Posts

Showing posts from May, 2022

स्तनदा मातांसाठी प्रत्येक शासकीय इमारतीत हिरकणी कक्ष

Image
  शासकीय धोरणाची अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश   यवतमाळ, दि 30 मे, (जिमाका) :- बाळाला स्तनपान करण्यासाठी स्तनदा मातांसाठी स्वतंत्र हिरकणी कक्षाची सुविधा असावी, या शासकीय धोरणाची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात यावी. ज्या शासकीय इमारतीत अद्याप हिरकणी कक्ष सुरू करण्यात आलेला नाही तेथे हिरकणी कक्ष स्थापन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिल्या. महिला व बालविकास विभागांतर्गत सखी वन स्टॉप सेंटर योजनेचा आढावा जिल्हाधिकारी यांनी आज महसूल भवन येथे घेतला. याप्रसंगी जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू, सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक मीनल जगताप, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा ॲङ प्राची निलावार, महिला समुपदेशन केंद्र पांढरकवडाच्या संचालन डॉ. लीला भेले, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रमा बाजोरिया याप्रंसगी प्रामुख्याने उपस्थित होते. महिलांविरोधातील हिंसा रोखण्यासाठी महिलांना एकाच ठिकाणी विविध सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने वन स्टॉप सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये पोलीस सहाय्य, आरोग्य सहायय,

कोरोनामुळे अनाथ 12 बालकांना पी.एम. केअर योजनेचा लाभ

Image
    आपण जिल्हा प्रशासनाची दत्तक बालकेच कोणत्याही अडचणीत संपर्क साधण्याचे जिल्हाधिकारी यांचे अनाथ बालकांना आवाहन     यवतमाळ दि. ३० :   यवतमाळ जिल्ह्यात कोविडमुळे १२   बालकांचे दोन्ही पालक दगावलेले आहे. या बालकांना आपण जिल्हा प्रशासनाची दत्तक बालके असून कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी मदतीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.   कोविड महामारीमुळे ज्या बालकांचे दोन्ही पालक, कायदेशीर पालक, दत्तक पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे, म्हणून पी.एम. केअर फॉर चिल्ड्रेन स्कीम या योजनेची घोषणा प्रधाणमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली असून त्यांच्या हस्ते आज देशभरात कोरोनामुळे अनाथ बालकांना या योजनेचा लाभ देण्याची सुरवात करण्यात आली. यवतमाळ येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे या अनाथ बालकांना पि. एम. केअर फॉर चिल्ड्रन या केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते लाभ देण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बालकांना तसेच पालकांना योजनेच्या किटचे वाटप करण्यात आले. या किटमध्

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचे अर्ज आमंत्रित

  यवतमाळ, दि 24 मे, जिमाका :-   आदिवासी विकास विभागाच्या दिनांक 31 मार्च 2005 व दिनांक 16 मार्च 2016 चे शासन निर्णय अन्वये परदेशात पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रम शिक्षणासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीचा लाभ मिळेणेसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा या कार्यालयाकडून अर्ज मागविण्यात आले आहे.             विहित नमुन्यातील अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा येथे उपलब्ध आहे. सत्र 2022-23 साठी दिनांक 10 जून 2022 पर्यत विहित नमुन्यातील परिपुर्ण भरलेले अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा येथे सादर करावे, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडाचे प्रकल्प अधिकारी विवेक जॉनसन यांनी कळविले आहे. 0000  

प्रतिबंधित मागुर मत्स्यसंवर्धावर मत्स्यव्यवसाय विभागाची कारवाई

Image
    यवतमाळ, दि 24 मे, जिमाका :-   मत्स्यपालन करण्यास प्रतिबंध असलेल्या थाई मागुर प्रजातीच्या माशाचे कोन्धारा ता. केळापूर येथे मत्स्य संवर्धन करण्यात येत असल्याचे आढळून आल्याने या ठिकाणी मत्स्यव्यवसाय विभागाने मत्स्यसाठा नष्ट करून कारवाई केली.             हरित लवाद नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार थाई मागुर माश्याचे प्रजनन, मत्स्यपालन व विक्री करण्यावर बंदी असून सदर माश्याचे अस्तित्वात असलेले मत्स्य साठे नष्ट करण्याचे निर्देश आहेत. यानुसार मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी न.या.पिंगलवार व शि.अ.चव्हाण तसेच पांढरवकडाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हे.भ.कोळी व कॉन्स्टेबल सि.भ.कांबळे यांच्या उपस्थितीत कोन्धारा येथे प्रतिबंधित मत्स्य साठा शेतालगतच्या खड्डयात शास्रोक्त पद्धतीने पुरून नष्ट करण्यात आला असल्याचे मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्त सु.वा.जांभुळे यांनी कळविले आहे. 000

गरोदर मातांना बुडीत मजुरीची रक्कम तात्काळ मिळण्यासाठी संगणक प्रणाली विकसित करावी - जिल्हाधिकारी अमोल येडगे

Image
  मानव विकास कार्यक्रमाचा आढावा   Ø   गरोदर मातांच्या तपासण्या वेळेवर व्हाव्या Ø   तपासणीला ने-आण करण्यासाठी वाहन उपलब्ध करावे Ø   उपजिल्हा रूग्णालयातील सोनोग्राफी मशीन तात्काळ सुरू करावी Ø   डोंगराळ व अतिदुर्गम भागातील गरजू मुलींना सायकल वाटपात प्राधाण्य द्या Ø   उमेदमार्फत मोठी गोदामे व प्रक्रिया केंद्राची उभारणी करावी   यवतमाळ, दि 24 मे, जिमाका :-   अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्र्य रेषेखालील बाळांत महिलांना प्रसुतीपुर्व व प्रसूतीनंतर अशा दोन टप्प्यात एकूण चार हजार रुपये बुडीत मजूरी देण्याची योजना मानव विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र गरोदर मातांना बुडित मजूरीची रकम तात्काळ मिळावी यासाठी लाभार्थ्यांचा डाटा संकलीत करून त्यांच्या खात्यात थेट रकम देण्यासाठी संगणक प्रणाली विकसीत करून प्रशासकीय कामकाजातील पारदर्शकता अधिक सुदृढ करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. मानव विकास कार्यक्रमाचा आढावा जिल्हाधिकारी यांनी काल महसूल सभागृह येथे घेतला. याप्रसंगी मानव विकासचे जिल्हा नियोजन अधिकारी अ.वि. सुने, जिल

नगर पालिका प्रशासनाद्वारे अनुकंपा उमेदवारांची अंतिम प्रतीक्षासूची प्रसिद्ध

  यवतमाळ, दि 24 मे, जिमाका :-   नगर पालिका प्रशासन विभागाद्वारे गट-क अनुकंपा उमेदवारांची प्रतीक्षासूची 11 मार्च 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येवून त्यावर आक्षेप आमंत्रित करण्यात आले होते. प्राप्त आक्षेपानुसार कार्यवाही करून प्रसिद्ध अनुकंपा गट - क च्या सामाईक प्रतीक्षासूचीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.   अनुकंपा उमेदवारांची अंतिम सामाईक प्रतीक्षासूची दि. 20 मे ते 30 मे 2022 पर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगर परिषद/नगर पंचायत यांच्या सूचनाफलकावर व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत असून याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कळविले आहे.   0000