अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघात मतदार नोंदणी कार्यक्रम जाहिर



यवतमाळ दि, 30 : भारत  निवडणूक आयोगाने दिनांक 1 नोव्हेंबर 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघात मतदार नोंदणी करण्याच्या कार्यक्रम घोषित केला आहे. विभागीय आयुक्त हे शिक्षक मतदार नोंदणी करण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तसेच सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हे त्या त्या जिल्ह्यासाठी काम करतील. भारत निवडणूक आयोगाने शिक्षक मतदार नोंदणी करण्यासाठी मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे.
मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (3) अन्वये जाहिर सुचना प्रसिध्द करण्याचा मंगळवार दिनांक 1 ऑक्टोंबर 2019, मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची प्रथम पुर्नप्रसिध्दी मंगळवार दिनांक 15 ऑक्टोबर 2019, मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची द्वितीय पुर्नप्रसिध्दी शुक्रवार दिनांक 25 ऑक्टोबर 2019, नमुना 19 द्वारे दावे व हरकती स्विकारण्याचा अंतिम दिनांक बुधवार 6 नोव्हेंबर 2019, हस्तलिखीत तयार करणे व प्रारूप मतदार याद्यांची छपाई दिनांक मंगळवार 19 नोव्हेंबर 2019, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी दिनांक शनिवार 23 नोव्हेंबर 2019, दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर 2019 ते सोमवार दिनांक 9 डिसेंबर 2019, दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे छपाई करणे गुरुवार दिनांक 26 डिसेंबर 2019 आणि मतदार याद्यांची अंतिम प्रसिध्दी सोमवार दिनांक 30 डिसेंबर 2019 रोजी करण्यात येईल.
अमरावती विभागातील सर्व तहसिलदार यांना पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे पात्र शिक्षकांना विहीत नमुन्यात मतदार नोंदणी करावी. सदर मतदार यादी नव्याने तयार होत असल्यामुळे सर्व पात्र शिक्षकांनी मतदार नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याकरीता त्यांनी स्थानिक तहसिल / उपविभागीय अधिकारी / जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपली मतदार नोंदणी, त्यांचे कार्यक्षेत्रातील तहसिल कार्यालयात दिनांक 1 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2019 या कालावधीत करावी, असे मतदार नोंदणी अधिकारी शिक्षक मतदार संघ तथा विभागीय आयुक्त, अमरावती यांचे वतीने आवाहन करण्यात येत आहे.
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी