एनपीएसची माहिती अद्ययावत करावी
यवतमाळ, दि. 10 : आहरण व संवितरण अधिकारी यांनी 1 एप्रिल 2015 पासून परीभाषित निवृत्तीवेतन योजना ही राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत समाविष्ठ झालेली आहे. त्यामुळे या सभासदांची माहिती अद्ययावत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
परीभाषीत अंशदान निवृत्तीवेतन योजनेचे सभासद कर्मचारी आहेत, त्यांची नोंदणी आहरण व वितरण अधिकारीमार्फत झालेली आहे, परंतु केंद्रीय देखभाल अभिकरण यांच्याकडे नोंदणी झालेल्या कर्मचाऱ्यांचे पत्ते, दूरध्वनी, ई-मेल अद्ययावत केलेले नाहीत. त्यामुळे एनपीएस, डीसीपीएसधारक सभासद कर्मचाऱ्यांचे पत्ते, दूरध्वनी, ई-मेल, आधारक्रमांक, नॉमिनीची माहिती संबंधित सभासदांना कळवून अद्ययावत करण्यात यावी. तसेच नॉमिनीची माहिती सेवार्थमध्ये अद्ययावत करून त्यानंतर कोषागाराकडून अद्ययावत करण्यासाठी कळविण्यात यावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी यांनी केले आहे.
00000
सोमवारी कलचाचणीचे साहित्य वाटप
यवतमाळ, दि. 10 : दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलचाचणीसाठी परीक्षा साहित्याचे वाटप सोमवारी, दि. 13 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा 15 फेब्रुवारी ते 4 मार्च कालावधीत घ्यावयाची आहे. या परीक्षेसाठी लागणारे साहित्य वाटप सोमवारी अभ्यंकर कन्या शाळेत सकाळी साडेअकरा वाजल्यापासून नेर, दारव्हा, दिग्रस, आर्णी, पुसद या तालुक्यांसाठी साहित्या वाटप करण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजता उमरखेड, महागाव, बाभुळगाव, कळंब, राळेगाव, मारेगाव, पांढरकवडा, झरी जामणी, वणी, घाटंजी या तालुक्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी आयसीटी शिक्षक किंवा संगणकाचे ज्ञान असलेल्या शिक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी केले आहे.
00000
केंद्रीय विद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरू
*दुर्बल घटकांसाठी 25 टक्के कोटा
यवतमाळ, दि. 10 : येथील केंद्रीय विद्यालयाची येत्या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच 25 टक्के दुर्बल घटकांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी दोन्हीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे.
शैक्षणिक सत्र 2017-18साठी शिक्षणाचा हक्क अंतर्गत 25 टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहे. ऑनलाईन अर्जासाठी 10 जागा आणि इतर जागांसाठी 8 फेब्रुवारी पासून 10 मार्च पर्यंत अर्ज करावे लागणार आहे. यासाठी darpan.kvs.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे. पहिलीसाठी 25 टक्के अंतर्गत 10 जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहे. यासाठी 31 मार्च 2017 रोजी पाच वर्षे वय पुर्ण असणे आवश्यक आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांना 10 मार्चपर्यंत अर्ज करावे लागणार आहे. 15 ते 18 मार्चपर्यंत लॉटरी पद्धतीने प्रवेशासाठी निवड करण्यात येणार आहे. 20 मार्च रोजी पहिलीची निवडसूची प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना 21 ते 30 मार्च दरम्यान प्रवेश घ्यावा लागणार आहे. प्रवेशासाठी निवासस्थान ते शाळेचे अंतर पाच किलोमीटर असणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी जन्माचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, दुर्बल घटकांसाठी बीपीएल, मागासवर्गाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
00000
पांढरकवडा येथे मंगळवारी शस्त्रक्रीया, दंतचिकित्सा शिबीर
यवतमाळ, दि. 10 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पांढरकवडा येथे मंगळवारी, दि. 14 फेब्रुवारी रोजी शस्त्रक्रिया, दंतचिकित्सा शिबीर सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या शिबीरात सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात येणार असून आवश्यकता भासल्यास शस्त्रक्रीया करण्यात येणार आहे. याचा लाभ नागरीकांनी घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. व्ही. मांडले, तालुका अधिकारी डॉ. पी. व्ही. शेळके यांनी केले आहे.
00000
विटभट्टीमधून पाच बालकामगारांची मुक्तता
यवतमाळ, दि. 10 : यवतमाळ शहरालगतच्या भोयर येथील विटभट्टीवरील छाप्यामध्ये जिल्हा बालकामगार कृतीदलाने केलेलया कारवाईमध्ये पाच बालकामगारांची मुक्तता करण्यात आली आहे. यात विटभट्टी मालकाविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
खंदरकर ब्रिक्स येथे मंगळवारी, दि. 7 फेब्रुवारी एक, ओम ब्रिक्स येथे एक असे दोन आणि 14 वर्षाखालील बालके काम करीत असल्याचे आढळून आले. या बालकांची मुक्तता करून बाल कल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आले. यात विटभट्टी मालक देविदास भगाजी खंदरकर आणि सुभाष लालचंद बेहरे यांच्याविरूद्ध बालकामगार प्रतिबंधक नियमनानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. बुधवारी, दि. 8 फेब्रुवारी रोजी येरद येथील विटभट्टीवर तीन बालके आढळून आली. यात मालक शिवपाल चुन्नीलाल प्रजापती, रा. अंबिकानगरजवळ, यवतमाळ याच्याविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
बालकामगाराच्या अनिष्ठ प्रथेला आळा बसावा यासाठी छापे घालून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. यासाठी विविध ठिकाणी छापे घालण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्या मार्गदर्शानात सरकारी कामगार अधिकारी रा. दे. गुल्हाने नेतृत्वात दुकाने निरीक्षक जगदिश कडू, रविंद्र जतकर, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी रविचंद्र आडे, विस्तार अधिकारी व्ही. एल. हेमके, प्रा. विकास अड्याळकर, पोलिस ओमप्रकाश यादव यांनी ही कारवाई केली.
00000
राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे उद्‌घाटन
यवतमाळ, दि. 10 : राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेला जिल्ह्यात आज सुरवात करण्यात आली. एकाच दिवशी एक ते 19 वर्षे वयोगटातील सुमारे 7 लाख 80 हजार बालकांना जंतनाशकाच्या गोळ्या देण्यात आल्या. या मोहिमेतून सुटलेल्या बालकांना 15 फेब्रुवारी रोजी मॉपअप राऊंडमधून गोळ्या देण्यात येणार आहे.
या जंतनाशक गोळ्या देण्याचा मोहिमेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक सिंगला यांच्या हस्ते करण्यात आले. वाघापूर येथील जिल्हा परिषद शाळेत हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी श्री. सिंगला यांनी परिपाठ हा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे. यात विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगण्यात यावे. विद्यार्थ्यांवर शिक्षकांचा पगडा असल्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्श करावे, असे सांगितले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. के. झेड. राठोड यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. टी. जी. धोटे, सहाकय संचालक कृष्ठरोग डॉ. डी. डी. भगत, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांनी मार्गदर्शन केले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किशोर गुजर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी सावरगडच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जया चव्हाण, प्रशांत पाटील, महेंद्र भरणे, श्री. ढोले यांनी पुढाकार घेतला.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी