जिल्ह्यातील आरटीओचा कॅम्प रद्द
यवतमाळ, दि. 6 : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे आगामी काळात घेण्यात येणारे तालुकास्तरावरील कॅम्प रद्द करण्यात आले आहेत.
नागरीकांच्या सोयीसाठी परिवहन विभागाचे शिबीर तालुकास्तरावर आयोजित करण्यात येते. दरम्यान जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांनी विश्रामगृह हे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियंत्रणात येत असल्यामुळे त्यांची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे दिग्रस 6, 16 फेब्रुवारी, पुसद 7 फेब्रुवारी, वणी 10, 17 फेब्रुवारी, राळेगाव 14 फेब्रुवारी रोजीचे कॅम्प शिबीर रद्द करण्यात आले आहे. याची नागरीकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी