नगर पालिका प्रशासनाद्वारे अनुकंपा उमेदवारांची अंतिम प्रतीक्षासूची प्रसिद्ध

 


यवतमाळ, दि 24 मे, जिमाका :-  नगर पालिका प्रशासन विभागाद्वारे गट-क अनुकंपा उमेदवारांची प्रतीक्षासूची 11 मार्च 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येवून त्यावर आक्षेप आमंत्रित करण्यात आले होते. प्राप्त आक्षेपानुसार कार्यवाही करून प्रसिद्ध अनुकंपा गट - क च्या सामाईक प्रतीक्षासूचीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.  अनुकंपा उमेदवारांची अंतिम सामाईक प्रतीक्षासूची दि. 20 मे ते 30 मे 2022 पर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकारी, नगर परिषद/नगर पंचायत यांच्या सूचनाफलकावर व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत असून याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कळविले आहे.

 

0000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल