मतदानाचा हक्क बजावण्यासाठी
मतदारांना सुटी देण्याचे आवाहन
*जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक
यवतमाळ, दि. 6 : राज्य निवडणुक आयोगाने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. या पार्श्वभुमीवर उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या परिपत्रकानुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्याच्या सूचना केल्या आहे.
परिपत्रकानुसार मतदानक्षेत्रातील विविध दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी आस्थापना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. तर मतदानाच्या दिवशी वरील निवडणूक क्षेत्रात कामगारांच्या अनुपस्थितीमुळे धोका अथवा मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, अशा आस्थापना, उद्योगातील कामगारांना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या निर्यात व्यवसायात असलेल्या कंपन्या, कायम, अखंडीत उत्पादन सुरू असलेल्या कंपन्यामधील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन तासांची सवलत देण्यात यावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी रा. दे. गुल्हाने यांनी केले आहे.
00000
25 लाखांचे तंबाखूजन्य पदार्थ जाळले
यवतमाळ दि. 6 : अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे मागील आठ महिन्यात कारवाई करून पकडलेला 25 लाख रूपयांचे तंबाखूजन्य पदार्थ सावरगड येथील घनकचरा डेपोमध्ये जाळण्यात आले.
अन्न व औषध विभागाने केलेल्या कारवाईमधील प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्रेत्यांकडून गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू आदी माल जप्त केला होता. यात विक्रेत्याविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेल्या 25 लाख 11 लाख रूपयांच्या मुद्देमालाचा पुनर्वापर होऊ नये यासाठी तो नष्ट करून त्याची विल्हेवाट लावणे आवश्यक होते. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार हा साठा नगर पालिकेच्या सावरगड येथील घनकचरा डेपो येथे पंचासमोर नष्ट करण्यात आला.
यावेळी सहायक आयुक्त जयंत वाणे, अमरावती विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी (दक्षता) विश्वजीत शिंदे उपस्थित होते. पंच म्हणून अभिमन्यू पांडे, रिजवान खतीब इजाज खतीब उपस्थित होते. यासाठी अन्न सुरक्षा अधिकारी यदुराज दहातोंडे, घनश्याम दंदे यांनी सहकार्य केले.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी