथील एक पुरुष, जोडमोह येथील एक पुरुष व एक महिला, वटबोरी येथील एक पुरुष, पांढरकवडा शहरातील महादेव नगर येथील दोन पुरुष, दारव्हा शहरातील तेलीपुरा येथील एक पुरुष, दारव्हा तालुक्यातील नायगाव येथील एक पुरुष, पुसद शहरातील जाम बाजार येथील तीन पुरुष व दोन महिला, पुसद शहरातील मोमीनपुरा येथील एक पुरुष व खातीब वॉर्ड येथील 13 पुरुष व पाच महिला पॉझेटिव्ह आले आहेत. 

 जिल्ह्यात बुधवारपर्यंत 344 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्ण होते. यात आज 54 नवीन रुग्णांची भर पडल्याने हा आकडा 398 वर पोहचला. मात्र 'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या 37 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 361 आहे. यात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे 327 तर रॅपीड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझेटिव्ह आलेले 34 जण आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 953 झाली आहे. यापैकी 565 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 27 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 92 जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने गुरुवारी 116 नमुने तपासणीकरीता पाठविले. महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 16113 नमुने पाठविले असून यापैकी 13623 प्राप्त तर 2490 अप्राप्त आहेत. तसेच 12670 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी