पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस विभागाच्या २३ कोटीच्या बांधकामाचे भुमिपुजन




               
यवतमाळ दि. १९ : महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्या. मुंबई यांचे कडून बांधण्यात येत असलेल्या उमरखेड येथील शहर पोलीस स्टेशन, उपविभागीय पोलीस अधिक्षक कार्यालय, पोलीस निरिक्षक कार्यालय व ८६ शासकीय निवासस्थाने बांधकामाचे भुमिपुजन पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार राजेंद्र नजरधने, उपाध्यक्ष आदिवासी विकास महामंडळ तथा राज्यमंत्री दर्जा असलेले उत्तमराव इंगळे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक नुरूल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास तोटावार, उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडनिस, तहसिलदार रुपेश खंडारे, भाजपा जिल्हाध्यक्ष नितिन भुतडा, नगराध्यक्ष नामदेव ससाने मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले, अधिक्षक अभियंता पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे दिपक सोनटक्के, ठाणेदार अनिल किनगे आदि उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे बोलतांना म्हणाले, सण उत्सवात जनतेचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी तो आपला आनंद म्हणून काम करतो तो पोलीस विभाग आहे. इंग्रजकालीन १८५७ साली तयार झालेल्या इमारतीत येथील पोलीस स्टेशनचा कार्यभार चालत आहे. आणी १९११ मध्ये तयार झालेल्या वसाहतीत राहून येथील पोलीस कर्मचारी काम करत आहे. वसाहत चांगली असेल तर काम सुद्धा चांगले करता येईल आणी परीवार आनंदी राहील. महाराष्ट्राचा सर्वांगीन विकास होत असतांना पोलीस विभाग मागे राहणार नाही तर पोलीस विभागाच्या सर्व सोईवर देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.
000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी