यवतमाळ येथील मतमोजणीचे फोटो
00000
कोपरा येथील रेतीघाटाचा लिलाव रद्द
*रेतीच्या अवैध उत्खननामुळे कारवाई
यवतमाळ, दि. 23 : निर्धारीत केलेल्या रेतीघाट क्षेत्राव्यतिरिक्त लगतच्या ठिकाणाहून केलेल्या अवैध रेती उत्खनन प्रकरणी दोषी ठरल्याने कोपरा बु., ता. उमरखेड येथील रेतीघाट रद्द करण्यात आला आहे. रेतीच्या अवैध उत्खनन प्रकरणी रेतीघाटधारकाविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्याने कोपरा येथील रेतीघाटाचा लिलाव रद्द करण्यात आला आहे. कोपरा बु., ता. उमरखेड येथील सन 2016-17 या वर्षासाठी 17 सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या रेतीघाट लिलावात अनिल काशिनाथ कुंटे, रा. विठुळ यांनी सर्वोच्च बोली लावून खरेदी केला होता.
श्री. कुंटे यांनी 20 लाख 81 हजार रूपयांमध्ये कोपरा येथील रेतीघाट घेतला होता. 3 ऑक्टोबरपासून त्यांना हा रेतीघाट मंजूर करण्यात आला होता. त्यांनी सर्व्हे क्र. 43 आणि 44 मधून रेीचे उत्थनन करणे आवश्यक असताना त्यांनी लगतच्या माणकेश्वर, ता. उमरखेड येथील सर्व्हे क्र. 51, 52 आणि 53 मधून 342 ब्रास रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी 11 डिसेंबर 2016 रोजी उमरखेड तहसीलदारांनी श्री. कुंटे यांच्याविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे.
रेतीघाटधारकांनी मंजूर असलेल्या क्षेत्राबाहेर रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाने 23 डिसेंबर 2016 रोजी रेतीघाटधारक श्री. कुंटे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. याबाबत 27 डिसेंबर 2016 रोजी सुनावणी घेण्यात आली. यात मंडळ अधिकारी चातारी, तलाठी माणकेश्वर, ग्रामसेवक माणकेश्वर आणि पोलिस पाटील सिंदगी यांनी केलेला खुलासा आणि श्री. कुंटे यांनी केलेला खुलाशावरून त्यांनी रेती निर्गतीच्या अटी आणि शर्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोपरा बु. येथील रेतीघाट 23 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांनी रद्द केला आहे.
00000
26 फेब्रुवारी रोजी शिष्यवृत्ती परीक्षा
यवतमाळ, दि. 23 : पुणे येथील राज्य परिक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा रविवार, दि. 26 फेब्रुवारी रोजी होणार होणार आहे.
जिल्ह्यातील पाचवीसाठी 12 हजार 439 विद्यार्थ्यांसाठी 132 परिक्षा केंद्र असून आठवीसाठी 12 हजार 113 विद्यार्थ्यांसाठी 109 परिक्षा केंद्र असणार आहे. यावर्षीच्या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना ए, बी, सी, डी या पद्धतीने प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे. तसेच आठवीच्या विद्यार्थ्यांना एकूण प्रश्नांपैकी 20 टक्के प्रश्नांची दोन उत्तरे द्यावी लागणार आहे. यावर्षी निकाल ओएमआर पद्धतीने तयार केला जाणार असल्याने विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेवरील योग्य पर्यायाचे वर्तुळ काळ्या किंवा निळ्या शाईच्या बॉलपेनने पूर्ण रंगवायचे आहे. एकदा रंगविलेल्या वर्तुळाचा पर्याय बदलता येणार नाही. वर्तुळ चुकीच्या पद्धतीने रंगविले असल्यास गुण दिले जाणार नाही. उत्तरपत्रिकेस घडी पाडणे, मुरडणे किंवा चुरगळणे याबाबी पुर्णपणे टाळाव्या लागणार आहे. उत्तरपत्रिका फाटणे किंवा खराब झाली, रंगविलेले पर्याय दिसले नाही, तर त्यांचे गुण मिळणार नाही. आठवीच्या विद्यार्थ्यांनी सुचनेनुसार काही प्रश्नांची दोन अचुक पर्याय निवडावे लागणार आहे.
उत्तरपत्रिका या इयत्तानुसार, पेपरनिहाय वेगवेगळ्या रंगाच्या असतील. यावर्षीपासून एका परिक्षा केंद्रात एका वर्गखोलीतमध्ये 24 विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. उत्तरपत्रिकेवर विद्यार्थ्यांचा बैठक क्रमांक आणि बारकोड छपाई केली आहे. उत्तरपत्रिकेवर विद्यार्थ्याचे नाव छापले जाणार नाही केवळ बैठक क्रमांक असणार आहे, असे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी कळविले आहे.
00000
व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक संस्थांकडून अर्ज आमंत्रित
यवतमाळ दि. 23 : कायमस्वरुपी विनाअनुदान तत्वावर पूर्व व्यावसायीक, उच्च माध्यमिक व्यावसायीक, द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी तसेच या अभ्यासक्रमांच्या वाढीव तुकड्यांसाठी शैक्षणिक संस्थांकडून दिनांक 15 फेब्रुवारीपासून 14 मार्चपर्यंत विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहे.
ज्या संस्थांकडे संबंधित अभ्यासक्रमांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध आहे, किंवा त्यासाठी आर्थिक तरतूद आहे, अशा संस्था अर्ज करु शकतील. अर्जाचा नमुना आणि माहिती पुस्तिका व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. संस्था नोंदणीकृत असावी. माध्यमिक स्तरावतील पूर्व व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी इयत्ता आठवीच्या आणि +2 स्तरावरील द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमासाठी इयत्ता अकरावीच्या वर्गाची शालेय शिक्षण विभागाची मान्यता आवश्यक आहे. तसेच संस्थेकडे मानकानुसार प्रयोगशाळा, ग्रंथालय आदी प्राथमिक सुविधा असाव्यात. सदर अभ्यासक्रम कायमस्वरुपी विनाअनुदान तत्वावर चालविण्याचा व्यवस्थापनाचा ठराव आणि हमीपत्र जोडणे आवश्यक आहे. 14 मार्चपर्यंत विहित शुक्ल भरुन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, यवतमाळ यांच्याकडे तीन प्रतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. विलंब शुल्क आकारुन 31 मार्च पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. त्यानंतर अर्जाचा विचार केल्या जाणार नाही, तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, यवतमाळ, दूरध्वनी क्रमांक 07232-242874 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी