७ कोटी ४ लाख १४ हजार रुपयाच्या विकास कामाचे भुमिपुजन पालकमंत्र्यांच्या हस्ते
१
यवतमाळ दि , १९ : - नगर परिषद उमरखेडच्या वतीने शहरात
विविध विकास योजने अंतर्गत मंजुर झालेल्या १७ कोटी ४ लाख १४ हजार रुपयाच्या एकुण
३२ विविध विकास कामांचे भुमिपुजन पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात
आले. हा कार्यक्रम आज रोजी नगर परिषद प्रांगण उमरखेड येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी आमदार राजेंद्र नजरधने, उपाध्यक्ष आदिवासी
विकास महामंडळ तथा राज्यमंत्री दर्जा असलेले उत्तमराव इंगळे, उपविभागीय अधिकारी
स्वप्नील कापडनिस, तहसिलदार रुपेश खंडारे, नितिन भुतडा, नगराध्यक्ष नामदेव ससाने
मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, आणी नगर परिषदचे सर्व
नगरसेवक आदि उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे बोलतांना म्हणाले, जिल्ह्याच्या
विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातुन विकास काम साधले.मागील ६० वर्षापासून
गतीमंद झालेल्या विकास रथाचे चक्र गतिमान करणारे मोदीजींच्या नेतृत्वातील युतीचे
सरकार होय. देशात व राज्यात जनहिताचे बेधडक निर्णय घेवून सर्वच क्षेत्रात विकास
कार्याला प्राधान्य देणाऱ्या सरकारच्या पाठीशी जनता भक्कमपणे त्यांच्या पाठीशी
असल्यामुळे विकासाचे श्रेय जनतेलाच जाते. नागरिकांनीही विविध योजनांचा लाभ घेवून
सुखी व समृद्ध व्हावे. ज्या संस्कृतीने आपल्याला एकत्रित जवळ आनले त्या संस्कृतीचा
आपण आदर केला पाहीजे असे त्यांनी यावेळी सांगीतले . या कार्यक्रमाचे संचालन नगर
परिषदचे विशाल गिरी यांनी करून आभार बांधकाम सभापती कविता मारोडकर यांनी मानले.
000000000


Comments
Post a Comment