महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व पाणी फाऊंडेशन अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणा-या गावांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार




यवतमाळ दि. 16 : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व पाणी फाऊंडेशन अंतर्गत यवतमाळ जिल्ह्य़ात उल्लेखनीय कामगिरी  केल्याबद्दल 13 गावांचा पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शहरातील रॉयल पॅलेस येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या रेणुका शिंदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री. घोंगडे, महाराष्ट्र ग्राम सामजिक परिवर्तन अभियानचे जिल्हा समन्वयक अर्चना कुर्हे, प्रशांत कारमोरे, पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक अशोक बगाडे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व पाणी फाऊंडेशन अंतर्गत यवतमाळ जिल्ह्य़ात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल चौधरा, बरबडा, चापडोह, गोधणी, धानोरा बोथ, सावरगड, घोडखेंडी पांढरी, मुरझाडी चीचं, धानोरा, वडगांव, आकपुरी, जांब, किन्ही, धामणी गावाचा  सत्कार करण्यात आला. गावातील घरकुल योजना, पाणी पुरवठा योजना, सांडपाणी व व्यवस्थापन योजना, अटल कर्मा सन्मान योजना, आरोग्य शिबिर, वैयक्तिक शोषखडे, गावातील महिला बचत गट तयार करणे, त्यांना फंड उपलब्ध करून देणे, बचत गटामार्फत रोजगार निर्मिती करणे, सार्वजनिक रस्ते बांधकाम योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना, शाळा डिजिटल करणे तसेच गावात विविध उपक्रम राबविणे या कामांचा यात समावेश होता.
मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक अभियान अंतर्गत येणाऱ्या गावात चांगल्याप्रकारे काम केल्याबदल ग्राम परिवर्तक व जिल्हा समन्वयक अर्चना कुर्हे, प्रशांत कारमोरे, ग्राम परिवर्तक दिनेश खडसे, मनीष मानकर, वैभव इंझरकर, अमित बनसुडे, रविकिरण सूर्यवंशी, गणेश झिंगरे, देवेंद्र हत्तीमारे, प्रतीक हेडाऊ, मंगेश सोनवाने, कांचन ठाकरे, विठ्ठल गोरे, मोनिका चौधरी, श्रद्धा दुधे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गावात उमेद अंतर्गत महिला बचत गट व ग्रामसंघांनी केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल आणि गावातील मागील 3 वर्ष पाणी फाऊंडेशन अंतर्गत काम करणा-या जलयोध्दांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी पालकमंत्री म्हणाले, महाराष्ट्र ग्राम सामजिक परिवर्तन अभियान व पाणी फाउंडेशन यांनी गावासाठी खूप छान काम केले आहे. पाणी फाऊंडेशनने गाव पाणीदार बनविण्यात खूप मोठं योगदान दिले असून महिला बचत गटाचे कामसुध्दा वाखानण्याजोगे आहे. तर प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी, रमाई, पारधी, कोलाम घरकुल योजना समजून सांगितल्या.
कार्यक्रमाला पाणी फाऊंडेशन यवतमाळ टीम, संपूर्ण उमेद टीम, गावातील सरपंच, 13 गावातील मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक व बचत गटातील महिला व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी