मुख्यमंत्री समाधान शिबिराच्या अनुषंगाने आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके यांनी घेतला आढावा





यवतमाळ दि. 12 : राळेगाव तालुक्यातील वडकी परिसरात दि. 18 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या अनुषंगाने आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पांढरकवडा येथील उपवनसंरक्षक के. अभर्णा, अपर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.
या शिबिरामध्ये शासनाच्य विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा सत्कार, नागरिकांची आरोग्य तपासणी, मुद्रा बँक योजनेंतर्गत माहिती देण्यात येईल. याशिवाय पंतप्रधान स्वयंरोजगार योजना, कृषी विभागाच्या योजना, एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या योजना तसेच विविध विभागाच्या स्टॉलच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. सर्व विभाग प्रमुखांनी आपापल्या विभागाची माहिती अपटेड ठेवून माहितीची पत्रके, योजनांचे फलक आदी स्टॉलमध्ये दर्शनी भागात लावावे. तसेच स्टॉलच्या माध्यमातून नागरिकांना योजनांचा लाभ द्यावा, अशा सुचना आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिल्या. विभाग प्रमुखांना देण्यात आलेली जबाबदारी गांभिर्याने पार पाडावी. सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी करायचा असल्याने प्रत्येकाने याबाबत जागरूक राहावे, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीला उपजिल्हाधिकारी सविता चौधर, विद्युत विभागाचे अधिक्षक अभियंता सुरेश मडावी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजय भगत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
०००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी