‘बळीराजा प्रेरणा प्रश्नोत्तरीस्पर्धेचा निकाल जाहिर
*तीन शेतकऱ्यांना विजेत्यांचा मान
*महाराष्‍ट्र दिनी बक्षीस वितरण
 यवतमाळ, दि. 20 :  बळीराजा चेतना अभियानातर्फे शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याकरीता बळीराजा प्रेरणा प्रश्नोत्तरी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्‍पर्धेतील विजेत्‍यांची  नावे अपर जिल्‍हाधिकारी लक्ष्मण राऊत, जिल्‍हा माहिती अधिकारी मंगेश वरड आणि जिल्‍हा अ‍धीक्षक कृषी अधिकारी दत्‍तात्रेय गाकवाड यांच्‍या उपस्थितीत चिमुकलीच्‍या हस्‍ते ईश्‍वरचिठ्ठीद्वारे काढण्‍यात आली.
यात प्रथम बक्षीसाचे मानकरी यवतमाळ तालुक्‍यातील हिवरी येथील शेतकरी रवींद्र बादलसिंग ताड ठरले. तर द्वितीय बक्षीसाचे मानकरी दिग्रस तालुक्‍यातील धानोरा (खु) येथील विनोद नागोराव जाधव, तर तृतीय बक्षीसाचे मानकरी पुसद तालुक्‍यातील मारवाडी (बु.) येथील बबन लिंबाजी गडदे हे ठरले.
या स्‍पर्धेत शेतीवर आधारीत उद्योग, कृषी निगडीत जोडधंदे, पिके, बहुपिक पद्धती, आंतरपिके, मनोधैर्य वाढविण्‍यासाठी उपाय, किड नियंत्र, माती परीक्षण, विमा अशा शेती आणि त्‍यांच्‍या जीवनाशी निगडीत प्रश्‍नोत्‍तरे या स्‍पर्धेत विचारण्‍यात आली होती. ही स्‍पर्धा १ ते १० सष्‍टेंबर २०१६ या दरम्‍यान घेण्‍यात आली होती. या स्‍पर्धेला जिल्‍हाभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळून शेतकऱ्यांनी मोठ्या संख्‍येने सहभाग नोंदविला. निवड करण्‍यात आलेल्‍या विजेत्‍यांना अनुक्रमे प्रथम दहा हजार, द्वितीय सात हजार, तर तृतीय पाच हजारांचे बक्षीस 1 मे 2017  रोजी महाराष्‍ट्र दिनी पालकमंत्री यांच्‍या हस्‍ते आयोजित कार्यक्रमात देण्‍यात येणार आहे.
शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढवून त्‍यांच्‍यात जगण्‍याची उमेद निर्माण करण्‍यासाठी जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियान राबविण्‍यात येत आहे. या अभियानांतर्गत शेतकऱ्यांत जागृती व्‍हावी, यासाठी विविध उपक्रम राबविण्‍यात येत आहे. यातील एक उपक्रम म्‍हणून शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक निगडीत बळीराजा प्रेरणा प्रश्‍नोत्‍तरे स्‍पर्धा १ ते  १० सप्टेंबर  २०१६ या कालावधीत घेण्‍यात आली होती.
स्‍पर्धेचे मुल्‍यमापनासाठी उत्तरपत्रिका तालुकास्तरीय समितीमार्फत त्यांची तपासणी केल्‍या गेल्‍या आहे. यात सर्वाधिक गुण असलेल्या २१ स्पर्धकांची नावे जिल्हास्तरावर पाठविण्‍यात आली होती. जिल्हास्तरावर बळीराजा चेतना अभियानकडून लकी ड्रॉ पद्धतीने अंतिम तीन शेतकरी स्‍पर्धकांची  निवड करण्‍यात आली आहे.
00000
आज जलजागृती सप्ताहानिमित्त केळापूर येथे कार्यशाळा
यवतमाळ, दि. 20 : यवतमाळ पाटबंधारे मंडळ, यवतमाळ आणि यवतमाळ सिंचन मंडळ, यवतमाळ यांच्यातर्फे जलजागृती सप्ताहामध्ये मंगळवारी, दि. 21 मार्च रोजी सकाळी 10 वाजता केळापूर येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
केळापूर येथील जगदंबा देवस्थान सभागृह येथे केळापूर, झरीजामणी, वणी, मारेगाव, घाटंजी तहसिलमधील प्रकल्पांवरील पाणीवापर संस्थेचे पदाधिकारी आणि लाभधारकांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत शंकर अमीलकंठवार, कृषि तज्‍ज्ञ डॉ. सी. यू. पाटील, उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. राहुल सातपुते आणि यवतमाळ पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. डी. कुंभारे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेतील मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
मृदा परिक्षकासाठी प्रस्ताव आमंत्रित
यवतमाळ, दि. 20 : येत्या वर्षात मृदा परिक्षकांकडूनच शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका उपलब्ध होणार आहे. यासाठी इच्छुक संस्था, लाभधारकांनी गुरूवार, दि. 23 मार्चपर्यंत प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
निवड झालेल्या परिक्षकांना अनुदान देण्यात येणार आहे. आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेत जमिनीचे रासायनिक गुणधर्म स्थिती, प्रमुख अन्नद्रव्याची पातळी, सुक्ष्म मुलद्रव्य कमतरता स्थितीची माहिती देण्यात येणार आहे. तालुकानिहाय मृद परिक्षक चालविण्यासाठी जिल्हा मृदा चाचणी आणि परिक्षण अधिकारी एक याप्रमाणे यवतमाळ 6, तर कळंब, राळेगाव, घाटंजी, दारव्हा, बाभुळगाव, आर्णी, नेर, पुसद, उमरखेड, दिग्रस, महागाव, केळापूर, वणी, मारेगाव, झरी जामणी या तालुक्यांना प्रत्येकी चार परिक्षक देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी यांच्यामार्फत प्रस्ताव संस्था, लाभधारक यांना सादर करावे लागणार आहे. शासकीय मृद चाचणी प्रयोगशाळा, कृषि चिकित्सालय, कृषि विद्यापिठामार्फत कृषि विज्ञान केंद्र यांच्यासाठी मृद परिक्षक खरेदीसाठी प्रती नग 86 हजार आणि स्थानिक कर आणि जास्तीत जास्त एक लाख रूपये अनुदान देण्यात येणार आहे. खासगी संस्थांना 60 टक्के किंवा जास्तीत जास्त 45 हजार इतके अनुदान देय राहणार आहे.
मृद परिक्षकाची मोका तपासणी आणि कार्यरत झाल्यानंतर लाभार्थींना थेट बँक खात्यात अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने विकसित केलेल्या मृद परिक्षक खरेदी करणे बंधनकारक आहे. तसेच त्यात 12 घटक तपासणी सुविधा आवश्यक आहे. केंद्राच्या एमआयएस सॉफ्टवेअरमधून जमिन आरोग्य पत्रिका मराठीतून उपलब्ध होण्यासाठी संगणक प्रणाली असणे आवश्यक आहे. मृद परिक्षक खरेदी करण्यासाठी एकदाच अनुदान देण्यात येणार आहे. मृदा नमुने तपासणीसाठी शासनाने निर्धारीत केल्याप्रमाणे तपासणी शुल्क घेता येणार आहे. जिल्ह्यातील इच्छुकांनी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रेय गायकवाड यांनी केले आहे.
00000
57 रेतीघाटासाठी 22 मार्चला बैठक
यवतमाळ, दि. 20 : जिल्ह्यातील सन 2016-17 साठी 106 रेतीघाटाचा लिलाव करण्यात आला आहे. यानंतर शिल्लक राहिलेल्या 64 रेतीघाटासाठी 1 मार्च रोजी बैठक घेण्यात आली. यातूनही शिल्लक राहिलेल्या 57 रेतीघाटाचा देकार देण्यासाठी बुधवारी, दि. 22 मार्च रोजी दुपारी तीन वाजता अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक घेण्यात येणार आहे.
या बैठकीला शासकीय विभागांतर्गत कार्यरत असलेल्या तसेच रेतीघाट घेण्यास इच्छुक असलेल्या अहर्ताप्राप्त कंत्राटदारांनी बैठकीला उपस्थित राहावे. या 57 रेतीघाटांची माहिती www.yavatmal.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ, उपविभागीय अधिकारी आणि तहसिल कार्यालयात उपलब्ध आहे.

00000


राळेगाव येथे पाणी वापर संस्थांची कार्यशाळा उत्साहात
यवतमाळ, दि. 20 : यवतमाळ पाटबंधारे मंडळ, यवतमाळ आणि यवतमाळ सिंचन मंडळ, यवतमाळ यांच्यातर्फे जलजागृती सप्ताहानिमित्त शनिवारी, दि.18 मार्च रोजी राळेगाव येथील शेतकरी निवास कृषि उत्पन्न बाजार समिती येथे कार्यशाळा उत्साहात पार पडली.
राळेगाव येथेल कळंब, राळेगाव, नेर, दारव्हा, दिग्रस तहसिलमधील प्रकल्पांवरील पाणीवापर संस्थेचे पदाधिकारी आणि लाभधारकांसाठी ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेमध्ये उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, कृषि तज्‍ज्ञ डॉ. सी. यू. पाटील, यवतमाळ पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. डी. कुंभारे उपस्थित होते.
डॉ. पाटील यांनी शेतीमध्ये पाण्याचे महत्त्व, तसेच सोयाबीन व भुईमुगाचे कमी पाण्यात उत्पादन वाढविण्याबाबत मार्गदर्शन केले. श्री. अपार यांनी चक्रावती नदीचे पुनर्जीवन याबाबत अनुभव तसेच पाण्याचा उपयोग काटकसरीने करून उत्पादन वाढविण्यासाठी आवाहन केले. यावेळी नागरीकांसाठी चर्चासत्र घेण्यात आले.
00000

  

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी