पोलिसांनी केले दोन गुंडांना स्थानबध्द


v सण/उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी कार्यवाही
यवतमाळ दि. 2 : जिल्ह्यात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. या दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच सण / उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी गुंडांवर कारवाईचा धडाका लावला आहे. याच पार्श्वभुमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या ॲन्टी गँगसेलने दोन गुंडावर कारवाई करून दोघांनाही जिल्हा कारागृह येथे स्थानबध्द केले आहे.
सण / उत्सवाच्या काळात जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही तसेच सार्वजनिक शांतता अबाधित राहावी, यासाठी पोलिसांकडून काळजी घेण्यात येत आहे. याच अनुषंगाने टोळी गुन्हेगारीचे सदस्य असलेले व शरीराविरुध्द गुन्हे करणारे अंकूश अरुण ढोके (वय 22), रा. तारपुरा आठवडी बाजार यवतमाळ आणि शेख असलम शेख शराफत (वय 24), रा. डेहनकर ले-आऊट, भोसा रोड, यवतमाळ या दोघांनाही स्थानबध्द करण्यात आले आहे.
आगामी सण / उत्सव काळात या दोन्ही गुंडांकडून सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहचण्याची शक्यता असल्याने या गुन्हेगारांविरुध्द पोलिस उपनिरीक्षक भोयर यांनी कलम 151 (3) दंड प्रक्रिया संहिताप्रमाणे प्रतिवृत्त तयार करून न्यायालयात सादर केले. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यवतमाळ यांनी दोन्ही आरोपितांना 12 सप्टेंबर 2019 पर्यंत स्थानबध्द करण्याचे आदेश निर्गमीत केले. त्यानुसार दोन्ही आरोपीविरुध्द कारवाई करण्यात येऊन त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे.
सदर कारवाई पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधिक्षक नरुल हसन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक मंगेश भोयर, सहाय्यक फौजदार ऋषी ठाकूर, पोलिस हवालदार संजय दुबे, विनोद राठोड, पोलिस शिपाई जयंत शेंडे, योगेश गटलेवार, गणेश देवतळे यांनी पार पाडली.
00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी