Posts

Showing posts from September, 2019

प्रत्येक दिव्यांग मतदारांपर्यंत पोहचा – विभागीय आयुक्त

Image
                                  v विधानसभा निवडणुकीबाबत आढावा v जिल्हाधिका-यांची दिव्यांगासाठी काम करणा-या संस्था व प्रतिनिधींशी बैठक यवतमाळ दि , 30 : सर्वांसाठी ‘सुलभ निवडणुका’ हे निवडणूक विभागाचे घोषवाक्य आहे. या माध्यमातून दिव्यांग मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी सर्व मतदान केंद्रावर सुविधा पुरविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एकही दिव्यांग मतदान मतदानापासून वंचित राहता कामा नये, यासाठी अधिकारी, कर्मचारी तसेच दिव्यांगांसाठी काम करणा-या संस्था व प्रतिनिधींनी या मतदारांपर्यंत पोहचावे, अशा सुचना विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी केल्या. नियोजन सभागृहात विधानसभा निवडणूक -2019 चा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक श्री. मनपिया आदी उपस्थित होते. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर रॅम्पची व्यवस्था करण्यात

अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघात मतदार नोंदणी कार्यक्रम जाहिर

यवतमाळ दि, 30 : भारत  निवडणूक आयोगाने दिनांक 1 नोव्हेंबर 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघात मतदार नोंदणी करण्याच्या कार्यक्रम घोषित केला आहे. विभागीय आयुक्त हे शिक्षक मतदार नोंदणी करण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तसेच सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हे त्या त्या जिल्ह्यासाठी काम करतील. भारत निवडणूक आयोगाने शिक्षक मतदार नोंदणी करण्यासाठी मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (3) अन्वये जाहिर सुचना प्रसिध्द करण्याचा मंगळवार दिनांक 1 ऑक्टोंबर 2019, मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची प्रथम पुर्नप्रसिध्दी मंगळवार दिनांक 15 ऑक्टोबर 2019, मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची द्वितीय पुर्नप्रसिध्दी शुक्रवार दिनांक 25 ऑक्टोबर 2019, नमुना 19 द्वारे दावे व हरकती स्विकारण्याचा अंतिम दिनांक बुधवार 6 नोव्हेंबर 2019, हस्तलिखीत तयार करणे व प्रारूप मतदार याद्यांची छपाई दिनांक मंग

विधानसभेसाठी जिल्ह्यात सात निवडणूक निरीक्षक

            यवतमाळ दि , 27 : जिल्ह्यातील वणी, राळेगाव, यवतमाळ, दिग्रस, आर्णि, पुसद आणि उमरखेड या विधानसभा मतदारसंघासाठी सात निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापैकी खर्च निवडणूक निरीक्षक म्हणून तीन, सामान्य निरीक्षक म्हणून तीन आणि कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक म्हणून एकाचा समावेश आहे.             76 – वणी, 77- राळेगाव आणि 78 – यवतमाळ विधानसभा मतदारसंघासाठी खर्च निरीक्षक म्हणून राजीव कुमार (मो. 9013131458), 79 – दिग्रस आणि 80 – आर्णि मतदारसंघासाठी खर्च निरीक्षक म्हणून मुकुंद कुमार (मो. 9930325634) तर 81- पुसद आणि 82 – उमरखेड विधानसभा मतदारसंघासाठी खर्च निरीक्षक म्हणून के. व्यंकदेश बाबू (मो. 9952668687) यांची नियुक्ती झाली आहे.             सामान्य निरीक्षक म्हणून 76 – वणी, 77- राळेगाव विधानसभा मतदारसंघासाठी आशिष सक्सेना (मो. 9425084677), 78 – यवतमाळ 79 – दिग्रस विधानसभा मतदारसंघासाठी सामान्य निरीक्षक म्हणून जे. आर. डोडीया (मो.9978408868) तर 80 – आर्णि, 81- पुसद आणि 82 – उमरखेड विधानसभा मतदारसंघासाठी सुशीलकुमार मौर्य (मो. 9415492975) यांची सामान्य निरीक्षक म्ह

निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रशासनाची सोशल मिडीयावर करडी नजर

Image
v विधानसभा क्षेत्रनिहाय उमेदवारांच्या डीजीटल प्लॅटफॉर्मवर राहणार लक्ष यवतमाळ दि , 27 : निवडणूक कालावधीत उमेदवारांकडून सोशल मिडीयाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात सोशल मिडीयाद्वारे करण्यात येणा-या जाहिरातींवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समाजमाध्यम नियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे. या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेदरम्यान सोशल मिडीयावर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. याशिवाय प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहाय उमेदवारांच्या डीजीटल प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवण्यासाठी तज्ज्ञाची नियुक्ती करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिका-यांना केल्या आहेत. समाजमाध्यम नियंत्रण समितीच्या माध्यमातून फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप आदी प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह मजकूर असल्यास त्याची त्वरीत दखल घेण्यात येईल. तसेच काही फेक अकाऊंटला शोधून त्यावर लक्ष ठेवणे. सोशल मिडीयावर समाज विघातक, आक्षेपार्ह, समाजात तेढ निर्माण करणारे, धार्मिक तसेच वैयक्तिक भावना दुखाविणा-या पोस्ट आढळल्यास संबंधितांवर माहिती व तंत्रज्ञान कायदान्वय

नवमतदार करू शकतात 4 ऑक्टोबरपर्यंत नोंदणी

Image
v जिल्हाधिका-यांनी घेतला ‘स्वीप’ जनजागृती मोहिमेचा आढावा यवतमाळ दि , 26 : महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक 21 ऑक्टोबर 2019 रोजी होणार आहे. यासाठी उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र भरण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर आहे. या तारखेपर्यंत जिल्ह्यातील नवमतदारांची नोंदणी सुरू राहणार असून नाव नोंदणी करण्याची ही शेवटची संधी आहे. त्यामुळे सर्व नवमतदारांनी 4 ऑक्टोबरपर्यंत आपली नावे नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. नागरिकांमध्ये मतदानासंदर्भात जनजागृती करण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने ‘स्वीप’ जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे उपस्थित होते. ‘स्वीप’ मोहीम हा निवडणूक आयोगाचा महत्वाचा कार्यक्रम आहे, असे सांगून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, ‘स्वीप’ अंतर्गत जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये सर्व विभागप्रमुखांसह सर्व गटविकास अधिकारी, तहसीलदार, नगर पालिका मुख्याधिकारी तसेच ग्रामसेवकसुध्दा सदस्य आहेत. आपापल्या कार्यालयात येणा-या नागरिकांना मतदानासा

27 सप्टेंबरपासून नामनिर्देशनपत्र भरण्यास सुरुवात

Image
यवतमाळ दि , 25 : विधानसभा निवडणूकीची अधिसुचना 27 सप्टेंबर रोजी प्रसिध्द करण्यात येत असून या दिनांकापासून उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र भरण्याला सुरुवात होईल. नामनिर्देशनपत्र छाननीच्या दिवसाच्या आधी 3 महिन्याच्या कालावधीतील 2 सेमीं X 2.05 सेंमी. आकाराचा उमेदवाराचा फोटो असणे आवश्यक आहे. पांढरी पृष्ठ भुमी असलेला आणि पूर्ण चेहरा दिसेल असा डोळे उघडे असलेला कृष्णधवल अथवा रंगीत छायाचित्राच्या मागील बाजूस स्वाक्षरी आवश्यक आहे. तसेच याबाबतचे विहीत नमुन्यातील सत्यापन देखील उमेदवार, त्यांचा ‍निवडणूक प्रतिनिधी अथवा सूचक यांच्याकडून घ्यावयाचे आहे. नामनिर्देशन पत्राकरीता राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांकरीता 1 सूचक व इतरांकरीता 10 सूचक लागतील. नाम‍निर्देशनाच्या कालावधीत विशेषत: शेवटच्या दिवशी उमेदवार अथवा सूचक सर्व कागदपत्रांसह 3 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात हजर असले पाहिजे. नंतर कागदपत्र दाखल करण्यासाठी अथवा इतर कोणत्याही कारणासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षात प्रवेश देता येणार नाही. सर्वसाधारण उमेदवारासाठी अनामत रक्कम 10 हजार रुपये व अनु.जाती / जमातीच्या उमेदवारासाठी अ

विधानसभेसाठी जिल्ह्यात एकूण 21 लक्ष 72 हजार मतदार - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने 23 Sep 2019

Image
Ø निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज Ø 2499 मतदान केंद्रांवर होणार मतदान यवतमाळ दि. 23 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली असून जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यात एकूण 21 लक्ष 72 हजार 205 मतदार असून 2499 मतदान केंद्रावर हे मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अपर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे उपस्थित होते. जिल्ह्यात दिव्यांग मतदारांची संख्या 5333 आहे, असे सांगून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, निवडणुकीच्या कामाकरीता सर्व मतदान केंद्रांवर एकूण 12 हजार 995 अधिकारी व कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सातही विधानसभा मतदार क्षेत्रासाठी जिल्ह्यात 4618 बॅलेट युनीट, 3429 कंट्रोल युनील आणि 3694 व्हीव्हीपॅट उपलब्ध झाले आहेत. निवडणूकीमध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी डिजीटल प्लॅटफार्मचा उपयोग करण्यात येणार असून यासाठी सी-व्हीजील ॲ

महिला बचत गटाचे बँक खाते उघडण्याची प्रक्रिया नियमित ठेवा - पालकमंत्री मदन येरावार

Image
यवतमाळ दि. 19 : विविध लिंकेजच्या माध्यमातून शासन महिला बचत गटांसाठी योजना राबविण्यात आले. याचा प्रत्यक्ष लाभ या बचत गटांना होत असून त्यांचे आर्थिक व्यवहार बँकांशी संलग्न आहेत. त्यामुळे महिला बचत गटासाठी बँक खाते असणे अत्यावश्यक झाले आहे. बँकांनी या गोष्टीकडे गांभिर्याने लक्ष देऊन महिला बचत गटाचे खाते उघडण्याची प्रक्रिया नियमित सुरू ठेवावी, अशा सुचना पालकमंत्री मदन येरावार यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात महिला बचत गटांच्या खात्यासंदर्भात आयोजित बँकर्सच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे आदी उपस्थित होते. बचत खाते उघडणे ही नियमित चालणारी प्रक्रिया आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, यात खंड पडू देऊ नका. रोजच्या कामाच्या व्यतिरिक्त्‍ महिला बचत गटांचे खाते उघडले जात आहे, हा संदेश जाणे गरजेचे आहे. यासाठी संबंधित पशुसखींनी लक्ष द्यावे. महिला बचत गटांचे सक्षमीकरण करण्याला शासनाचे प्राधान्य आहे. बचत गटांचे खेळते भांडवल 15 हजार रुपयांवरून 60 हजार रुपयांपर्यंत वाढ

७ कोटी ४ लाख १४ हजार रुपयाच्या विकास कामाचे भुमिपुजन पालकमंत्र्यांच्या हस्ते

Image
१ यवतमाळ दि , १९ : - नगर परिषद उमरखेडच्या वतीने शहरात विविध विकास योजने अंतर्गत मंजुर झालेल्या १७ कोटी ४ लाख १४ हजार रुपयाच्या एकुण ३२ विविध विकास कामांचे भुमिपुजन पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम आज रोजी नगर परिषद प्रांगण उमरखेड येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार राजेंद्र नजरधने, उपाध्यक्ष आदिवासी विकास महामंडळ तथा राज्यमंत्री दर्जा असलेले उत्तमराव इंगळे, उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडनिस, तहसिलदार रुपेश खंडारे, नितिन भुतडा, नगराध्यक्ष नामदेव ससाने मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, आणी नगर परिषदचे सर्व नगरसेवक आदि उपस्थित होते. पालकमंत्री पुढे बोलतांना म्हणाले, जिल्ह्याच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातुन विकास काम साधले.मागील ६० वर्षापासून गतीमंद झालेल्या विकास रथाचे चक्र गतिमान करणारे मोदीजींच्या नेतृत्वातील युतीचे सरकार होय. देशात व राज्यात जनहिताचे बेधडक निर्णय घेवून सर्वच क्षेत्रात विकास कार्याला प्राधान्य देणाऱ्या सरकारच्या पाठीशी जनता भक्कमपणे त्यांच्या पाठीशी असल्यामुळे विकासाचे श्रेय जनते

पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस विभागाच्या २३ कोटीच्या बांधकामाचे भुमिपुजन

Image
                यवतमाळ दि. १९ : महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्या. मुंबई यांचे कडून बांधण्यात येत असलेल्या उमरखेड येथील शहर पोलीस स्टेशन, उपविभागीय पोलीस अधिक्षक कार्यालय, पोलीस निरिक्षक कार्यालय व ८६ शासकीय निवासस्थाने बांधकामाचे भुमिपुजन पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार राजेंद्र नजरधने, उपाध्यक्ष आदिवासी विकास महामंडळ तथा राज्यमंत्री दर्जा असलेले उत्तमराव इंगळे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक नुरूल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास तोटावार, उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडनिस, तहसिलदार रुपेश खंडारे, भाजपा जिल्हाध्यक्ष नितिन भुतडा, नगराध्यक्ष नामदेव ससाने मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले, अधिक्षक अभियंता पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे दिपक सोनटक्के, ठाणेदार अनिल किनगे आदि उपस्थित होते. पालकमंत्री पुढे बोलतांना म्हणाले, सण उत्सवात जनतेचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी तो आपला आनंद म्हणून काम करतो तो पोलीस विभाग आहे. इंग्रजकालीन १८५७ साली तयार झालेल्या इमारतीत येथील पोलीस स्टेशनचा कार्यभार चालत आहे. आणी १९११ मध्ये तयार झालेल्या वसाहतीत राह

पोलिस विभागाच्या 12.50 कोटींच्या कामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भुमिपूजन

Image
यवतमाळ दि. 18 : यवतमाळ येथील पोलिस अधीक्षक कार्यालय, पळसवाडी पोलिस वसाहतीचे विस्तारीकरण तसेच यवतमाळ शहर पोलिस स्टेशन इमारतीच्या बांधकामाचे भुमिपूजन पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक नूरुल हसन, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लीवार उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभाग, यवतमाळ जिल्हा वार्षिक योजना सन 2019-20 अंतर्गत पोलिस अधीक्षक कार्यालयाच्य इमारतीचे विस्तारीकरण करण्याकरीता 5 कोटी रुपये, शहर पोलिस स्टेशनची नवीन इमारत बांधण्याकरीता 5 कोटी रुपये व पळसवाडी यवतमाळ येथील पोलिस अधिकारी, कर्मचारी निवासस्थानाचे विस्तारीकरण व अनुषंगिक कामाकरीता 2.49 कोटी रुपये असे एकूण 12 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व ठाणेदार, नगरसेवक जगदीश वाधवाणी, अजय राऊत, चंद्रभागा मडावी यांच्यासह पोलिस अधीक्षक कार्यालय, पोलिस मुख्यालय, शहर पोलिस स्टेशन, अवधुतवाडी,

निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिका-यांनी घेतला महसूल आणि पोलिस विभागाचा आढावा

Image
यवतमाळ दि. 17 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी महसूल आणि पोलिस विभागाचा आढावा नियोजन सभागृहात घेतला. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधिक्षक नुरूल हसन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे आदी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते, असे सांगून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, येणा-या काळात अतिशय समन्वयाने काम करावे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एक टीम म्हणून सर्वांनी उत्तम काम केले. यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शांततेत पार पडली. याच धर्तीवर आतासुध्दा महसूल, पोलिस आणि निवडणुकीशी संबंधित विभागाने गांभिर्याने काम करावे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर लक्ष केंद्रीत करून प्रलंबित प्रकरणे त्वरीत निकाली काढावी. निवडणुकीदरम्यान विविध परवानग्या एकाच ठिकाणावरून देण्याचे नियोजन करावे. अप्रिय घटना घडविण्याचा प्रयत्न करणारे किंवा जात / जमात याचा आधार घेऊन नागरिकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रकार कोठेही आढळल

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व पाणी फाऊंडेशन अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणा-या गावांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

Image
यवतमाळ दि. 16 : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व पाणी फाऊंडेशन अंतर्गत यवतमाळ जिल्ह्य़ात उल्लेखनीय कामगिरी   केल्याबद्दल 13 गावांचा पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शहरातील रॉयल पॅलेस येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या रेणुका शिंदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री. घोंगडे, महाराष्ट्र ग्राम सामजिक परिवर्तन अभियानचे जिल्हा समन्वयक अर्चना कुर्हे, प्रशांत कारमोरे, पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक अशोक बगाडे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व पाणी फाऊंडेशन अंतर्गत यवतमाळ जिल्ह्य़ात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल चौधरा, बरबडा, चापडोह, गोधणी, धानोरा बोथ, सावरगड, घोडखेंडी पांढरी, मुरझाडी चीचं, धानोरा, वडगांव, आकपुरी, जांब, किन्ही, धामणी गावाचा   सत्कार करण्यात आला. गावातील घरकुल योजना, पाणी पुरवठा योजना, सांडपाणी व व्यवस्थापन योजना, अटल कर्मा सन्मान योजना, आरोग्य शिबिर, वैयक्तिक शोषखडे, गावातील महिला बचत गट तयार करणे, त्यांना फंड उपलब्ध कर

सावरगड येथे फवारणीबाबत पथनाट्यातून जनजागृती

Image
यवतमाळ,दि.16 : तालुका कृषी अधिकारी कार्यालय व                                                                 कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्या वतीने सावरगड येथे सुरक्षित फवारणी व कपाशीवरील गुलाबी बोंडअळी व एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि कीटकनाशकांच्या फवारणीबाबत घ्यावयाची काळजी व उपाय योजनेसंदर्भात पथनाट्यातून जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ व बाल विवाह प्रतिबंधक आणि हुंडाबंदी जनजागृतीबाबतही कला पथकाद्वारे करण्यात आली.                     यावेळी कृषी विभागाकडून कला पथकाद्वारे गावातील शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळी नियंत्रण कसे करायचे याबद्दल प्रात्याक्षिके करून दाखविले. फेरोमोन ट्रॅप कशाप्रकारे लावणे, एकरी 5 ते 6 फेरोमोन ट्रॅप वापरण्याची पध्दत आणि कीड संगोपन यावर मार्गदर्शन करण्यात आले. कीटकनाशकांच्या फवारणीमुळे विषबाधा होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी व उपाययोजना जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. कलापथकाद्वारे   गावकऱ्यांना माहिती दिली गेली. कीटकनाशके नामांकित कंपनी कडून खरेदी करावी, डब्यावरील लाल हा अतिविषारी आहे, त्यानंतर पिवळा, निळा आणि नं

पालकमंत्र्यांच्या हस्ते वनभवन इमारतीचे उद्घाटन

Image
यवतमाळ दि. 16 : यवतमाळ वनवृत्ताअंतर्गत वनविभागाच्या एकूण सहा कार्यालयाकरीता बांधण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीचे (वनभवन) उद्घाटन पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रादेशिक वनसंरक्षक रविंद्र वानखेडे, उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, पुसदचे उपवनसंरक्षक अरविंद मुंडे, पांढरकवडा येथील उपवनसंरक्षक अभर्णा, सा.बा. विभागाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लीकर आदी उपस्थित होते. याप्रंसगी बोलतांना पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, वनभवन प्रशासकीय इमारतीमुळे वनविभागाच्या सर्व कार्यालयामध्ये उत्तम समन्वय साधला जाईल व शासकीय कामात गती येईल. सौर उर्जेवर आधारीत इमारत, वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर व हँगींग गार्डन या सारख्या संकल्पना राबविल्यास   ही इमारत एक ग्रीन बिल्डींग म्हणून ओळखली जाईल. वनविषयक बाबींचा प्रचार करून हरीत यवतमाळचे स्वप्न साकार होण्यास वनभवन एक मोलाचे योगदान ठरेल, असे त्यांनी सांगितले. वनभवन इमारतीकरीता 9.13   कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या इमारतीमध्ये यवतमाळ वनवृत्तातील वनसंरक्षक (प्रादेशिक) यवतमाळ कार्यालय, उपवनस