विधानसभेसाठी जिल्ह्यात सात निवडणूक निरीक्षक



            यवतमाळ दि , 27 : जिल्ह्यातील वणी, राळेगाव, यवतमाळ, दिग्रस, आर्णि, पुसद आणि उमरखेड या विधानसभा मतदारसंघासाठी सात निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापैकी खर्च निवडणूक निरीक्षक म्हणून तीन, सामान्य निरीक्षक म्हणून तीन आणि कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक म्हणून एकाचा समावेश आहे.
            76 – वणी, 77- राळेगाव आणि 78 – यवतमाळ विधानसभा मतदारसंघासाठी खर्च निरीक्षक म्हणून राजीव कुमार (मो. 9013131458), 79 – दिग्रस आणि 80 – आर्णि मतदारसंघासाठी खर्च निरीक्षक म्हणून मुकुंद कुमार (मो. 9930325634) तर 81- पुसद आणि 82 – उमरखेड विधानसभा मतदारसंघासाठी खर्च निरीक्षक म्हणून के. व्यंकदेश बाबू (मो. 9952668687) यांची नियुक्ती झाली आहे.
            सामान्य निरीक्षक म्हणून 76 – वणी, 77- राळेगाव विधानसभा मतदारसंघासाठी आशिष सक्सेना (मो. 9425084677), 78 – यवतमाळ 79 – दिग्रस विधानसभा मतदारसंघासाठी सामान्य निरीक्षक म्हणून जे. आर. डोडीया (मो.9978408868) तर 80 – आर्णि, 81- पुसद आणि 82 – उमरखेड विधानसभा मतदारसंघासाठी सुशीलकुमार मौर्य (मो. 9415492975) यांची सामान्य निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.
            कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून पी. विजयन (मो. 9497997998) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी