स्तनदा मातांसाठी प्रत्येक शासकीय इमारतीत हिरकणी कक्ष

 



शासकीय धोरणाची अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश

 

यवतमाळ, दि 30 मे, (जिमाका) :- बाळाला स्तनपान करण्यासाठी स्तनदा मातांसाठी स्वतंत्र हिरकणी कक्षाची सुविधा असावी, या शासकीय धोरणाची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात यावी. ज्या शासकीय इमारतीत अद्याप हिरकणी कक्ष सुरू करण्यात आलेला नाही तेथे हिरकणी कक्ष स्थापन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिल्या.

महिला व बालविकास विभागांतर्गत सखी वन स्टॉप सेंटर योजनेचा आढावा जिल्हाधिकारी यांनी आज महसूल भवन येथे घेतला. याप्रसंगी जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू, सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक मीनल जगताप, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा ॲङ प्राची निलावार, महिला समुपदेशन केंद्र पांढरकवडाच्या संचालन डॉ. लीला भेले, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रमा बाजोरिया याप्रंसगी प्रामुख्याने उपस्थित होते.

महिलांविरोधातील हिंसा रोखण्यासाठी महिलांना एकाच ठिकाणी विविध सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने वन स्टॉप सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये पोलीस सहाय्य, आरोग्य सहायय, मानसिक समुपदेशन, कायदेविषयक समुपदेशन आदी सुविधांसोबतच पिडीत महिलेला तात्पुरत्या वास्तव्याची सुविधाही पुरविण्यात येते. वन स्टॉप सेंटर च्या या सुविधांची माहिती विविध यंत्रणांमार्फत सर्वांना देण्याच्या जिल्हाधिकारी यांनी बैठकीत सांगितले.

            जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात बाल लैगिंक अत्याचाराच्या घटना घडू नये यासाठी मुलांना गुड टच, बॅड टच याबाबत माहिती देवून मार्गदर्शन करणे तसेच पालकांनी देखील काय दक्षता घ्यावी याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या.

            बैठकीला सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया पंधरे, डॉ. आशा देशमुख, रुपाली पांडे, ॲड. अमित बदनोरे, डॉ. स्मिता पेटकर, ए.ए.रायकुवर, यु.बी.मस्के, सुनिल बोक्से, प्रदीप वानोळे प्रामुख्याने उपस्थित होते

000

 

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी