सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी नाशिकला प्रशिक्षण
यवतमाळ, दि. 22 : भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलात अधिकारी होण्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे एसएसबी प्रशिक्षण नाशिक येथे दि. 6 ते 15 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांनी गुरूवारी, दि. 2 मार्च रोजी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयात मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
            या परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क व्यवस्था केली आहे. उमेदवारांनी मुलाखतीसाठी येताना PCTC Training च्या Google Plus पेजवरील दिलेल्या चेकलिस्टप्रमाणे सर्व कागदपत्रे आणि महत्त्वाच्या तारखांचे अवलोकन करावे. तसेच त्याच्या दोन प्रतीमध्ये माहिती भरून सादर करावे. याबाबत अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे दूरध्वनी क्रमांक 0253-2451031, 2451032 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी धनंजय सदाफळे यांनी केले आहे.
            प्रशिक्षण केंद्रात प्रवेश मिळविण्यासाठी कंबाईंड डिफेंस सर्विसेस परिक्षा. नॅशनल डिफेंस ॲकेडमी परिक्षा, पास झालेली असावी.  त्यासाठी सर्विसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी सी सर्टीफिकेतट ए किंवा बी ग्रेडमध्ये पास झालेले असावे आणि एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. युनिव्हर्सिटी एन्ट्री स्किमसाठी एसएसबी कॉल लेटर आलेले असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे लागणार आहे.
00000
भूविकास बँकेच्या कर्जदारांसाठी एकरकमी परतफेड योजना
यवतमाळ, दि. 22 : सहकार विभागाने राज्यातील भुविकास बँकेच्या कर्जदार सभासदांसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना मंजुर करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत भुविकास बँकेच्या सर्व कर्जदार सभासदांना शासनाने त्यांच्याकडील येणे व्याजामध्ये भरीव व्याज सवलत दिलेली आहे. सहा टक्के सरळ व्याजदराने थकीत कर्जखाते बंद करण्याची संधी देण्यात आलेली आहे. सदर योजनेची अंतिम मुदत 31 मार्च 2017 आहे. सभासदांनी याचा लाभ घेऊन कर्जखाते बंद करावे, यासाठी त्यांनी टिळकवाडी येथील भुविकास बँकेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा भुविकास बँकेचे अवसायक गौतम वर्धन यांनी केले आहे.
00000
श्रमिक संघटनांनी वार्षिक अहवाल सादर करण्याचे आवाहन
            यवतमाळ, दि. 22 : नोंदणीकृत श्रमिक संघटनांनी त्यांचा वार्षिक अहवाल सादर करावेत, असे आवाहन नागपूर येथील श्रमिक संघाचे उपनिबंधक यांनी केले आहे.
            श्रमिक संघ अधिनियम 1926 अंतर्गत नोंदणीकृत श्रमिक संघटनांनी त्यांच्या संघटनांचे 31 डिसेंबर 2016 अखेरचा वार्षिक अहवाल नमुना आय मध्ये 30 एप्रिल 2017 पर्यंत उपनिबंधक, श्रमिक संघ, नागपूर अपर कामगार आयुक्त यांच्या कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे. या कालावधीत वार्षिक विवरणपत्रक सादर केले नसल्यास संबंधित संघटनेविरूद्ध श्रमिक संघ अधिनियम 1926 च्या कलम 10 (ब) अंतर्गत कार्यवाही करण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी नागपूर येथील उपनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
भूमी अभिलेखच्या सहा सेवा ऑनलाईन
            यवतमाळ, दि. 22 : भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सहा सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. यामुळे नागरीकांची सोय होणार आहे.
            भूमी अभिलेख विभागाच्या आपले सरकार पोर्टलद्वारे नक्कल पुरविणे, मोजणी प्रकरणे, आकारफोड करणे, फेरफार नोंदणी, मिळकत पत्रिकेची पोटविभागणी करून मिळकत पत्रिका स्वतंत्र करणे, भूसंपादनामध्ये रस्ता, रस्ता सेट बॅक, रिझर्वेशन याबाबत शासन, संबंधित प्राधिकारी यांचे नावे स्वतंत्र मिळकत पत्रिका तयार करणे आदी सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहे. याबाबतची सविस्तर माहिती yavatmal.nic.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. आपले सरकार वेबपोर्टलवर उपलब्ध असलेल्या सेवांचा नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख वि. ग. घनवट यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी