पालकमंत्र्यांच्या हस्ते वनभवन इमारतीचे उद्घाटन




यवतमाळ दि. 16 : यवतमाळ वनवृत्ताअंतर्गत वनविभागाच्या एकूण सहा कार्यालयाकरीता बांधण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीचे (वनभवन) उद्घाटन पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रादेशिक वनसंरक्षक रविंद्र वानखेडे, उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, पुसदचे उपवनसंरक्षक अरविंद मुंडे, पांढरकवडा येथील उपवनसंरक्षक अभर्णा, सा.बा. विभागाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लीकर आदी उपस्थित होते.
याप्रंसगी बोलतांना पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, वनभवन प्रशासकीय इमारतीमुळे वनविभागाच्या सर्व कार्यालयामध्ये उत्तम समन्वय साधला जाईल व शासकीय कामात गती येईल. सौर उर्जेवर आधारीत इमारत, वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर व हँगींग गार्डन या सारख्या संकल्पना राबविल्यास  ही इमारत एक ग्रीन बिल्डींग म्हणून ओळखली जाईल. वनविषयक बाबींचा प्रचार करून हरीत यवतमाळचे स्वप्न साकार होण्यास वनभवन एक मोलाचे योगदान ठरेल, असे त्यांनी सांगितले.
वनभवन इमारतीकरीता 9.13  कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या इमारतीमध्ये यवतमाळ वनवृत्तातील वनसंरक्षक (प्रादेशिक) यवतमाळ कार्यालय, उपवनसंरक्षक (प्रादेशिक) कार्यालय, उपवनसंरक्षक कार्य आयोजना विभाग, विभागीय वन अधिकारी (सामाजिक वनीकरण) कार्यालय, विभागीय व्यवस्थापक, वनविकास महामंडळ, विभागीय वन अधिकारी मुल्यांकन विभाग या कार्यालयांचा समावेश राहणार आहे. या कार्यालयातील एकूण 153 अधिकारी व कर्मचारी येथे कार्यालयीन कामकाज करतील.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे यांनी केले. संचालन वनरक्षक प्रांजली दांडगे यांनी तर आभार वनपरिक्षेत्र अधिकारी प्रिया गुल्हाने यांनी मानले. कार्यक्रमाला सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी आर.व्ही.गौपाल, विभागीय व्यवस्थापक पी.एन.वाघ यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी