Posts

Showing posts from February, 2017
Image
जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन यवतमाळ, दि. 27 : ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात मराठी भाषा गौरव दिन म्हणून आज साजरा करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, डॉ. नितीन व्यवहारे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काटपेल्लीवार उपस्थित होते. श्री. खवले यांनी मराठी भाषेचा वापर वाढविणे आवश्यक असल्याचे सांगितले. राज्यात मराठी भाषा रूजावी, तिचे संवर्धन होणे गरजेचे आहे. त्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमात अव्वल कारकुन भारती झाडे यांनी मराठी भाषेचे महत्व समजावून सांगितले. शालिनी बुटले यांनी कविता सादर केली. कार्यक्रमाला जिल्हाधिकरी कार्यलयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000 आरटीई अंतर्गत प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ *2 मार्चपर्यंत करता येणार अर्ज यवतमाळ, दि. 27 : शिक्षणाचा हक्क अंतर्गत दुर्बल व वंचित घटकांसाठी 25 टक्के राखीव जागांवर ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी 2 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात
Image
यवतमाळ येथील मतमोजणीचे फोटो 00000 कोपरा येथील रेतीघाटाचा लिलाव रद्द *रेतीच्या अवैध उत्खननामुळे कारवाई यवतमाळ, दि. 23 : निर्धारीत केलेल्या रेतीघाट क्षेत्राव्यतिरिक्त लगतच्या ठिकाणाहून केलेल्या अवैध रेती उत्खनन प्रकरणी दोषी ठरल्याने कोपरा बु., ता. उमरखेड येथील रेतीघाट रद्द करण्यात आला आहे. रेतीच्या अवैध उत्खनन प्रकरणी रेतीघाटधारकाविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्याने कोपरा येथील रेतीघाटाचा लिलाव रद्द करण्यात आला आहे. कोपरा बु., ता. उमरखेड येथील सन 2016-17 या वर्षासाठी 17 सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या रेतीघाट लिलावात अनिल काशिनाथ कुंटे, रा. विठुळ यांनी सर्वोच्च बोली लावून खरेदी केला होता. श्री. कुंटे यांनी 20 लाख 81 हजार रूपयांमध्ये कोपरा येथील रेतीघाट घेतला होता. 3 ऑक्टोबरपासून त्यांना हा रेतीघाट मंजूर करण्यात आला होता. त्यांनी सर्व्हे क्र. 43 आणि 44 मधून रेीचे उत्थनन करणे आवश्यक असताना त्यांनी लगतच्या माणकेश्वर, ता. उमरखेड येथील सर्व्हे क्र. 51, 52 आणि 53 मधून 342 ब्रास रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी 11 डिसेंबर 2016 रोजी उमरखेड तहसीलदारांनी श्री. कुंटे यांच्या
Image
सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी नाशिकला प्रशिक्षण यवतमाळ, दि. 22 : भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलात अधिकारी होण्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे एसएसबी प्रशिक्षण नाशिक येथे दि. 6 ते 15 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांनी गुरूवारी, दि. 2 मार्च रोजी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयात मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.             या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क व्यवस्था केली आहे. उमेदवारांनी मुलाखतीसाठी येताना PCTC Training च्या Google Plus पेजवरील दिलेल्या चेकलिस्टप्रमाणे सर्व कागदपत्रे आणि महत्त्वाच्या तारखांचे अवलोकन करावे. तसेच त्याच्या दोन प्रतीमध्ये माहिती भरून सादर करावे. याबाबत अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे दूरध्वनी क्रमांक 0253-2451031, 2451032 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी धनंजय सदाफळे यांनी केले आहे.   
Image
निवडणुक मतमोजणी प्रक्रीया शांततेत पार पाडा                                                                          -   सचिंद्र प्रताप सिंह * महसुल व पोलीस अधिकाऱ्यांकडून मतमोजणीचा आढावा * मतमोजणी केंद्रावर अत्यावश्यक सुविधा उपलब्धतेचे निर्देश              यवतमाळ, दि. 18  :   जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुक जिल्ह्यात सर्वत्र शांततेत पार पडली. दिनांक 23 फेब्रवारी रोजी होणारी मतमोजणीची प्रक्रीया ही उत्तमपणे पार पाडा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले.             महसुल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून निवडणुक मतमोजणीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.             बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक कुमार सिंगला,  पोलीस अधीक्षक एस.राजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, निवडणुक उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.काकासाहेब डोळे यांच्यासह महसुल व पोलीस विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी
Image
कॉपीमुक्त वातावरणात परिक्षेसाठी सहकार्य करा                          -जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह * जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व यंत्रणांना आवाहन * भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन * 28 पासून बारावी, 7 मार्चपासून दहावीची परिक्षा यवतमाळ ,   दि. 1 8   : जिल्ह्यात दिनांक 28 फेब्रुवारीपासून बारावी, तर दिनांक 7 मार्च पासून दहावीची परिक्षा सुरू होत आहे. यावर्षी शंभर टक्के कॉपीमुक्त वातावरणात परिक्षा पार पाडण्याचे अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी शिक्षण विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह सर्व संबंधित यंत्रणांनी सहकार्य करावे ,  असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले. बचत भवन येथे परिक्षेशी संबंधित सर्व यंत्रणांची एकत्रित बैठक त्यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक सिंगला ,  पोलीस अधीक्षक एम. राजकुमार ,  उपविभागीय अधिकारी दिपककुमार मीना ,  शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी ,  तहसिलदार ,  जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख अधिकारी ,  गटविकास अधिकारी ,  गटशिक्षणाधिकार
Image
परिक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर फौजदारी         - जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह * 10 वी 12 वी परिक्षेच्या तयारीचा आढावा * प्रत्येक केंद्रावर भरारी पथकाच्या तीन भेटी * कॉपीमुक्त वातावरणासाठी सहकार्याचे आवाहन          यवतमाळ ,   दि. 17 :   काही दिवसांवर दहावी, बारावीच्या परिक्षा आल्या आहे. या परिक्षा कॅापीमुक्त वातावरणात पार पाडावयाच्या आहे. परिक्षा केंद्रावर कॅापी करणे किंवा त्यासाठी सहकार्य करणे गुन्हा आहे. असे आढळून आल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.              परिक्षा पार पाडण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या दक्षता समितीची सभा महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार सिंगला, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, शिक्षणाधिकारी माध्यमिक चिंतामण वंजारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक सुचिता पाटेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गायनर, निरंतर शिक्षणाधिकारी अंबादास पेंदोर आदी उपस्थित होते.              बारावीच
Image
शेतीला रेशीम उद्योगाची जोड द्यावी -रेशीम विकास अधिकारी पंडीत चौगुले *रेडीओ किसान दिन साजरा यवतमाळ, दि .  16  : पारंपरिक शेतीतून आर्थिक उत्पन्नाला मर्यादा आहेत, तसेच शेतीच्या विभाजन आणि वाढत्या लोकसंख्येमुळे मासिक उत्पन्नाच्या हमीसारखा उत्पन्न देणारा रेशीम उद्योग शेतकऱ्यांनी हाती घ्यावा, असे आवाहन रेशिम विकास अधिकारी पंडित चौगुले यांनी केले. ते आकाशवाणी यवतमाळतर्फे बुधवारी, दि. 15 फेब्रुवारी रोजी आयोजित किसान सम्मेलनात बोलत होते.             आकाशवाणीचे केंद्रप्रमुख हरीश वासनिक अध्यक्षस्थानी होते. यावेळी आत्माचे प्रकल्प अधिकारी बी. एल. पाटील, कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र गाडे, शेतीमित्र अशोक वानखेडे, दत्तात्रय चव्हाण, कृषि संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. सी. यू. पाटील उपस्थित होते.             श्री. चौगुले म्हणाले, शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी एक ते दिड एकरात तुतीची लागवड करावी. यातून विशिष्ट उत्पन्नाची हमी मिळणार असून यातून शेतीला रेशीम उद्योगाची जोड द्यावी, असे आवाहन केले. डॉ. गाडे यांनी सेंद्रीय खताचा वापर
Image
पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी मतदान पथक रवाना *55 गट, 110 गणांसाठी आज मतदान *जिप, पंस साठी 928 उमेदवार रिंगणात *मतदान केंद्राबाहेर उमेदवारांची माहिती यवतमाळ, दि. 15 : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी जिल्ह्यात सार्वत्रिक निवडणुका होत आहे. यात पहिल्या टप्प्यात 55 गट आणि 110 गणासाठी शुक्रवारी, दि. 16 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी आज मतदान पथक संबंधित गावी रवाना झाले आहे. यावर्षी प्रथमच उमेदवारांनी शपथपत्रात नमूद केलेल्या माहितीतून उमेदवारांची संपत्ती आणि दाखल गुन्ह्यांची माहिती फलकाद्वारे लावण्यात आले आहे. जिल्ह्यातील सोळा पंचायत समितीसाठी यात मतदान होणार आहे. जिल्हा परिषदेच्या 55 गटात 319 उमेदवार आहेत, तर पंचायत समितीसाठी 609 असे एकूण 928 उमेदवार आहेत. मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मतदानाच्या क्षेत्रासाठी स्थानिक सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. दिव्यांग आणि वृद्धांच्या मदतीसाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. मतदानोत्तर आणि जनमत चाचणीवरही निर्बंध घालण्यात आले आहे. मतदान पूर्ण होईपर्यंत याचे निकाल जाहिर करता येणार नाही. यावेळी न
मतदानासाठी स्थानिक सुट्टी जाहिर *15,16 फेब्रुवारीला शाळा बंद राहणार यवतमाळ, दि. 14 : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी नागरीकांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी त्या मर्यादित क्षेत्रासाठी स्थानिक सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार 16 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात ज्या शाळा मतदान केंद्र स्थापित करण्यासाठी निश्चित केलेल्या आहेत, अशा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील सर्व शाळांना 15 आणि 16 फेब्रुवारी रोजी सुट्टी राहिल. तसेच जिल्ह्यातील ज्या गट आणि गणांमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान होणार आहे, त्या ठिकाणच्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी त्या मर्यादित क्षेत्रापुरती 16 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांनी स्थानिक सुट्टी जाहिर केली आहे. 00000 राज्य   निवडणूक   आयोग महाराष्ट्र …………………………………………………………………………………………………………………… प्रचार कालावधी समाप्तीनंतर प्रचारविषयक जाहिरातींवरबंदी