अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचे अर्ज आमंत्रित

 


यवतमाळ, दि 24 मे, जिमाका :-  आदिवासी विकास विभागाच्या दिनांक 31 मार्च 2005 व दिनांक 16 मार्च 2016 चे शासन निर्णय अन्वये परदेशात पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रम शिक्षणासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीचा लाभ मिळेणेसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा या कार्यालयाकडून अर्ज मागविण्यात आले आहे.

            विहित नमुन्यातील अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा येथे उपलब्ध आहे. सत्र 2022-23 साठी दिनांक 10 जून 2022 पर्यत विहित नमुन्यातील परिपुर्ण भरलेले अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा येथे सादर करावे, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडाचे प्रकल्प अधिकारी विवेक जॉनसन यांनी कळविले आहे.

0000

 

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी