माजी सैनिकांसाठी सैनिक संकुल
यवतमाळ, दि. 22 : माजी सैनिकांना विविध सोयी उपलब्ध करून देण्यासाठी यवतमाळ येथे सैनिक संकुल बांधण्यात येणार आहे. यासाठी लागणारी जमीन आणि नाहरकत प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यैथील पोलिस कवायत मैदानाच्या समोर चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या मागील तीन हजार चौरस मीटर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्या मार्गदर्शन आणि सुचनांमुळे अतिशय कमी वेळेत ही जमीन हस्तांतरणाचा आदेश व सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या इमारतीचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल सुहास जतकर यांना कळविले आहे. या जागेवर सैनिक कल्याण कार्यालय व माजी सैनिक विश्रामगृह या कामांच्या ढोबळ अंदाजपत्रकास मान्यता प्राप्त झालेली आहे. या बांधकामास लवकरच सुरवात होणार आहे. याठिकाणी ईसीएचएस हॉस्पीटल आणि सैनिक मुलांचे वसतिगृह यासाठी देखील जागा राखीव ठेवण्यात आलेली आहे. जमीन हस्तांतरणाच्या कामात महसूल तसेच इतर प्रशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी विविध मंजुरी व ना हरकत प्रमाणपत्रे तातडीने उपलब्ध करून दिली आहे. यात महसूल उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, तहसिलदार सचिन शेजाळ, भूमी अभिलेख उप अधीक्षक दत्तात्रेय गोसावी यांनी विशेष प्रयत्‍न केले.
00000
सेंट ग्रामीण संस्थेत प्रमाणपत्र वाटप
यवतमाळ, दि. 22 : अवधुतवाडी येथील सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था येथे ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचा समारोप नुकताच करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रशांत देशपांडे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक एस. एस. मुद्दमवार, प्रांजली बारसकर, सविता राऊत, एस. बी. मिटकरी, एस. ए. बोबडे, अल्का कोथळे उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी ग्रामीण भागातील सुशिक्षित बरोजगारांना प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेला उत्कृष्ट उपक्रम आहे. याचा युवकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.
श्री. मिटकरी यांनी प्रास्ताविकातून संस्थेबद्दल माहिती दिली. आमीर हुसैन मलनस यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी निकिता तांबुळे, पुजा गुर्डे यांनी पुढाकार घेतला.
00000
8 एप्रिल रोजी लोकअदालतीचे आयोजन
यवतमाळ, दि. 22 : जिल्‍हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे यवतमाळ येथील जिल्‍हा न्‍यायालय तसेच जिल्‍ह्यातील सर्व न्‍यायालये, कामगार व औद्योगिक न्यायालय व इतर सर्व न्यायालयांमध्‍ये शनिवारी,‍ दि. 8 एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संदिपकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोकअदालत घेण्यात येणार आहे.
लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित, तडजोडीस पात्र असलेली दिवाणी आणि फौजदारी प्रकरणे, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कलम 138नुसार चेक बाऊंसची प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, कामगार विवाद प्रकरणे, वीज, पाणी देयकांसंबंधीत प्रकरणे आणि तडजोडीस पात्र असणारी सर्व प्रकरणे, वैवाहिक वाद आणि दिवाणी वाद, भूअर्जन प्रकरणांची प्रकरणे, वेतन भत्ते, सेवानिवृत्तीविषयक वाद प्रकरणे, जिल्हा न्यायालयात प्रलंबित असलेली महसुली प्रकरणे आणि इतर दिवाणी वाद प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहे.
संबधित पक्षकारांनी आपली प्रकरणे दि. 8 एप्रिल रोजी आयोजित राष्‍ट्रीय लोकअदालतीमध्‍ये ठेवण्‍यासाठी संबंधित न्‍यायालयांशी संपर्क साधावा, तसेच आपली प्रकरणे आपसी तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन दिवाणी न्‍यायाधीश वरिष्‍ठ स्‍तर आणि जिल्‍हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सचिन आगरकर, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष राजेंद्र धात्रक यांनी केले आहे. 
00000
अनधिकृत धार्मिक स्‍थळांसाठी तक्रार निवारण समिती
यवतमाळदि. 22 : सार्वजनिक जागेवरील अनधिकृत धार्मिक स्‍थळावर करावयाच्‍या कारवाईसाठी जिल्‍हाधिकारी यांच्‍या अध्‍यक्षतेत जिल्‍हास्‍तरीय, तर तहसिलदार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली तालुकास्‍तरीय समिती गठीत केली आहे. या समितीकडे धार्मिक स्‍थळांबाबतच्‍या तक्रारी नोंदवाव्‍यात, असे आवाहन समितीकडून करण्‍यात येत आहे.
            सर्वोच्‍च न्‍यायालयाने राज्‍यातील सार्वजनिक जागेवर असलेल्‍या अनधिकृत धार्मिक स्‍थळांचे बांधकाम निष्‍काषित करण्‍याचे आदेश दिले होते. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार जिल्ह्यात १६ तालुक्‍यातील अनधिकृत धार्मिक स्‍थळे हटविण्‍यात येत आहे. याबाबत संबंधितांनी जिल्‍हा प्रशासनाकडे तक्रारी केल्‍या आहे. या तक्रारींचा निपटारा करण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली समिती गठित करण्‍यात आली आहे. यामध्‍ये सदस्‍य सचिव म्‍हणून निवासी उपजिल्‍हाधिकारी, तर सदस्‍य म्‍हणून मुख्‍य कार्यकारी अधिकारीजिल्‍हा पोलिस अधीक्षकसार्वजनिक बांधकामचे अधीक्षक अभियंता, महसूल उपजिल्‍हाधिकारीनगर विकास शाखेचे जिल्‍हा प्रशासन अधिकारी यांचा समावेश आहे. तसेच तालुकास्‍तसरावर तहसीलदार यांच्‍या अध्‍यक्षतेत तालुकास्‍तरीय समिती गठित करण्‍यात आली आहे.
            अनधिकृत धार्मिक स्‍थळाबाबत तक्रार असल्‍यास संबंधितांनी टोल फ्री क्रमांक १०७७ तसेच दुरध्‍वनी क्रमांक ०७२३२-२४०७२० यावर नोंदवावीतसेच व्‍हॉट्सअॅप्‍स क्रमांक ९४२२९१७०११ आणि rdc_yavatmal@rediffmail.com  या ई-मेलवर आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्‍हा आणि तालुकास्‍तरीय समितीकडून करण्‍यात आले आहे.
00000



Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी