परिक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर फौजदारी
      - जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह
* 10 वी 12 वी परिक्षेच्या तयारीचा आढावा
* प्रत्येक केंद्रावर भरारी पथकाच्या तीन भेटी
* कॉपीमुक्त वातावरणासाठी सहकार्याचे आवाहन
       यवतमाळ, दि. 17 : काही दिवसांवर दहावी, बारावीच्या परिक्षा आल्या आहे. या परिक्षा कॅापीमुक्त वातावरणात पार पाडावयाच्या आहे. परिक्षा केंद्रावर कॅापी करणे किंवा त्यासाठी सहकार्य करणे गुन्हा आहे. असे आढळून आल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.
            परिक्षा पार पाडण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या दक्षता समितीची सभा महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार सिंगला, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, शिक्षणाधिकारी माध्यमिक चिंतामण वंजारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक सुचिता पाटेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गायनर, निरंतर शिक्षणाधिकारी अंबादास पेंदोर आदी उपस्थित होते.
            बारावीची परिक्षा दिनांक 28 फेब्रुवारी पासून सुरू होत असून या परिक्षेचे जिल्ह्यात 104 केंद्र असून 35502 विद्यार्थी परिक्षा देणार आहे. दहावीची परिक्षा दिनांक 7 मार्च पासून सुरू होत आहे. 149 केंद्रांवरून 43863 विद्यार्थी परिक्षा देतील. या केंद्रांवर गैरप्रकार टाळण्यासाठी तसेच कॅापीमुक्त वातावरणात परिक्षा पार पाडण्यासाठी बैठे पथके, भरारी पथके नेमन्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. भरारी पथकांमध्ये उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी अशा अधिकाऱ्यांचा समावेश राहतील. तर बैठे पथके मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, कृषि विस्तार अधिकाऱ्यांचा समावेश करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.
            परिक्षा केंद्रावर त्याच शाळेचे मुख्याध्यापकांना केंद्र प्रमुख म्हणून नेमू नये तसेच परिक्षा केंद्रावर संबंधित शाळांच्या शिक्षकांना नेमु नये असेही त्यांनी सांगितले. केंद्रावर तीन तासाच्या दरम्यान वेगवेगळ्या भरारी पथकांच्या भेटी होतील. किमान तीनदा प्रत्येक केंद्रावर भेटी होतील, असे नियोजन करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. परिक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. पर्यवेक्षक किंवा अन्य परिक्षा कर्मचारी, अधिकाऱ्यांनी गैरप्रकारासाठी सहकार्य केल्यास त्यांच्यावरही फौजदारी दाखल करावी, असे त्यांनी सांगितले.
केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अचानक भेटी
       केंद्रावर गैरप्रकाराला आळा घालण्यासोबतच चांगल्या वातावरणात परिक्षा पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह परिक्षा केंद्रांना अचानक भेटी देणार आहे. त्यांच्यासोबतच मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधिक्षक सुध्दा भेटी देतील. केंद्राच्या ठिकाणी परिक्षेसह इतर व्यवस्था सुरळीतपणे आहे का याची पाहणी ते अचानक भेटीत करणार आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी