Posts

Showing posts from February, 2024

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सभेस अलोट जनसागर

यवतमाळ जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण व लाभ वितरण कार्यक्रमासाठी आलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेला अभूतपूर्व जनसागर लोटला होता. या सभेला जिल्हाभरातील बचत गटाच्या महिलांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधणारी होती. यवतमाळ शहराजवळील डोरली येथे आयोजित प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या सभेला जिल्ह्यातील अंदाजित तीन लाखहून अधिक महिला, शेतकरी, युवकांची उपस्थिती लक्षणीय ठरली. या कार्यक्रमात वर्धा - कळंब रेल्वे मार्ग या टप्प्याचे लोकार्पण व नवीन रेल्वे गाडीचा शुभारंभ, न्यू आष्टी-अंमळनेर रेल्वे, अंमळनेर- न्यू आष्टी स्टेशनपर्यंत विस्तारित रेल्वे सेवेचा शुभारंभ, इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी मोदी आवास योजनेचा शुभारंभ, पीएम किसान सन्मान निधीच्या १६ व्या हप्त्याचे थेट बँक खात्यात वितरण, नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे वितरण, यवतमाळ येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरण, आयुष्मान भारत अंतर्गत महाराष्ट्रात एक कोटी आयुष्मान कार्डचे वितरण, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिला बचत गटांना फिरत्या निधीचे वितरण, प

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते वर्धा ते कळंब रेल्वेगाडीचा शुभारंभ

वर्धा-यवतमाळ- नांदेड या रेल्वे मार्गावरील वर्धा ते कळंब या रेल्वे गाडाची शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. यावेळी वर्धा ते कळंब दरम्यान धावणाऱ्या विशेष ट्रेनला प्रधानमंत्र्यांनी हिरवी झेंडी दाखवून डिजिटली उद्घाटन केले. शुभारंभाप्रसंगी कळंब रेल्वे स्थानकावर खा.रामदास तडस उपस्थित होते. वर्धा –यवतमाळ- नांदेड असा नवीन रेल्वे मार्ग झाला असून आज दि. 28 फेब्रुवारी रोजी या मार्गावरील वर्धा ते कळंब या टप्प्याचे लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्याहस्ते झाले. लोकार्पणाप्रसंगीच वर्धा ते कळंब रेल्वेगाडी देखील सुरु करण्यात आली. शुभारंभाप्रसंगी कळंब रेल्वे स्थानकावर खासदार रामदास तडस, रेल्वे अधिकारी आणि स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते. शुभारंभानंतर दि. 29 फेब्रुवारीपासून वर्धा ते कळंब ट्रेन क्रमांक 51119 आणि कळंब ते वर्धा ट्रेन क्रमांक 511120 च्या नियमित सेवा सुरू होणार आहेत. या गाड्या रविवार आणि बुधवार वगळता आठवड्यातून पाच दिवस चालतील, याशिवाय या गाड्या देवळी आणि भिडी स्थानकावर नियोजित थांबे असतील आणि मार्गावरील प्रवाशांच्या गरजा पूर्ण करतील. थांबे हे धोरणात्मक स्थान विविध

जात पडताळणी समितीच्यावतीने त्रुटी शिबिराचे आयोजन

आद्य क्रांतीविर राजे उमाजी नाईक प्रमाणपत्र अभियान अंतर्गत जात वैधता प्रमाणपत्र विशेष मोहिम दिनांक 26 फेब्रवारी ते 11 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. त्याअंतर्गत या कालावधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने त्रुती पुर्तता शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. अभियानांतर्गत दि.1 मार्च, दि.7 मार्च व दि.12 मार्च रोजी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॅा.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलिस दक्षता भवनामागे, दारव्हा रोड, यवतमाळ येथे त्रृती पुर्तता शिबीर घेण्यात येणार आहे. या कालावधीत 12 ते 5 वाजतापर्यंत ज्या अर्जदारांना समितीकडून त्रुटी पुर्ततेबाबत पत्राने, एसएमएस व ई-मेलद्वारे कळविण्यात आल आहे, त्या सर्व अर्जदरांनी उपरोक्त कालावधीत सर्व मुळ कागदपत्रासह समिती कार्यालयात उपस्थित राहणे आवश्यक आहे. सदर त्रुटी पुर्ततेकरीता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने विशेष सुनावनी कक्षाची निर्मीती देखील करण्यात आली आहे. या शिबीराचा जास्तीत जास्त अर्जदरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीचे समितीचे अध्यक्ष तथा निवडश्रेणी अतिरिक्त जिल्हाधिकारी लक्ष्

अनाथ बालकांसाठी ५ मार्चपर्यंत ‘अनाथ पंधरवाडा’

यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनाथ बालकांसाठी ५ मार्चपर्यंत अनाथ पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रभाकर उपरे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा बाल संरक्षण कक्षामध्ये समर्पित कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये अनाथ मुलांना राज्य शासनाच्या विविध सवलतीचा लाभ घेता यावा व अनाथ प्रमाणपत्र काढण्यासाठी मदत केली जाणार आहे. एक टक्के आरक्षणाचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने महिला व बाल विकास विभागामार्फत संस्थात्मक व संस्थाबाह्य प्रवर्गातून अनाथ प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येत आहे. यासाठी अर्जदाराच्या आई व वडील यांचा मृत्यूचा दाखला, अर्जदाराचा जन्म दाखला, सरपंच, पोलीस पाटील, सरपंच यांचा बालकाचे अनाथ प्रमाणपत्र सिद्ध करण्यासाठी दाखला, ग्रामपंचायतचा रहिवासी दाखला, आधारकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला व जात प्रमाणपत्र इत्यादीची आवश्यकता आहे. तसेच शासनाच्या इतर योजनांसाठी राशन कार्ड, जात प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचा दाखला, मतदान कार्ड, राज्य वय व अधिवास दाखला आदी कागदपत्रे या अनाथ पंधरवाड्यात मिळवून देण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून कार्

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी शिबिराचे आयोजन

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी, समिती कार्यालयात आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक प्रमाणपत्र अभियानांतर्गत दि. १ मार्च ,७ मार्च व १२ मार्च रोजी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, यवतमाळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलीस दक्षता भवनामागे दारव्हा रोड, यवतमाळ येथे शिबिराचे आयोजन केलेले आहे. या कालावधीत १२ ते ५ वाजेपर्यंत ज्या अर्जदारांना समितीकडून त्रुटी पुर्तेतेबाबत पत्राने, एसएमएस व ई- मेल व्दारे कळविले आहे. त्या सर्व अर्जदारांनी उपरोक्त कालावधीत सर्व मुळ कागदपत्रासह समिती कार्यालयात उपस्थित रहावे. या त्रुटी पुर्ततेसाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, यवतमाळ यांनी विशेष सुनावणी कक्षाची निर्माती केलेली आहे. या शिबीराचा जास्तीत जास्त अर्जदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीचे समितीचे अध्यक्ष अति. जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, उपायुक्त तथा सदस्य प्राजक्ता इंगळे, व संशोधन अधिकारी मंगला मुन यांनी केले आहे. 000

प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी पुर्ण

Image
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दि.28 फेब्रुवारी रोजी येथे आयोजित कार्यक्रमाची तयारी पुर्ण झाली आहे. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व पालकमंत्री संजय राठोड यांनी कार्यक्रमस्थळाला भेट देऊन पाहणी केली व तेथेच तयारीचा आढावा घेतला. यावेळी आ.मदन येरावार, आ.डॅा.अशोक उईके, आ.संजीवरेड्डी बोदकुरवार, आ.निलय नाईक, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॅा.निधि पाण्डेय, जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक डॅा.पवन बन्सोड यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मंत्रिमहोदयांनी स्टेज, मंडप, बैठक व्यवस्था, सुरक्षा, स्क्रीन, साऊंड आदींची पाहणी केली. त्यानंतर येथेच सर्व विभागप्रमुख अधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा घेतला. जी कामे शिल्लक असतील ती आज सायंकाळपर्यंत पुर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मंडपात उभारण्यात आलेल्या कक्षांमध्ये पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी, महिलांकरीता फिरती स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. प्रत्येक गावातून बसमध्ये कार्यक्रमस्थळी येणाऱ्या महिलांसाठी बसमध्येच खाद्य पदा

भुईमूगावरील तंबाखूचे पान खाणाऱ्या अळी किडीचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन

सद्यस्थितीत भुईमूग पीकावर काही ठिकाणी तंबाखूचे पान खाणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव कमी अधिक प्रमाणात दिसून येत असून या किडींचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या किडीची मादी पतंग पानाच्या पृष्ठभागावर पुंजक्याने अंडी घालते व त्या अंडीतून निघालेल्या अळ्या सामुहिकपणे पानाचा हिरवा भाग कुरतडून खातात त्यामुळे अशी पाने जाळीदार होतात. अति जास्त प्रादुर्भाव झाल्यास मोठ्या अळ्या झाडाच्या पानांना फक्त शिराच शिल्लक ठेवतात. त्यामुळे या किडीच्या व्यवस्थापनासाठी अंडी पुंज व जाळीदार पाने तोडून नष्ट करावीत, प्राथमिक स्वरूपाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी, किडीच्या सर्वेक्षाना करिता एकरी २ ते ३ कामगंध सापळे लावावेत. या किडीने आर्थिक नुकसानीची पातळी पिक फुलावर येण्यापूर्वी ३ ते ४ लहान अळ्या प्रती मीटर ओळीत आढळल्यास पुढीलपैकी कोणत्याही एका केंद्रीय कीटकनाशक मंडळ फरीदाबाद शिफारशीत कीटकनाशकाची फवारणी करावी. कीटकनाशकामध्ये फ्लुबेन्डायमाईड २० % डब्लुजी ६ ग्राम प्रती १० लिटर पाणी, मेथॅाक्सीफेनाझाईड २१.८ % एससी मात्रा १७.५ मिली प्रती १० लिटर पाणी, फ्लुबेन्डायमाईड ३.५० %

वसतिगृह, निवासी शाळेतील वि‌द्यार्थ्यांना साखरयुक्त फ्लेवर्ड दुध पुरवठादारांकडून दरपत्रक आमंत्रित

सामाजिक न्याय विभागांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहे व निवासी शाळेतील प्रवेशित वि‌द्यार्थ्यांना साखरयुक्त फ्लेवर्ड दुध बॉटलद्वारे पुरवठा करण्यासाठी संबंधित शासकीय वसतिगृहे व निवासी शाळा येथे दि. २ मार्चपर्यंत दरपत्रके सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरपत्रके सादर करतांना सोबत जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र, जीएसटीआर-९/३बी प्रमाणपत्र, पॅन नंबर, अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ प्रमाणपत्र, व्यवसाय कर प्रमाणपत्र, तीन वर्षाचे आयकर प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, मागील तीन वर्षाचे ताळेबंद, शॉप अॅक्ट नोंदणी प्रमाणपत्र, जीएसटी क्लिअरन्स प्रमाणपत्र असावे. प्रमाणपत्र व दरपत्रके हे दोन बंद लिफाफ्यावर शासकीय वसतिगृह, निवासी शाळेचे नाव नमूद करुन सादर करावे तसेच बंद लिफाफ्यामध्ये एक तांत्रिक बाबीचा लिफाफा व दुसरा दरपत्रकाचा, दराचा लिफाफा असणे आवश्यक आहे. ०००

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत १५० जणांना प्रशिक्षण ; अर्ज आमंत्रित

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम बारा पोट जातीतील प्रशिक्षणासाठी या आर्थिक वर्षाकरिता १५० प्रशिक्षणार्थीचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. विविध प्रशिक्षणासाठी मातंग समाज व तत्सम बारा पोट जातीतील प्रशिक्षणार्थींनी विहित नमुन्यातील अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा अर्ज महामंडळाच्या जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पळसवाड़ी कॅम्प, दारव्हा रोड यवतमाळ येथे करावे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी हा मातंग समाजाचा व तत्सम बारा पोट जातीतील असावा. तो महाराष्ट्रातील रहिवासी असून वय १८ ते ५० असावे. प्रशिक्षणार्थीने या पूर्वी शासनाच्या महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसून वार्षिक उत्पन्न ३ लाखापेक्षा नसावे, तसेच आधार कार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशिल सादर करावा. दिव्यांग प्रशिक्षणार्थीना ५ टक्के आरक्षणानुसार प्राधान्य देण्यात येईल. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, राशनकार्ड, आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्र, आधार लिंक पासबुक प्रत,

जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवारी

जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार दि. ४ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन (बचत भवन) येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. 000

ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदेविषयक प्रबोधन शिबीर

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण़ व ज्येष्ठ नागरीक मंडळ, यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने २२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता "जेष्ठ नागरिक कायदा आणि योजना " या विषयावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यवतमाळ येथे कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश व. स्तर, यवतमाळचे सचिव के.ए. नहार, प्रमुख वक्ते म्हणुन पॅनल वकील अजय चमेडिया हे होते. तर मंचावर उपस्थित प्रमुख अतिथी अध्यक्ष कृष्णराव माकोडे, माजी अध्यक्ष बळवंत चिंतावार हे उपस्थीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृष्णराव माकोडे यांनी तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणुन अजय चमेडिया यांनी आई वडील व ज्येष्ठ नागरीक यांचे चरीतार्थ व कल्याणासाठी करण्यात आलेला कायदा २००७ याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली, ज्येष्ठ नागरीकांसाठी असलेल्या विविध योजनेबाबत तसेच त्यांना त्यांचे मुलांकडुन खावटी तसेच मालमत्तेतुन बडतर्फे केले असल्यास या कायद्याव्दारे त्यांना कशी मिळविता येते याबाबत विस्तृत अशी माहिती दिली. ज्येष्ठांनी आपल्या मुलांबरोबर चालतांना वेळेसोबत चला कारण समाज बदलत असतांना

ड्रोन प्रक्षेपण व ड्रोनचा वापर करण्यास बंदी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत यवतमाळ शहरानजीक भारी येथील मैदानात दि.28 फेब्रुवारी रोजी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जिल्ह्याच्या हद्दीत ड्रोन प्रक्षेपण व ड्रोन वापरावर बंदी घालण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री हेलिकॅाप्टरने येणार असून नागपूर-तुळजापुर महामार्गाने कार्यक्रमस्थळी जाणार आहे. त्यामुळे प्रधानमंत्री महोदयांची व कार्यक्रमाच्या सुरक्षेच्यादृष्टीने जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्ह्याच्या हद्दीत ड्रोन प्रक्षेपण व ड्रोन वापरावर बंदी घातली आहे. सदर बंदी दिनांक 24 फेब्रुवारीपासून दि.28 फेब्रुवारीच्या रात्री 12 वाजतापर्यंत राहणार आहे. बंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 188 कारवाई केली जातील, असे बंदी आदेशात नमूद करण्यात आले आहे. 000

सेवा सोसायटींकडून काम वाटपासाठी प्रस्ताव आमंत्रित

काम वाटप समितीकडे जिल्ह्यातील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मारेगाव व शासकिय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र, पांढरकवडा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था वणी येथे सफाईगार कामाकरीता सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना काम वाटप करण्यासाठी प्रस्ताव प्राप्त झालेला आहे. त्यासाठी नोंदणीकृत सेवा सोसायटीकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहे. बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने ३ लक्ष इतक्या रकमेची कामे विना निविदा उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार विभागामार्फत जिल्हा स्तरावर काम वाटप समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने सदर प्रस्ताव प्राप्त झाले आहे. या कामाकरीता या संस्थेने ठरवून दिलेल्या वेळेत या प्रमाणे सफाईगार या पदाकरीता कंत्राटी तत्वावर काम वाटप करावयाचे आहे. ज्या नोंदणीकृत सेवा सोसायटींनी या कार्यालयाकडून नोंदणी प्रमाणपत्र अद्ययावत केलेले आहे. अशा संस्थांनी वरील कामाबाबत आपले प्रस्ताव २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजतापर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ येथे सादर करावे. प्रस्तावासोबत संस्थेचे अ

प्रधानमंत्र्यांच्या कार्यक्रमस्थळी महिलांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध राहणार

Image
Ø महिलांना ये-जा करण्यासाठी एसटी बसेस Ø बसमध्ये खाद्य पदार्थांची सुविधा Ø स्वच्छतागृहांसह प्रत्येक कक्षात पिण्याचे पाणी Ø औषधांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती Ø कार्यक्रमस्थळ व पार्किंगमध्ये 9 ॲम्बुलन्स प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित यवतमाळ येथे होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी पुर्णत्वास आली आहे. कार्यक्रमास महिलांसह तीन लाखापेक्षा जास्त उपस्थिती राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कार्यक्रमासाठी येणाऱ्या महिलांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहे. खाद्य पदार्थ, पाणी, वाहतूक व्यवस्थेसह विविध बाबींचा त्यात समावेश आहे. कार्यक्रमाला येण्यासाठी महिलांना गावातच एसटी महामंडळाची बस उपलब्ध करून देण्यात आली आहे. या बसमध्ये प्रत्येक महिलेला प्रत्येकी दीड लिटर पाणी, विविध वस्तुंचा समावेश असलेला खाद्य पदार्थांचा बॅाक्स दिल्या जाणार आहे. प्रत्येक बसमध्ये एक समन्वयक देखील राहणार आहे. कार्यक्रमासाठी येणाऱ्या महिलांना बसण्यासाठी सुटसुटीत व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी मंडपात 84 वेगवेगळे कक्ष उभारण्यात आले आहे. या प्रत्येक कक्षामध्ये महिलांना व्यवस्थित

पदभरतीच्या परिक्षार्थींनी वळन मार्गांचा अवलंब करावा

राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत पुरवठा निरीक्षक व उच्चस्तर लिपिक या गट-क संवर्गातील पदांसाठी परीक्षा घेण्यात येत आहे. दि.२८ फेब्रुवारी रोजी परिक्षेच्या दिवशी प्रधानमंत्र्यांच्या कार्यक्रमानिमित्त मार्गात बदल करण्यात आला आहे. परिक्षार्थींनी बदललेल्या मार्गाची नोंद घेऊन वेळेवर परिक्षेस पोहोचावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत पुरवठा निरीक्षक व उच्चस्तर लिपिक या गट-क सवंर्गातील पदांची आयबीपीएस मार्फत सरळसेवा भरती-२०२३ घेण्यात येत आहे. सदर पदभरतीची परीक्षा जिल्ह्यामध्ये दिनांक २६, २७, २८ व २९ फेब्रुवारी रोजी एआय टेक्नॅालॅाजी ऑनलाईन परिक्षा केंद्र, द्वारा साई बीएड कॅालेज, वाघापूर बायपास, चौसाळा रोड, यवतमाळ येथे घेण्यात येत आहे. प्रधानमंत्र्यांच्या दौरा कार्यक्रमामुळे दि.28 फेब्रुवारी रोजी सकाळी ६ ते रात्री १० वाजतापर्यंत नागपुर-तुळजापुर महामार्गावरील कळंब ते यवतमाळ वाहतूक बंद करून इतर ठिकाणाहून वळविण्यात आली आहे. या दिवशी परिक्षेस येणाऱ्या परिक्षार्थींनी वळविलेल्या मार्गाचा अवलंब करून वेळेवर परीक्षा केंद्रावर पो

प्रधानमंत्र्यांच्या कार्यक्रमानिमित्त २८ फेब्रुवारी रोजी वाहतूक मार्गात बदल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दि.२८ फेब्रुवारी रोजी शहरानजीक भारी येथील मैदानावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास होणारी गर्दी लक्षात घेता यादिवशी सकाळी ८ ते रात्री १० वाजता दरम्यान वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमास दोन ते तीन लाख महिला व कार्यकर्ते येणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने भारी विमानतळ ते कार्यक्रमस्थळ या मार्गावर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. नागपुर-तुळजापुर महामार्गावरील कळंब ते यवतमाळ मार्ग बंद केल्यानंतर वाहतूक खालील मार्गाने वळविण्यात येणार आहे. नागपूर - तुळजापुर महामार्गाने नागपुरकडून नांदेडकडे जाणारी व येणारी वाहतुक कळंब - बाभुळगावp मार्गे धामणगाव चौफुली यवतमाळ- पिंपळगाव लोहारा टी पॉईट भोयर बायपास- वाघाडी- वनवासी मारोती मार्गे आर्णी रोडने नांदेडकडे वळविण्यात येणार आहे. नागपुर-तुळजापुर महामार्गाने नागपुरकडून घाटंजीकडे जाणारी व येणारी जड वाहतुक कळंब- राळेगाव डोंगरखर्डा - मेटीखेडा मार्गे वळविण्यात येणार आहे, तसेच नागपुरकडून घाटंजीकडे जाणारी लहान वाहने ही कळंब जोडमोहा मा

पालकमंत्र्यांकडून प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रम स्थळाची पाहणी

Image
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थिती दिनांक २८ फेब्रुवारी रोजी शहरानजीक भारी येथील मैदानात बचतगटांच्या महिलांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या स्थळाची पालकमंत्री संजय राठोड यांनी आज पाहणी केली. यावेळी पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड, बांधकामचे अधीक्षक अभियंता संभाजी धोत्रे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी कार्यक्रमस्थळी उभारण्यात येत असलेला स्टेज, मंडप, वाहनतळ, सुरक्षा, बैठक व्यवस्था, तात्पुरत्या स्वच्छता व्यवस्थेची पाहणी केली व आढावा घेतला. स्टेज, मंडप उभारणीसह सर्व कामे कालमर्यादेत होतील याबाब जिल्हाधिकारी व अन्य अधिकारी यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली. 000

नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा - संजय राठोड

Image
नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी शासनाच्यावतीने शिक्षण, आरोग्य व रोजगाराच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांचा कामगारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. पालकमंत्री श्री.राठोड यांच्याहस्ते दिग्रस तालुक्यातील २ हजार ५०० नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्य संचाचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास सरकारी कामगार अधिकारी राहुल काळे, पराग पिंगळे, राजकुमार वानखडे, उत्तम ठवकर, राहुल शिंदे, मिलिंद मानकर, रमाकांत काळे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र ईमारत व ईतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्यावतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांमध्ये पुर्वी कामगारांना पेटीचे वाटप करण्यात येत होते. या पेटीचा फारसा उपयोग होत नसल्याने गृहोपयोगी साहित्य वाटपाची योजना सुरु करण्यात आली. या साहित्याच्या संचात १७ प्रकारच्या ३० साहित्याचा समावेश आहे. या वस्तू उत्तम दर्जाच्या व उपयुक्त अशा आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. अनेक कामगारांनी नोंदणी केली परंतू नंतर नोंदणीचे नुतनीकरण केले नसल्याने त्यांना मंडळाच्या योजनांचा लाभ घेता येत नाही.

1 मार्चला यवतमाळ येथे पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणाईला स्थानिक तसेच इतर विभागातील नामवंत खाजगी कंपन्या, कारखाने आणि उद्योगसमुहांच्या माध्यमातुन चांगल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय अमरावती तर्फे येत्या 1 मार्चला यवतमाळ येथील लोकनायक बापूजी अणे महाविद्यालयात पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावती विभागातील युवक युवतींना नोकरीच्या संधी मिळवुन देण्याच्या उद्देशाने रोजगार मेळाव्याचे आयोजन होत असतात. त्यांचाच भाग म्हणजे “निवड जागेवरच” On spot selection मोहीम रोजगार मेळाव्यामध्ये राबविण्यात येणार आहे. त्यात विविध उद्योजकांना आवश्यक असणा-या वेगवेगळ्या पात्रतेच्या पदाकरीता कंपन्याचे प्रतिनिधि प्रत्यक्ष उपस्थित राहुन उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील व मुलाखत देऊन पात्र ठरणा-या उमेदवारांना लगेचच नोकरीची संधी दिल्या जाईल. या मेळाव्यामध्ये गरजु विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविण्याकरीता https://tb.gy/eshvai या लिंकवर जाऊन निशुल्क आँनलाईन नोंदणी करावी. यापूर्वी नोंदणी के

जिल्ह्यात ८६ हजार कामगारांना गृहोपयोगी संचांचे वाटप करणार - संजय राठोड

Image
* नेर येथे २ हजार १४६ कामगारांना संच वाटप * साहित्य संच वाटपाचा जिल्हास्तरीय शुभारंभ महाराष्ट्र ईमारत व ईतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्यावतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. त्याअंतर्गत राज्यभर गृहोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यात ८६ हजार कामगारांना या साहित्याचा संप वाटप करणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. नेर येथे साहित्य वाटपाचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्र्यांहस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सरकारी कामगार अधिकारी राहुल काळे, नेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज नाल्हे, पराग पिंगळे, सुभाष भोयर, नामदेवराव खोब्रागडे आदी उपस्थित होते. जिल्ह्यात १ लाख ४१ हजार नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे. त्यापैकी ८६ हजार कामगारांची नोंदणी जिवीत असल्याने त्यांना संचाचे वाटप केले जात आहे. उर्वरीत कामगारांनी आपल्या नोंदणीचे नुतनीकरण केल्यास अशा कामगारांसह नवीन नोंदणी केलेल्या कामगारांना देखील गृहोपयोगी साहित्य संचाचा लाभ देऊ, असे पालकमंत्री पुढे बोलतांना म्हणाले. वर्षात ९० दिवस कामगार म्हणून काम केल्यास त्यांची

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौरा तयारीचा पालकमंत्र्यांकडून आढावा

Image
* भव्य महिला मेळाव्याचे आयोजन * २६ एकरवर साकारतोय भव्य मंडप * कार्यक्रमाच्या तयारीला आला वेग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दि.२८ फेब्रुवारी रोजी शहरानजीक भारी येथील मैदानावर गटाच्या महिलांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने पालकमंत्री संजय राठोड यांनी आज तयारीचा आढावा घेतला. मेळावा उत्तमपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. महसूल भवन येथे आयोजित बैठकीला खा.भावना गवळी, आ.डॉ. अशोक उईके, आ.संजीवरेड्डी बोदकुरवार, आ.इंद्रनील नाईक, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, बांधकामचे अधीक्षक अभियंता संभाजी धोत्रे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या तयारीसाठी प्रशासनाच्यावतीने विविध प्रकारच्या ३० समित्या तयार करण्यात आल्या आहे. या समितीच्या प्रमुखांकडून पालकमंत्र्यांनी तयारीचा आढावा घेतला. मेळाव्यासाठी जिल्हाभरातून येणाऱ्या महिलांची प्रवास,

सेवा सोसायटींकडून काम वाटपासाठी प्रस्ताव आमंत्रित

काम वाटप समितीकडे जिल्ह्यातील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मारेगाव व शासकिय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र, पांढरकवडा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था वणी येथे सफाईगार कामाकरीता सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना काम वाटप करण्यासाठी प्रस्ताव प्राप्त झालेला आहे. त्यासाठी नोंदणीकृत सेवा सोसायटीकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहे. बेरोजगार सेवा सहकारी संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने ३ लक्ष इतक्या रकमेची कामे विना निवीदा उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार विभागामार्फत जिल्हा स्तरावर काम वाटप समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने सदर प्रस्ताव प्राप्त झाले आहे. या कामाकरीता या संस्थेने ठरवून दिलेल्या वेळेत या प्रमाणे सफाईगार या पदाकरीता कंत्राटी तत्वावर काम वाटप करावयाचे आहे. ज्या नोंदणीकृत सेवा सोसायटींनी या कार्यालयाकडून नोंदणी प्रमाणपत्र अद्ययावत केलेले आहे. अशा संस्थांनी वरील कामाबाबत आपले प्रस्ताव 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजतापर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ येथे सादर करावे. प्रस्तावासोबत संस्थेचे अद्य

उपजिल्हा रुग्णालय दारव्हा येथे अंडवृध्दी शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन

उपजिल्हा रुग्णालय, दारव्हा येथे दि.24 फेब्रुवारी रोजी भव्य रोग निदान व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये अंडवृध्दी रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. आयुष्मान भारत मोहिमेत आरोग्याशी संबंधित विविध योजनांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणुन राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम व हत्तीरोग दुरीकरणासाठी अंडवृध्दी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन जिल्हा आरोग्य प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. यापूर्वी जिल्ह्यात हत्तीरोग व अंडवृध्दी मोहीम राबविण्यात आली होती. त्यात जिल्ह्यात एकुण 280 अंडवृध्दी रुग्णांची व 593 हत्तीपाय रुग्णांची नोंदणी करण्यात आलेली आहे. या अंडवृध्दी रुग्णांची निःशुल्क शस्त्रक्रिया होण्याच्या दृष्ट‍िकोणातून दारव्हा, आर्णी, दिग्रस व नेर या तालुक्यात असणाऱ्या अंडवृध्दी रुग्णांनी शस्त्रक्रिया करुन घेण्याकरीता उपजिल्हा रुग्णालय दारव्हा येथे नोंदणी करावी. रुग्णाची तपासणी व भरती शनिवार दि. 24 फेब्रुवारी सकाळी 9 ते 3 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे तसेच शस्त्रक्रियेकरीता पात्र झालेल्या रुग्णाची शस्त्रक्रिया २५ व 26 फेब्रुवारी या दिवशी क

जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये 3 मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदलातचे आयोजन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये, कामगार न्यायालय, औद्योगिक न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, ग्राहक तकार निवारण मंच आणि इतर सर्व न्यायालय तसेच न्यायाधिकरणे येथे 3 मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नागेश न्हावकर यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेले तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, भुअर्जन मामल्याची प्रकरणे, महसुली प्रकरणे, वैवाहिक संबंधातील वाद प्रकरणे, बँका व अन्य वित्तीय संस्थांचे नुकसान व वसुली प्रकरणे व तडजोडीस पात्र असणारी सर्व प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली निघणार आहे. या लोकअदालतीमध्ये वाद मिटविण्याकरीता न्यायाधीश, तज्ज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्ते यांचे मंडळ पक्षकारांस मदत करेल. या अदालतीमध्ये प्रकरण ठेवण्यासाठी क

वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत यवतमाळ येथे 100 मुलींची क्षमता असलेले वसतिगृह कार्यरत आहे. या वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज वाटप व स्विकृतीची प्रक्रिया सुरु झाली असून ईच्छूक मुलींनी त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत सहाय्यक संचालक यांच्या अधिनस्त 100 मुलींची क्षमता असलेले साई सत्यजोत मंगल कार्यालय (वसतिगृह) आर्णि नाका येथे कार्यरत आहे. वसतिगृहामध्ये सन 2023-24 या शैक्षणिक सत्रात व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थीनीसाठी ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रवेशाचे अर्ज वाटप व स्विकारणे बाबत सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, पळसवाडी कॅम्प, दारव्हा रोड, यवतमाळ येथे सुरू झालेले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मार्च असून इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसायिक शिक्षण घेण्याऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थींनींनी वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाचे सहाय्यक संचालक मंगला मुन यांनी केले आहे. 000

पत्रकारिता पुरस्काराच्या प्रवेशिका पाठविण्यासाठी मुदतवाढ

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत विविध प्रकारचे विभाग व राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांसाठी प्रवेशिका सादर करण्याकरीता दि.29 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाजमाध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेले लेखन, छायाचित्रे, वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2024 असा होता. तथापि, पत्रकारांच्या प्रोत्साहनासाठी प्रवेशिका स्विकारण्यासाठी दिनांक 29 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार या स्पर्धेत जास्तीत जास्त पत्रकारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी ईच्छूक पत्रकारांना प्रवेशिका जिल्हा माहिती कार्यालयात उपलब्ध होईल. तसेच अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in व www.m

नैसर्गिक व सेंद्रीय शेती याविषयावर दोन दिवशीय प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र व आत्माचे आयोजन

Image
कृषि विज्ञान केंद्र व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माच्या संयुक्त विद्यमाने डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत नैसर्गिक व सेंद्रीय शेती या विषयावर दोन दिवशीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॅा.सुरेश नेमाडे होते. यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे, विषय विशेषज्ञ डॅा.प्रमोद मगर उपस्थित होते. डॉ. सुरेश नेमाडे म्हणाले, आधुनिक शेतीमध्ये जास्त उत्पादन मिळविण्याकरिता शेतकरी स्वतःमध्येच स्पर्धा करीत आहेत. या स्पर्धेमुळे रसायनांचा अतोनात वापर होत आहे. हा वापर शास्त्रज्ञांनी सुचवलेल्या मर्यादेपेक्षा खुप जास्त आहे. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम देखील त्याच प्रमाणात दिसून येत आहेत. या रसायनांच्या अतिवापरावर आळा घालण्यासाठी नैसर्गिक शेतीशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा आधार घेऊन आपल्या शेतीच्या आरोग्याची निगा राखावी, असे सांगितले. आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे यांनी डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत सुरु असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. या योजनांच

केंद्र शासनाच्या योजना प्रभाविपणे राबवा - आनंदराव पाटील

Image
सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाच्यावतीने विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहे. या योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा. अधिकाधिक पात्र व गरजू लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ कसा मिळेल, अशा पद्धतीने योजनांची अंमलबजावणी करा, असे निर्देश केंद्र शासनाचे अतिरिक्त सचिव तथा विकसित भारत संकल्प यात्रेचे जिल्हा प्रभारी आनंदराव पाटील यांनी दिले. महसूल भवन येथे त्यांनी यात्रेचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी सदर निर्देश दिले. बैठकीला जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर आभाळे, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीधर वाडेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, जिल्हा विज्ञान व सुचना अधिकारी राजेश देवते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांच्यासह विविध विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते. केंद्र शासनाच्यावतीने विविध 34 प्रकारच्या फ्लॅगशिप योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा देशभर पा

मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्तीसाठी शाळांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन पध्दतीने महाडीबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहे. इयत्ता 5 ते 10 वी पर्यंतच्या विविध शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र असलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे शाळांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इयत्ता ९ वी व १० वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती, सफाई कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती, ५ वी ते ७ वी आणि ८ वी ते १० वी मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थीनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क या सर्व योजनांची संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी ऑनलाईन अर्ज नोंदणी करावयाची आहे. शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी https://prematric.mahait.org/Login/Login ही महाडीबीटी प्रणाली वेब लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुख्याध्यापकांना अर्ज नोंदणी करीता युजर आयडी व पासवर्ड उपलब्ध करून देण्यात आला आहे. शाळांनी पात्र सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी प्रणालीमध्ये तात्क

माहितीचा अधिकार व लोकसेवा हक्क अधिनियम कायदेविषयक शिबीर

Image
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व पंचायत समिती यवतमाळच्या संयुक्त विद्यमाने माहिती अधिकार कायदा 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 या विषयावर पंचायत समितीच्या सभागृहात कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.व्ही. न्हावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. शिबिर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश व.स्तर के.ए. नहार होते. प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर गोळे, प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून संजय गांधी योजनेचे नायब तहसिलदार एकनाथ बिजवे उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात के.ए. नहार यांनी माहितीचा अधिकार कायदा याबाबत सामान्य लोकांमध्ये जनजागृती करणे खुप महत्वाचे आहे. तसेच आपण ज्याठिकाणी काम करतो त्याबाबत परिपुर्ण माहिती असायला पाहिजे, असे सांगितले. या अधिनियमाकडे सकारात्मकपणे पाहिले पाहिजे. शासकीय काम करीत असतांना कामामध्ये पारदर्शकता असल्यास माहिती अधिकारामध्ये कोणतीही अडचण जात नाही, असे ते म्हणाले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत पुरविण्यात येणाऱ्या योजना तसेच म

कन्यादान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पुसदच्यावतीने प्रकल्पातील तालुक्यांमध्ये कन्यादान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे व स्वयंसेवी संस्थांनी योजनेंतर्गत विवाह सोहळा आयोजित करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुसद प्रकल्पातील पुसद, दिग्रस, आर्णी, दारव्हा, उमरखेड व नेर या तालुक्यातील आदिवासी भागात विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या नवदाम्पत्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी कन्यादान योजना राबविण्यात येत आहे. इच्छुक व पात्र सेवाभावी स्वयंसेवी संस्थांनी योजनेंतर्गत सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्याकरीता विहीत नमुन्यातील आवेदन व परीपुर्ण प्रस्ताव प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुसद येथे दिनांक २६ फेब्रुवारी पर्यंत सादर करावे. योजनेच्या विवाह सोहळ्यात वर व वधु यांचे वय विवाहाच्या दिनांकास ३५ वर्षापेक्षा जास्त असू नये, वधु वराचा प्रथम विवाह असणे आवश्यक आहे, नवदाम्पत्यापैकी एकजन अनुसूचित जमातीचा असावा, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र व जोडप्यापैकी एकाचे जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. बालविवाह प्रतिबंधात्मक काय

महिला लोकशाही दिन 20 फेब्रुवारी रोजी

महिलांच्या तक्रार निवारणासाठी सोमवारी दि. 20 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या महिला लोकशाही दिनी जिल्ह्यातील तक्रारग्रस्त महिलांनी तक्रारी मांडव्यात. तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो. महिलांनी प्रथम या लोकशाही दिनात तक्रार दाखल करावी. सदर तक्रारीवर योग्य कारवाई झाली नसल्यास जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात तक्रार सादर करावे. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेला अर्ज, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबी आणि वैयक्तिक तक्रार किंवा निवेदने स्विकारले जाणार नाहीत, याची महिलांनी नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे. 000

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध कार्यक्रमाने साजरी करण्याचे आवाहन

Image
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षी महाराजांच्या राज्याभिषेकाचे 350 वे वर्ष साजरे केले जात आहे. यावर्षानिमित्त येत्या 19 फेब्रुवारी रोजी येणारा जयंती दिवस जिल्हाभर मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमाचे साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे 350 वे राज्याभिषेक वर्ष साजरे केले जात आहे. त्यानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात यावर्षीची जयंती शासनस्तरावर साजरी करण्यासोबतच विविध सामाजिक संस्था, संघटना, शैक्षणिक संस्थांनी देखील आपल्यास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरी करावी. शिवजयंती ज्या ठिकाणी साजरी होईल, तो परिसर स्वच्छ, सुंदर करावा, कार्यक्रमाच्या ठिकाणी रंग-रंगोटी, विद्युत रोषणाई, रांगोळी काढावी. महाराजांचा पुतळा व परिसर स्वच्छ करावा. कार्यक्रमाच्या सुरुवातीस राज्यगीत वाजविण्यात यावे. कार्यक्रमाच्या अगोदर व कार्यक्रमादरम्यान शिववंदना, स्थानिक कलावंतांकडून पोवाडा गायन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातील गीत-गायन इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम घेता येत

जिल्हाधिकारी कार्यालयात संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी

Image
जिल्हाधिकारी कार्यालयात संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीधर वाडेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी देखील अभिवादन केले. ००० --

महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी वाढविण्याचे आवाहन

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयांनी नोंदणी वाढवावी. जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांनी मंजूर करावे, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क प्रदाने, राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना इत्यादी योजना राबविण्यात येत आहे. या शैक्षणिक वर्षातील या योजनांचे प्रथम वर्षाचे व नुतनीकरणाचे अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी पोर्टल माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी 6 हजार 873 अर्जाची नोंदणी केली आहे, त्यापैकी महाविद्यालयांनी केवळ 1 हजार 963 अर्ज मंजुर केले आहे. महाविद्यालय

नियोजित बालविवाह थांबवण्यास जिल्हा बाल संरक्षण कक्षाला यश

Image
कळंब तालुक्यातील पिढा येथील एका बालिकेचा नियोजित असलेला विवाह थांबविण्यात प्रशासनाला यश आले. दिनांक 12 फेब्रुवारी रोजी 16 वर्षीय अल्पवयीन बालिकेचा बालविवाह होणार असल्याची गोपनिय माहिती चाईल्ड हेल्पलाईनच्या टोल फ्री क्रमांक 1098 ला मिळाली होती. या माहितीवरून बाल संरक्षण कक्षास विवाह थांबविण्यात यश आले. गोपनिय माहितीवरून जिल्हा बाल संरक्षण कक्षातील कर्मचारी, चाईल्ड हेल्पलाईन व कळंब पोलिस स्टेशनचे कर्मचारी, पोलिस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांच्याद्वारे बालविवाह थांबविण्यात आला. बालिकेच्या पालकांना बालविवाहाचे दुष्परिणाम तसेच बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 बाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर बालिकेच्या पालकांनी बालिकेच्या वयाच्या 18 वर्षानंतर तिचा विवाह करणार असल्याचे मत मांडले तसेच याबाबतचा लेखी जबाबही स्वाक्षरीने लिहून दिला. या कार्यवाहीच्यावेळी गावातील सरपंच मडावी, पोलिस पाटील जाधव, अंगणवाडी सेविका राठोड, ग्रामसेवक जाधव, पोलिस स्टेशन कळंबचे अजय शेंडे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे कोमल नंदपटेल, चाईल्ड हेल्पलाईनचे केस वर्कर शुभम कोंडलवार व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

यवतमाळ आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांची दुबईस्थित आस्थापनेत निवड

Image
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यवतमाळ संस्थेमध्ये दिनांक 8 व 9 फेब्रुवारी रोजी इसा सालेह अल गुर्ग, दुबई या आस्थापनेमार्फत भरती मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात संस्थेतील तब्बल 50 उमेदवारांची दुबई येथील आस्थापनेसाठी निवड करण्यात आली. या भरती मेळाव्याचे उद्घाटन अमरावती विभागाचे सहसंचालक पी.जे.घुले व सहाय्यक संचालक आर.एम.लोखंडे यांनी केले. मेळाव्याकरीता दुबई येथून तीन सदस्यीय शिष्टमंडळ आले होते. आस्थापनेच्या शिष्टमंडळाने आस्थापनेच्या कामकाजाबाबत व्हीडीओद्वारे सर्व उपस्थितांसमोर सादरीकरण केले. त्यानंतर मुलाखतीद्वारे एकूण 50 उमेदवारांची निवड करण्यात आली. आस्थापनेमार्फत एम्प्लॅायमेंट विसा, विमानाचे तिकीट तसेच इतर सुविधा पुरविल्या जाणार आहेत. प्रशिक्षणार्थ्यांचे पासपोर्ट तयार झाल्यानंतर विसाची प्रक्रीया आस्थापनेमार्फत केली जाणार आहे. याकरीता अंदाजे 1 लाख 60 हजार खर्च अपेक्षित असून हा खर्च आस्थापनेमार्फत केला जाणार आहे. या यशाकरीता संस्थेतील संपूर्ण कर्मचारी वृंद व प्राचार्य व्ही.जे.नागोरे यांनी निवड झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचे अभिनंदन केले, असे आयटीआय यवतमाळच्यावतीने कळविण्य

पालकमंत्री संजय राठोड यांचा दौरा कार्यक्रम

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड दि.15 फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे. दुपारी 12.30 वाजता हेलिकॅाप्टरने नेर येथे आगमण. हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग यवतमाळ- नेर, नांदगाव (खंडेश्वर)- बडनेरा असा जोडण्याबाबत पाहणी करतील. दुपारी 2 ते 3 वाजतापर्यंत राखीव. दुपारी 3 वाजता नेर हेलीपॅड येथून बेलोरा विमानतळ, अमरावतीकडे प्रयाण करतील. 000

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण, ई-केवायशी करण्याचे आवाहन

अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे शेतपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे नुकसानीची रक्कम जमा केली जाते. परंतू जिल्ह्यात अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे खाते आधार प्रमाणिकरण व ई-केवायशी नसल्याने रक्कम जमा करण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण व ई-केवायशी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना तत्काळ मिळावी यासाठी ई-पंचनामा पोर्टल तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यात मार्च, एप्रिल, मे 2023 मधील अवकाळी पाऊस, मान्सून ऑक्टोंबर 2021, सप्टेंबर, ऑक्टोबर 2022, जुन, जुलै २०२३ मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसानीची मदत तत्काळ मिळावी याकरिता ई-पंचनामा पोर्टलवर तालुकास्तरावरून आतापर्यंत 2 लाख 82 हजार 386 बाधित शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्यात आली असून जिल्हास्तरावरून नोंदी मान्य करण्यात आलेल्या आहेत. आतापर्यंत शासन स्तरावरून डीबीटीद्वारे 2 लाख 11 हजार 148 बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात 149 कोटी 5 लाख 20 हजार इतका निधी जमा करण्यात आलेला आहे. काही नुकसानग्र

राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा शुभारंभ

Image
राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेला आरोग्य विभागामार्फत आज सुरूवात करण्यात आली. एकाच दिवशी १ ते १९ वर्षे वयोगटातील सुमारे ६ लाख ३३ हजार बालकांना जंतनाशकाच्या गोळ्या देण्यात येत आहे. या मोहिमतून १३ फेब्रुवारीला सुटलेल्या बालकांना २० फेब्रुवारी रोजी मॉपअप राऊडंमधुन गोळ्या देण्यात येणार आहे. राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन नगरपरीषद शाळा क्रमांक ११ आठवडी बाजार येथे जिल्हा शल्चिकित्सक डॉ.एस.एस.राठोड व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी.एस चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना अलबॅन्डॉ‍झोलची गोळी खाऊ घालून करण्यात आला. यावेळी डॉ.एस.एस. राठोड यांनी आजचे विद्यार्थी हे देशाचे उज्वल भविष्य असल्याने त्यांचे आरोग्य सुदृढ राहण्याकरीता आरोग्य‍ विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपायेाजनेचा लाभ घ्यावा तसेच सर्व मुलांनी जंतनाशक गोळी खावी व आपले आरोग्य सुदृढ ठेवावे, असे आवाहन केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पि.एस.चव्हाण यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, स्वच्छतेचे महत्व‍ समजावून सांगावे तसेच आपल्या समक्ष गोळी देण्याचे आव्हान केले. जिल्हा माता बाल संगोपण अध

पीएम किसान योजनेंतर्गत गावपातळीवरील विशेष मोहिम

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या ई-केवायशी न केलेल्या शेतकऱ्यांना ई-केवायशी करण्यासाठी दि.१२ ते २१ फेब्रुवारी दरम्यान विशेष मोहिम गावस्तरावर राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात यापुर्वी राबविलेल्या मोहिमेत १ लाख ४ हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण, ३ लाख १ हजार स्वयंनोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी करण्यात आली. तथापि, राज्यातील एकुण १ लाख ९४ हजार शेतकऱ्यांनी योजनेच्या लाभासाठी आवश्यक इतर सर्व बाबींची पूर्तता केलेली असून त्यांचे केवळ ई-केवायसी करणे बाकी आहे. अशा शेतकऱ्यांचे मुख्यतः सामाईक सुविधा केंद्रांमार्फत (सीएससी) ईकेवायसी प्रमाणिकरण करण्यासाठी दि.१२ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत आणखी १० दिवसांची देशव्यापी संपृक्तता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेची क्षेत्रीयस्तरावर प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कृषी आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना निर्देश दिले आहेत. या मोहिमेदरम्यान केवळ ईकेवायसी प्रमाणिकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी

चर्मकार महामंडळाच्यावतीने लिडकॉम आपल्या दारी कार्यशाळा

Image
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाच्यावतीने लिडकॉमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 'लिडकॉम आपल्या दारी' या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा जात पडताळणी समितीच्या उपायुक्त प्राजक्ता इंगळे यांच्याहस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक अल्का अस्वार, महाराष्ट्र उद्योजकता विकास महामंडळाचे व्यवस्थापक रुपेश हिरुळकर, कौशल्य विकास विभागाचे राहुल गुल्हाने, महात्मा फुले विकास महामंडळाच्या व्यवस्थापक माधुरी अवधाते, लोकशाहिर अन्नाभाऊ साठे विकास महामंडळाचे व्यवस्थापक माया खडसे तसेच बाळासाहेब गावंडे, श्रीकृष्ण पखाले उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक बाळासाहेब गावंडे व श्रीकृष्ण पखाले यांनी चर्मकार बांधवांना समयोचित मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे संचालन व मार्गदर्शन डॉ. कमलदास राठोड यांनी केले तर आभार अमर तांडेकर यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वीसाठी ज्योती मालाधारी, सीमा भोयर यांनी परिश्रम घेतले. यावेळी जिल्ह्यातील चर्मकार

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती येथे दि.14 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध कंपन्यांमार्फत एकूण 1 हजार 982 पदे भरण्यात येणार आहे. या मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मेळाव्यामध्ये 10 वी, 12 वी, आयटीआय, पदवीधर, पदविकाधारक अभ्यासक्रम पुर्ण केलेले इच्छुक उमेदवारांना रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी हजर राहुन लाभ घेता येणार आहे. या मेळाव्यास उद्योजकांकडून उमेदवारांनी प्रत्यक्ष थेट मुलाखतीद्वारे रिक्त पदांकरिता निवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी या मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहायक आयुक्त विद्या शितोळे यांनी केले आहे. 0000

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्यावतीने अर्ज आमंत्रित

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळामार्फत विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांच्या लाभासाठी ईच्छूकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. महामंडळाच्यावतीने मांग, मातंग समाज व तत्सम १२ पोट जातीतील द्रारिद्रयरेषेखालील महिला, पुरुष घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांना स्वयंरोजगाराच्या अधिकाअधिक संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने योजना राबविण्यात येतात. महामंडळामार्फत २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता एनएसएफडीसी योजनेंतर्गत सुविधा कर्ज योजना रुपये ५ लाख, लघुऋण वित्त योजना रुपये १ लाख ४० हजार, महिला समृध्दी योजना रुपये १ लाख ४० हजार तसेच शैक्षणिक कर्ज योजना राबविली जाते. या योजनांचे कर्ज प्रस्ताव https://beta.slasdc.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आले आहे. जिल्ह्यातील मातंग, मादगी, मांग-गारोडी व तत्सम १२ पोट जातीतील गरजू शहरी, ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावा. परितक्ता, विधुर, अंपग, निराधार असलेल्या व्यक्तीस विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची एक प्रत व ऑनलाईन अपलोड केलेले संपूर्ण कागदपत्र जिल्हा कार्

मॅट्रिकपुर्व सैनिक शाळा निर्वाह भत्ता योजनेसाठी अर्ज आमंत्रित

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकपुर्व सैनिक शाळा निर्वाह भत्ता योजना सुरू करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून दिग्रस तालुक्यातील सावंगा येथील ईश्वर देशमुख सैनिक शाळा व संबधित विद्यार्थ्यांनी मॅट्रिकपुर्व सैनिक शाळा निर्वाह भत्ता योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येणार आहे. संबंधितांनी https://prematric.mahait.org/Login/Login या महाडीबीटी प्रणाली संकेतस्थळवर अर्जाची नोंदणी करावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी केले आहे. 000000

जवाहर नवोदय विद्यालयाची आज निवड चाचणी

घाटंजी तालुक्यातील बेलोरा येथील जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता नववी व अकरावी प्रवेशाकरिता निवड चाचणी दि. 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे. नववीसाठी परीक्षा केंद्र घाटंजी तालुक्यातील जवाहर नवोदय विद्यालय, बेलोरा व एस.पी.एम. बॉइज हायस्कुल, घाटंजी हे दोन परीक्षा केंद्र आहेत. तसेच इयत्ता अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्र जवाहर नवोदय विद्यालय, बेलोरा आहे. इयत्ता नववीसाठीची परीक्षा सकाळी 11.15 वाजता पासून दुपारी 1.45 तसेच अकरावीसाठी सकाळी 11 वाजता पासून दुपारी 1.30 या नियोजित वेळेत होणार आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी एक तास अगोदर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करणे सुरू झाले असून विद्यार्थ्यांनी www.navodaya.gov.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावे व प्रवेशपत्रात नमुद केलेल्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य के. डी. धोपटे यांनी केले आहे. 00000

सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांची काम वाटप सभा

सार्वजनिक बांधकाम मंडळ, यवतमाळ अंतर्गत सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांची काम वाटप सभा दि. 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता सार्वजनिक बांधकाम मंडळ सभागृह यवतमाळ येथे आयोजित केली आहे. तरी संबंधितांनी ओळखपत्र व आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहावे. असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता यांनी केले आहे. 000000

उत्पादन वाढीसाठी पिकाची फेरपालट करणे काळाची गरज - डॉ. शरद गडाख

Image
शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नतीसाठी शेती पुरक व्यवसाय केले पाहिजे. पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड द्यावी तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात राहून मार्गदर्शन घ्यावे. उत्पादन वाढविण्यासाठी पिकांची फेरपालट करणे काळाजी गरज असल्याचे मत अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी व्यक्त केले. कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ येथे दि. 3 फेब्रुवारी रोजी 22 व्या शास्त्रीय सल्लागार समितीची सभा संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. खरीप व रब्बी हंगामामध्ये पिकांविषयी येणाऱ्या अडचणी विषयी नियोजन शास्त्रीय सल्लागार समितीमार्फत केले जाते. तसेच जिल्ह्यामध्ये कापूस पिकातील गुलाबी बोंडअळी बाबत वेळोवेळी विषय तज्ञांनी मार्गदर्शन व विद्यापिठाचे विकसीत तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहचविले जाईल यावर कार्य करावे, असे आवाहन संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी यावेळी केले. डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक सेंद्रिय शेती मिशन अंतर्गत निर्माण झालेल्या शेतकरी उत्पादक कंपनींना शास्त्रीय पद्धतीने मार्गदर्शन करण्याचे काम कृषि विज्ञा

नागरिकांना विहित कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून द्या - आयुक्त डॉ.एन.रामबाबू

Image
लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत विभागांचा आढावा राज्य लोकसेवा हक्क आयुक्त डॉ.एन.रामबाबु यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत सेवा देणाऱ्या जिल्हास्तरीय विभाग प्रमुखांची आढावा बैठक महसूल भवन येथे घेण्यात आली. नागरिकांना विविध शासकीय सेवा विहित कालमर्यादेत उपलब्ध करून द्या, अशा सूचना आयुक्तांनी बैठकीत केल्या. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, आयोगाचे उपसचिव अनिल खंडागळे, अप्पर जिल्हाधिकारी समाधान गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, जिल्हा समन्वयक अधिकारी फिरोज पठाण व लोकसेवा देणारे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. आयुक्तांनी जिल्ह्यात लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. त्यानंतर प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना दिल्या. कायद्यातील तरतुदीप्रमाणे अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत नागरिकांना पुरविण्याबाबत सर्व विभागांना निर्देशित केले. संबंधित विभागांकडून पात्र नागरिकांना विहित वेळेत सेवा न मिळाल्यास अथवा नियमोचित कारणाशिवाय ती नाकारल्यास अशा निर्णयाविरुद्ध संबंधितांना वरीष्ठांकडे प्रथम व

आरोग्य विभाग राबविणार जंतनाशक व पल्स पोलीओ मोहिम

Image
मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी कारा - मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की लहान मुलांनी जंतनाशक औषधी घेतल्याने त्यांच्यातील रक्तक्षयांचा आजार कमी होऊन आरोग्यात सुधारणा होते. बालकांचा शारीरिक व मानसिक विकास होऊन अन्य संसर्गाची प्रतिकार करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे येत्या १३ फेब्रुवारीला १ ते १९ वयोगटातील ६ लक्ष मुलामुलींना जंतनाशकाचे औषध देऊन तर ३ मार्च रोजी २.५ लक्ष ० ते ५ वयोगटातील मुलामुलींना पोलिओ संसर्ग टाळण्यासाठी पोलिओ मोहिम प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी दिल्या. जिल्हास्तरीय कार्यदल समितीची आढावा सभा त्यांनी घेतली. त्यावेळी या सूचना दिल्या. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पी.एस.चवहाण, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज तगलपल्लेवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.प्रिती दुधे, सुचिता ठाकरे, चंचल मुंदाने, प्रदीप कालिकर, वैशाली काकदे व इतर समिती सदस्य उपस्थित होते. दिनांक १३ फेब्रुवारी रेाजी सर्व मुले शाळेत उपस्थित रहातील याची दक्षता घ्यावी. अनुपस्थित असणाऱ्या किंवा आजारपणामुळे किंवा अन्य कारणांम

आयटीआय उमेदवारांना दुबईमध्ये रोजगाराची संधी ८ व ९ फेब्रुवारीला मुलाखत

येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे दुबईतील इसा सालेह अल गुर्ग ही आस्थापना जिल्ह्यातील आयटीआय उमेदवारांची मुलाखत घेण्यासाठी येणार आहे. या माध्यमातून आयटीआय उमेदवारांना दुबईमध्ये रोजगाराची संधी मिळणार आहे. कंपनीचे अधिकारी मुलाखतींसाठी दि. ८ व ९ फेब्रुवारी रोजी यवतमाळात येणार आहेत. या आस्थापनेच्या भरतीसाठी इलेक्ट्रीशियन, प्लंबर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, रेफ्रीजरेशन अॅण्ड एअर कन्डीशनर टेक्नीशियन या व्यवसाय शिक्षणातील उत्तीर्ण तसेच अंतिम वर्षाला प्रशिक्षण घेणारे उमेदवार पात्र आहेत. पात्र उमेदवारांनी इंग्रजीतील कॉम्प्युटराईज्ड रिझ्यूम, दहावी, बारावीची गुणपत्रिका, टिसी, आयटीआय प्रमाणपत्र (एनटीसी), आधार कार्ड व पासपोर्ट फोटो प्रत्येकी दोन प्रतीमध्ये सोबत आणणे आवश्यक आहे. दुबईतील चलनानुसार आस्थापनेमधील वेतन दरमहा एईडी ११५० इतके राहणार आहे. आस्थापनेमार्फत विविध सुविधाही पुरविल्या जाणार आहेत. त्यामध्ये एप्लॉयमेंट व्हिसा, एअर तिकीट इन एव्हरी टु इअर्स, मेडीकल इन्सुरन्स, कॅम्प ॲकोमोडेशन, ट्रान्सोर्पोटेशन, एअर तिकीट फॉर फस्ट जॉयनिंग या सुविधांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी ए.व्ही. पिंगळे

जवाहर नवोदय विद्यालयाची शनिवारी निवड चाचणी

घाटंजी तालुक्यातील बेलोरा येथील जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता नववी व अकरावी शैक्षणिक सत्राकरिता निवड चाचणी शनिवारी 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे. इयत्ता नववीसाठीची परीक्षा सकाळी 11.15 वाजता पासून दुपारी 1.45 तसेच अकरावीसाठी सकाळी 11 वाजता पासून दुपारी 1.30 या नियोजित वेळेत होणार आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी एक तास अगोदर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करणे सुरू झाले असून विद्यार्थ्यांनी शासनाच्या नवोदय www.navodaya.gov.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करून त्या प्रवेशपत्रात दिलेल्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य के. डी. धोपटे यांनी केले आहे. नववीसाठी परीक्षा केंद्र जवाहर नवोदय विद्यालय, बेलोरा ता. घाटंजी आणि एस.पी.एम. बॉइज हायस्कुल घाटंजी हे दोन परीक्षा केंद्र आहेत. तसेच इयत्ता अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्र जवाहर नवोदय विद्यालय, बेलोरा आहे, असे कळविण्यात आले आहे. 000

शासकीय योजना, महिला संरक्षण आणि नुकसान भरपाई योजनाविषयी कायदेविषयक शिबीर

Image
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तहसिल कार्यालय यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र व राज्य सरकारच्या योजना, कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा छळ आणि महाराष्ट्रात बळी पडलेल्यांना नुकसान भरपाई योजना" याबाबत तहसिल कार्यालयात कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरून आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता या शिबीराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव कुणाल नहार हे होते. तर तहसिलदार ज्योती वसावे यांची प्रमुख उपस्थ‍िती होती. या कार्यकमाचे प्रमुख वक्ते म्हणुन नायब तहसिलदार एकनाथ बिजवे, पॅनल वकील अॅड निलिमा जोशी हे होते. कार्यक्रमाचे वक्ते एकनाथ बिजवे यांनी केंद्र आणि राज्य सरकार तर्फे चालणाऱ्या योजनांबाबत तसेच सरकारी कामात उशीर का होतो याबाबत सविस्तर माहिती दिली. अॅड निलिमा जोशी यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा छळाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी कर्मचारी महिलांना राज्य घटनेने दिल

खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या योजनांच्या जनजागृतीसाठी आज पुसदमध्ये एक दिवसीय जनजागृती मेळावा

राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती व त्यांचा लाभ सुशिक्षित बेरोजगार, तरुणतरुणी व लाभार्थ्यांना होण्यासाठी आज दि.७ फेब्रुवारी रोजी पुसदमधील बिरसा मुंडा चौकातील नगरपरिषद हिंदी शाळेत एक दिवसीय जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. मंडळामार्फत संपूर्ण राज्यात मध केंद्र योजना कार्यान्वित झालेली आहे. या योजनेंतर्गत महिला, युवक युवती, सुशिक्षीत बेरोजगार, आदिवासी, जेष्ठ नागरीक, अनुसूचित जाती व जमाती, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, स्वातंत्र्य सैनिक, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, स्वयंसहाय्यता युवा गट, शेतकरी, शेतमजूर, भूमिहिन, पारंपरिक कारागीर इत्यादी समाजातील सर्वच घटकांना मद्य योजनेचा लाभ देण्यात येतो. याशिवाय मंडळामार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना इत्यादी योजना राबविण्यात येतात. या योजनेंतर्गत उद्योजकांना विविध उद्योग उभारण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येते तसेच अनुदानाचा लाभ देण्यात येतो. मध योजनेअंतर्गत लाभ घेवू इच्छिणाऱ्या व्यक्तींना विना

जिल्ह्यात सीसीआयचे सात कापूस खरेदी केंद्र दिग्रस, महागांव व यवतमाळ येथे केंद्र उघडण्याची कार्यवाही सुरु

भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) मार्फत यवतमाळ जिल्ह्यातील सात केंद्रांवर किमान हमी दराने कापूस खरेदी सुरु आहे. याव्यतिरिक्त दिग्रस, महागांव व यवतमाळ या तीन केंद्रांवर कापूस खरेदी केंद्र उघडण्याची कार्यवाही सुरु आहे, असे कापूस पणन महासंघाचे प्रभारी विभागीय व्यवस्थापक यांनी कळविले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा, घाटंजी, राळेगांव, वणी, खैरी, सिंदोला आणि पांढरकवडा या सात कापूस खरेदी केंद्रांवर भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) मार्फत एफएक्यू प्रतिच्या कापसाची किमान हमी दराने कापूस खरेदी सुरु आहे. या व्यतिरिक्त सीसीआयमार्फत जिल्ह्यातील दिग्रस, महागांव व यवतमाळ या तीन केंद्रांवर किमान हमी दराने कापूस खरेदी केंद्र उघडण्याची कार्यवाही सुरु आहे. सर्व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी आपला कापूस आवश्यक त्या कागदपत्रांसह सीसीआयच्या नजिकच्या केंद्रांवर विक्री करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ०००