Posts

Showing posts from March, 2017
Image
बँकांनी 31 मे पूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज द्या                               - किशोर तिवारी * पीककर्ज व विविध विषयांचा आढावा * पीककर्ज नाकारल्यास कार्यवाही करु यवतमाळ,   दि. 31   :   येत्या हंगामात जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. जे शेतकरी बँकांच्या नेटवर्कमधून सुटले आहे अशांना परत बँकांना जोडण्यासोबतच येत्या 31 मे पर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करणे आवश्यक आहे, असे    निर्देश वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे त्यांनी पीककर्जासोबतच आरोग्य सुविधा, जोड व्यवसाय, शेतकऱ्यांसाठी विविध    प्रकारचे क्लस्टर, शैक्षणिक सुविधा येत्या खरीप हंगामात पेरणीखालील क्षेत्रात वाढ करण्यासोबतच उत्पादकतेत वाढ करण्याबाबत संबंधीत विभागाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक कुमार सिंगला, उपमुख्य संरक्षक श्री.हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, वीज वितरणचे अधीक्षक अभियंता विजय भटकर, जिल्
Image
उर्वरीत आधार नोंदणी तात्काळ पूर्ण करा -   जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह *आधार नोंदणीच्या कामाचा आढावा *शालेय विद्यार्थी, बालकांच्या नोंदणीला प्राधान्य यवतमाळ,   दि.  30   : जिल्ह्यातील प्रत्येक पुरूष ,  महिला ,  विद्यार्थी ,  बालकाची आधार नोंदणी करणे आवश्यक आहे. गेल्या काही दिवसातील सातत्याच्या पाठपुराव्याने नोंदणीचे काम चांगल्यापैकी झाले असून उर्वरीत नोंदणी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे त्यांना आधार नोंदणीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक सिंगला, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, महिला व बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मरसाळे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अर्चना इंगोले, ई-डिस्ट्रीक्ट प्रोजेक्टचे जिल्हा मॅनेजर उमेश घुग्‍गुसकर आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांसह अंगणवाडीतील विद्यार्थी, बालकांची नोंदणी प्राधान्याने करावयाची आहे. त्यामुळे विशेष पथके लावून या बालकांची आधार नोंदणी पंधरा दिवसात पूर्ण करावी, असे
Image
नियमबाह्य तूर विक्री करणाऱ्यांना चाप लावणार -जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह *जादा तूर विक्री करणाऱ्यांवर फौजदारी *सातबारा पाहून ठरविणार उत्पादन यवतमाळ, दि. 29 : बाजारात तुरीचे भाव कोसळल्याने नियमबाह्य तूर विक्रीचे प्रकार वाढले आहे. हे नियमबाह्य प्रकार रोखण्यासाठी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना चाप लावणे आवश्यक आहे. वेळप्रसंगी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, असे आदेश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरेदी आणि कागदपत्रांची पुर्तता संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी शासकीय तूर खरेदी केंद्रावर खरेदी होणाऱ्या तुरीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी 10 क्विंटलपेक्षा अधिक तुरीची विक्री करणाऱ्यांची यादी सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे सादर करावी लागणार आहे. संबंधित शेतकऱ्यांनी सात-बारा, आठ-अ, पेरे पत्रक, आधारकार्ड ही कागदपत्रे सहाय्यक निबंधक यांच्याकडे सादर करावयाची आहेत. याबाबत सुनावणी होऊन मर्यादित क्षमतेपेक्षा जादा तूर विकल्याचे निष्पन्न झाल्यास, अशा व्यक्तीवर थेट फौजदारी कारवाई क
खरेदीदार, विक्रेता संमेलन उत्साहात यवतमाळ , दि . 27 : जागतिक बँक अर्थसहाय्यीत महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्पांतर्गत खरेदीदार विक्रेता संमेलन शुक्रवारी, दि. 24 मार्च रोजी उत्साहात पार पडले. आत्माचे प्रकल्प संचालक यांच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र गाडे होते. डॉ. राजेंद्र गाडे यांनी पीक उत्पादन वाढीची सूत्रे सांगितली. त्यांनी कृषि माल प्रक्रियेचे महत्त्व विषद केले. खरेदीदार व विक्रेता यांनी एकमेकांच्या गरजानुरूप प्रामाणिक व्यवहार केल्यास दोघांचाही फायदा होत असल्याचे सांगितले. संमेलनात उपस्थित विविध उद्योजकांनी आपल्या प्रक्रिया उद्योगाची माहिती देऊन प्रकल्पासाठी आवश्यक शेतमालाची गरज, दर्जा याबाबत माहिती दिली. यात हिंगणघाटच्या सुगुणा फुडस यांनी सोयाबीन, हेमंत बेंबारे सोयाबीन, सुमित राऊत कोरफड, श्री. डेहणकर, श्री. उत्तरवार सिताफळ, कुणाल जानकर भाजीपाला, माधव राऊत तूर, धनाजी जाधव तूर, चना शेतमालाची आवश्यकता प्रतिपादन केली. उत्पादक सतीश माणलवार यांनी हळद, आले, विजय राठोड, युव
Image
धडकच्या अतिरिक्त विहीरींच्या लाभार्थी निवडीची प्रक्रीया पारदर्शकपणे पार पाडा            - जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह * उद्दिष्ठ ठरविण्यासाठी समितीची बैठक * लाभार्थ्यांना करावे लागणार आनलाईन अर्ज यवतमाळ, दि. 25 : धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याला अतिरिक्त 300 याप्रमाणे 4800 विहीरी मंजुर झाल्या आहे. या विहीरींसाठी लाभार्थी निवडीची कार्यवाही तातडीने करण्यासोबतच पारदर्शकपणे करा , असे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले. अतिरिक्त उद्दिष्ठाचे गावनिहाय इष्टांग निश्चित करण्यासाठी धडक सिंचन विहीर जिल्हास्तरीय समितीची बैठक गार्डन हॅाल येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार सिंगला, उपजिल्हाधिकारी संदीपकुमार महाजन, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे तज्ञ सदस्य डॅा.किशोर मोघे, वरिष्ठ भुवैज्ञानिक राजेश सावळकर यांच्यासह सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते. ज्या गावांची गरज आहे, शेतकऱ्यांची मागणी आहे आणि जेथे विहीरी घेतल्या जाऊ शकतात अशा गावा
Image
सौर पंपामुळे 7 हजार एकर शेतीचे ओलित * पाच एकरासाठी एक युनिट देणार * 574 शेतकऱ्यांचे अर्ज दाखल *223 शेतकऱ्यांना प्रत्यक्ष जोडणी यवतमाळ, दि .  24  :  शेतकऱ्यां चे वीज वितरण कंपनीच्या विजेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि   अ खंड  वी ज पुरवठा  व्हावा, या साठी  राज्य  शासनाने  शेतकऱ्यांसाठी  सौर कृ षि पंप ही महत्वाकांक्षी योजना  हाती घेतली  आहे.  सद्यास्थितीत 223 शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जोडणी देण्यात आली आहे. प्रत्येक कृषिपंपामागे पाच एकर शेती ओलिताखाली येणार असल्यामुळे  जिल्ह्या ती ल 1  हजार  420 कृ षि पंपा च्या सहायाने 7 हजार 100 एकर शेती ओलिताखाली येणार आहे. जिल्ह्याला या योजनेत 1 हजार 420 सौर कृषिपंपाचे उदि्दष्ठ देण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 574 शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहे. यातील 275 शेतकऱ्यांनी आवश्यक रकमेचा भरना केलेला आहे. रक्कमेचा भरणा केलेल्या शेतकऱ्यांपैकी 223 शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जोडणी देण्यात आली आहे. यात तालुकानिहाय आलेले अर्ज (कंसात प्रत्यक्ष जोडणी) पुढीलप्रमाणे आहे. यवतमाळ 58 (20), कळंब 10 (7), बाभुळगाव 21 (10), केळापूर 49 (14), राळ