प्रतिबंधित मागुर मत्स्यसंवर्धावर मत्स्यव्यवसाय विभागाची कारवाई

 


 


यवतमाळ, दि 24 मे, जिमाका :-  मत्स्यपालन करण्यास प्रतिबंध असलेल्या थाई मागुर प्रजातीच्या माशाचे कोन्धारा ता. केळापूर येथे मत्स्य संवर्धन करण्यात येत असल्याचे आढळून आल्याने या ठिकाणी मत्स्यव्यवसाय विभागाने मत्स्यसाठा नष्ट करून कारवाई केली.

            हरित लवाद नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार थाई मागुर माश्याचे प्रजनन, मत्स्यपालन व विक्री करण्यावर बंदी असून सदर माश्याचे अस्तित्वात असलेले मत्स्य साठे नष्ट करण्याचे निर्देश आहेत. यानुसार मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी न.या.पिंगलवार व शि.अ.चव्हाण तसेच पांढरवकडाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हे.भ.कोळी व कॉन्स्टेबल सि.भ.कांबळे यांच्या उपस्थितीत कोन्धारा येथे प्रतिबंधित मत्स्य साठा शेतालगतच्या खड्डयात शास्रोक्त पद्धतीने पुरून नष्ट करण्यात आला असल्याचे मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्त सु.वा.जांभुळे यांनी कळविले आहे.

000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी