शेतकऱ्याशी उद्धट वागणूकीच्या वृत्ताची पालकमंत्र्यांनी घेतली दखल


Ø बाजार समिती सचिवाचा प्रभार काढला
यवतमाळ, दि.23 :  कापसाची गाडी पेटवून शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न" या मथळ्याखाली  शेतकऱ्यास उद्धटपणे वागणूक देवून दोन दिवस ताटकळत ठेवले व आत्महत्तेस प्रवृत्त केले, या आशयाची बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली होती.  सदर बातमीची दखल पालकमंत्री संजय राठोड यांनी तात्काळ घेवून प्रशासनाला संबंधित बाजार समितीच्या प्रभारी सचिवावर कारवाईच्या सूचना केल्या. तसेच सर्व बाजार समिती सचिवांनी शेतकऱ्यांना सन्मानाने वागणूक द्यावी, असे निर्देश पालकमंत्री राठोड यांनी दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी संबंधित आर्णी बाजार समिती सचिवाकडील प्रभार तात्काळ काढून त्यांना निलंबित करणेबाबत आदेश दिले.
कृषी उत्पन्न बाजार समिती आर्णी येथील सचिव पदाचा अतिरिक्त पदभार पर्यवेक्षकाकडे सोपविण्यात आला आहे. वरील प्रकरणात संबंधीतास नोटीस देण्यात आली असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरु करण्यात आली असल्याचे जिल्हा उपनिबंधक आर.एन.कटके यांनी कळविले आहे.
००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी