सावरगड येथे फवारणीबाबत पथनाट्यातून जनजागृती




यवतमाळ,दि.16 : तालुका कृषी अधिकारी कार्यालय व                                                               कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्या वतीने सावरगड येथे सुरक्षित फवारणी व कपाशीवरील गुलाबी बोंडअळी व एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि कीटकनाशकांच्या फवारणीबाबत घ्यावयाची काळजी व उपाय योजनेसंदर्भात पथनाट्यातून जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. तसेच बेटी बचाओ बेटी पढाओ व बाल विवाह प्रतिबंधक आणि हुंडाबंदी जनजागृतीबाबतही कला पथकाद्वारे करण्यात आली.                   
यावेळी कृषी विभागाकडून कला पथकाद्वारे गावातील शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळी नियंत्रण कसे करायचे याबद्दल प्रात्याक्षिके करून दाखविले. फेरोमोन ट्रॅप कशाप्रकारे लावणे, एकरी 5 ते 6 फेरोमोन ट्रॅप वापरण्याची पध्दत आणि कीड संगोपन यावर मार्गदर्शन करण्यात आले.
कीटकनाशकांच्या फवारणीमुळे विषबाधा होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी व उपाययोजना जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. कलापथकाद्वारे  गावकऱ्यांना माहिती दिली गेली. कीटकनाशके नामांकित कंपनी कडून खरेदी करावी, डब्यावरील लाल हा अतिविषारी आहे, त्यानंतर पिवळा, निळा आणि नंतर हिरवा हा आपल्यासाठी कमीत कमी विषारी आहे असे सांगण्यात आले.  रंगाच्या पंतगीच्या आकाराचे चिन्हे असलेली किटकनाशके सर्वात विषारी असून लाल वापरायचा नाही. गावातील शेतकऱ्यांना फवारणी करताना संरक्षण कपडे किट वापरावे. बूट, हात मोजे, नाक व तोंडावरील मास्क, डोळ्यावरील चष्म्या, डोक्यावर टोपी या गोष्टीचा वापर करावा व फवारणी करतांना हवेच्या दिशेने फवारणी करावी. फवारणी सकाळी किंवा सायंकाळी करावी. विषबाधा झाल्यास त्याला तात्काळ डॉक्टरकडे नावे, फवारणी करत असताना तंबाखू ,खर्रा न खाणे व सिगारेट पिणे टाळावे, जेवना अगोदर हात स्वच्छ धुवावे व कीटकनाशकांचे द्रावण कसे तयार करता येईल याबाबत गावकऱ्यांना माहिती देण्यात आली. 
यावेळी बेटी बचाओ बेटी पढाओ, बाल विवाह प्रतिबंधक कार्यक्रमाची जनजागृती व हुंडाबंदी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. लहान मुलांची आरोग्य तपासणी करणे, हिवताप, मलेरिया, कावीळ, क्षयरोग, पाण्यापासून होणारे रोग यासारख्या आजारावर उपाय योजना  करणे, अंगणवाडी व शाळा यांना योग्य आहाराबद्दल माहिती देणे, माता मृत्यू दर कमी करणे, नवजात शिशु बालकांचे मृत्यु थांबविणे, बाल विवाह बंदी व  कुटुंब नियोजन यासाठी विशेष उपाय योजना आदी योजना यावेळी सांगण्यात आल्या.              
कार्यक्रमाला सरपंच हरिद्वार खड़के, उपसरपंच सुहास सरगर, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेचे सचिन पाईकराव, संतोष बाविस्कर, मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक मनीष मानकर, ग्रामपंचायत  सदस्य तसेच मोठया संख्येनी गावातील शेतकरी, महिला, पुरुष व बाल मंडळी उपस्थित होते. सदर पथनाट्यात यवतमाळ येथील लोक शाहीर श्री अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय संस्थेचे कलावंत गजानन वानखेडे यांच्यासह त्यांच्या पथकातील सदस्यांचा समावेश होता.
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी