जिल्ह्यात 25 पॉझेटिव्ह रुग्णांची भर ; 11 जणांना डिस्चार्ज


Ø सद्यस्थितीत 133 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह

यवतमाळ, दि. 12 : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. आज (दि. 12) जिल्ह्यात 25 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 19 जणांचे नमुने प्रयोगशाळेत तर सहा जण रॅपिड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच सुरवातीला पॉझेटिव्ह आलेले 11 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना आयसोलेशन वॉर्डातून सुट्टी देण्यात आली आहे.

रविवारी नव्याने पॉझेटिव्ह नागरिकांमध्ये 12 पुरुष आणि 13 महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळ शहरातील तिरुपती नगर येथील एक पुरुष व दोन महिला, छत्रपती नगर येथील एक पुरुष व एक महिला, दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील एक महिला, दारव्हा येथील दोन पुरुष, एक महिला, पुसद शहरातील पार्वती नगर येथील एक महिला, गांधी वॉर्ड येथील दोन पुरुष व दोन महिला, दिग्रस शहरातील विठ्ठल नगर येथील एक पुरुष, नेर शहरातील राम मंदीर परिसरातील एक महिला, वणी येथील एक महिला, उमरखेड येथील तीन पुरुष व तीन महिला, पांढरकवडा शहरातील शास्त्री वॉर्डातील एक पुरुष आणि महागाव येथील एक पुरुष पॉझेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात कालपर्यंत (दि.11) 119 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह होते. यात रविवारी 25 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडल्याने हा आकडा 144 झाला. मात्र 'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या 11 जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 133 झाली आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 442 आहे. यापैकी 296 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 13 मृत्युची नोंद आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने 7004 नमुने पाठविले असून यापैकी 6911 प्राप्त तर 93 अप्राप्त आहेत. जिल्ह्यात 6469 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी