आदिवासी विकास मंत्र्यांची कळंब येथील मुलींच्या वसतीगृहाला भेट





      यवतमाळ दि. 13 : कळंब येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतीगृहाला आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी भेट देऊन विद्यार्थीनींसोबत संवाद साधला. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त विनोद पाटील, प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, गृहपाल सी.एम.पोलेवार आदी उपस्थित होते.
            यावेळी डॉ. अशोक उईके यांनी वसतीगृहातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, किचन, शौचालय आदींची पाहणी केली. जेवण व्यवस्थित मिळते काय, आरोग्य तपासणी नियमित होते काय, डीबीटीचे पैसे मिळाले काय, या निधीमुळे काय फायदा झाला, असे त्यांनी विद्यार्थीनींना विचारले असता विज्ञान शाखेची पदवी घेणारी व या वसतीगृहात राहत असलेली दुर्गा रमेश जुकनाके (रा. डिगडोह, ता. देवळी, जि. वर्धा) म्हणाली, शासनाच्या डीबीटी योजनेमुळे विद्यार्थ्यांचा फायदाच झाला आहे. पूर्वीसुध्दा येथे सुविधा मिळत होत्या. आता मात्र डीबीटी योजनेमुळे शैक्षणिक साहित्य व इतर वस्तु स्वत:च्या मनाप्रमाणे घेता येतात. यासाठी मिळणारा निधी पर्याप्त आहे. या वसतीगृहात स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी पुस्तके तसेच इंटरनेट जोडणीसह संगणक कक्ष पाहिजे, अशी मागणी विद्यार्थीनींनी केली.
            विद्यार्थीनींना मार्गदर्शन करतांना डॉ. अशोक उईके म्हणाले, विद्यार्थीनींनो चांगला अभ्यास करा. या विभागाचे नाव मोठे करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. येथे एका कुटुंबाप्रमाणे रहा. काही प्रश्न किंवा अडचणी असतील तर गृहपालांना सांगा. त्याच तुमच्या कुटुंबप्रमख आहे. आरोग्याची तपासणी व इतर काही कमतरता असेल तर त्वरीत सांगा. स्वत: शिकून मोठे झाले की आई-वडीलांना सन्मान मिळेल, याची जाणीव ठेवा, असे ते म्हणाले. या वसतीगृहात पुस्तकांची व संगणकाची सुविधा देण्याच्या सुचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी