जिल्ह्यात 15 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर


Ø चार जणांना सुट्टी ; सद्यस्थितीत 152 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह

यवतमाळ, दि. 16 : जिल्ह्यात गुरवारी 15 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. यात पाच जण प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे तर दहा जण ॲन्टीजन रॅपीड टेस्टद्वारे पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या चार जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आज (दि.16) रोजी नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 15 जणांमध्ये आठ पुरुष आणि सात महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळ शहरातील कळंब चौक येथील एक पुरुष, सायखेडा येथील एक पुरुष, राळेगाव तालुक्यातील निधा येथील एक महिला, उमरखेड शहरातील एक पुरुष, दारव्हा तालुक्यातील नायगाव येथील एक महिला, आर्णी तालुक्यातील केळझरा येथील एक महिला, नेर शहरातील लक्ष्मी नगर येथील चार पुरुष व चार महिला आणि वणी शहरातील तेलीफैल येथील एक पुरुष पॉझेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात बुधवारपर्यंत 141 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह होते. गुरुवारी 15 जण नव्याने पॉझेटिव्ह आल्याने रुग्णांची संख्या 156 वर गेली. मात्र 'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या चार जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 152 वर आली आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 503 एवढी आहे. यापैकी 336 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 15 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 155 जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज 46 नमुने तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत महाविद्यालयाने 7467 नमुने पाठविले असून यापैकी 7380 प्राप्त तर 87 अप्राप्त आहेत. जिल्ह्यात 6877 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

०००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी