शेतीला रेशीम उद्योगाची जोड द्यावी
-रेशीम विकास अधिकारी पंडीत चौगुले
*रेडीओ किसान दिन साजरा
यवतमाळ, दि. 16 : पारंपरिक शेतीतून आर्थिक उत्पन्नाला मर्यादा आहेत, तसेच शेतीच्या विभाजन आणि वाढत्या लोकसंख्येमुळे मासिक उत्पन्नाच्या हमीसारखा उत्पन्न देणारा रेशीम उद्योग शेतकऱ्यांनी हाती घ्यावा, असे आवाहन रेशिम विकास अधिकारी पंडित चौगुले यांनी केले. ते आकाशवाणी यवतमाळतर्फे बुधवारी, दि. 15 फेब्रुवारी रोजी आयोजित किसान सम्मेलनात बोलत होते.
            आकाशवाणीचे केंद्रप्रमुख हरीश वासनिक अध्यक्षस्थानी होते. यावेळी आत्माचे प्रकल्प अधिकारी बी. एल. पाटील, कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र गाडे, शेतीमित्र अशोक वानखेडे, दत्तात्रय चव्हाण, कृषि संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. सी. यू. पाटील उपस्थित होते.
            श्री. चौगुले म्हणाले, शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी एक ते दिड एकरात तुतीची लागवड करावी. यातून विशिष्ट उत्पन्नाची हमी मिळणार असून यातून शेतीला रेशीम उद्योगाची जोड द्यावी, असे आवाहन केले. डॉ. गाडे यांनी सेंद्रीय खताचा वापर करण्याचा शेतकऱ्यांना सल्ला दिला. श्री. चव्हाण यांनी सौर ऊर्जेवरील पाणी पंप व्यवस्थापनाबाबत अनुभव सांगितले. श्री. वानखेडे यांनी उपलब्ध पाण्याचा वापर जपून करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. डॉ. पाटील यांनी उन्हाळी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याचे सांगितले. श्री. पाटील यांनी आत्मा ही शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी कार्यरत असून त्यांना तंत्रज्ञान आणि इतर सोयीसुविधा उपलब्ध करीत असल्याचे सांगितले. श्री. वासनिक यांनी आकाशवाणी शास्त्रज्ञ, तंत्रज्ञान आणि शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले.
            कार्यक्रम अधिकारी जयंतकुमार शेटे यांनी प्रास्ताविक केले. मृणालिनी दहिकर आणि निळकंठ मानकर यांनी सूत्रसंचालन केले. उद्घोषिका मंगला माळवे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी कार्यक्रम अधिकारी विजयकुमार हावरे, प्रमोद बाविस्कर, आशीष सातपुते, अरूण बुरांडे, गजेंद्र कुंभारे, श्री. बोरीकर, जगदिश काळे यांनी पुढाकार घेतला.
00000
जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू
            यवतमाळ, दि. 16 : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्ह्यात मुंबई पोलिस अधिनियमातील तरतुदीनुसार प्रतिबंध आदेश लागू करण्यात आले आहे. या आदेशानुसार जिल्ह्यात 28 फेब्रुवारीपर्यंत जमावास बंदी राहणार आहे.
या आदेशान्वये जिल्ह्यात जमाव करणे, शस्त्र बाळगणे, माणसांचे एकत्रिकरण व पुतळ्याचे प्रदर्शन करणे आदी प्रकारांवर बंदी घालण्यात आली आहे. या कलमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मुंबई पोलिस कायदा 1951 च्या कलम 37 (1) (3) नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी कळविले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी