Posts

Showing posts from April, 2017
Image
भूसंपादन मोबदल्यातून उत्पन्नाचे कायमस्वरूपी साधन निर्माण करा - जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह * रेल्वे भूसंपादनाचा मोबदला वितरण * घोटी, पार्डीतील शेतकऱ्यांना गावातच धनादेश * 48 शेतकऱ्यांना 5 कोटी 89 लाखाचा मोबदला यवतमाळ,   दि.   6   : वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वे प्रकल्पासाठी थेट खरेदी पध्दतीने जमीन संपादनाची विशेष मुभा शासनाने दिली आहे. त्यामुळे जमीन संपादनाच्या कामास गती आली असून शेतकऱ्यांना खरेदी विक्री दराच्या चारपटीपेक्षा जास्त रक्कम दिली जात आहे. भूसंपादनाची सदर रक्कम उत्पन्नाचे कायमस्वरूपी साधन निर्माण करण्यासाठी उपयोगी आणा ,  असे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. रेल्वे मार्गासाठी जमीन संपादीत केलेल्या चापर्डा व घोटी या दोन गावातील शेतकऱ्यांना थेट त्यांच्या गावात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी मोबदल्याचे वितरण केले. त्यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी विशेष भुसंपादन अधिकारी विजय भाकरे, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसिलदार श्री. भोसले, चापर्डाच्या सरपंच सरला बंडाते यांच्यासह रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कृषि अवजारांची खरेदी थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने यवतमाळ,   दि.   5   : जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाच्यावतीने विशेष घटक योजना ,  आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील तसेच सेस फंड योजनेंतर्गत करण्यात येणारी कृषि साहित्य खरेदी संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाने कळविले आहे. कृषि आयुक्तांच्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे शासन निर्णयात समाविष्ठ उत्पादकांच्या अधिकृत विक्रेत्यांकडून अथवा कृषि उद्योग विकास महामंडळाकडून तांत्रिक निकष असलेली सदर तांत्रिक निकषात कमी नसलेल्या निकषाची अवजारे खरेदी करण्याची मुभा आहे. या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे लाभार्थ्यांनी बाजारातून अवजाराची खरेदी केल्यानंतर देयकाची एक प्रत पंचायत समितीत सादर करावयाची आहे. सदर अवजारांची तपासणी केल्यानंतर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पंधरा दिवसात जमा केली जाणार आहे. ज्या मंजूर शेतकऱ्यांनी जानेवारी ते मार्च 2017 या काळात पुर्ण किंमत भरून अवजारांची खरेदी केली नाही ते शेतकरी कृषि उद्योग विकास महामंडळाच्या विक्री कार्यालयाकडून अवजारांची फ
Image
प्रत्येक बालकाने जंतनाशकाची गोळी घ्यावी -जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह *10 फेब्रुवारी रोजी जंतनाशक दिन *सर्व शाळेत एंल्बेंडेझॉल देणार *गोळ्या संपूर्ण सुरक्षित, प्रमाणित यवतमाळ, दि. 2 : एक ते चौदा वर्षे वयोगटातील 68 टक्के बालकांमध्ये आतड्यांचा कृमी दोष आढळतो, जंतांचा नाश करून स दृढ आरोग्यासाठी बालकांना 10 फेब्रुवारी रोजी जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. या गोळ्या संपुर्णत: सुरक्षित आणि प्रमाणित आहेत. त्यामुळे प्रत्येक बालकाने जंतनाशक गोळी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त शाळा आणि अंगणवाडीमध्ये देण्यात येणाऱ्या जंतनाशक गोळी उपक्रम राबविण्याबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. के. झेड. राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. टी. जी. धोटे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुचेता पाटेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त प्र. ह. राऊत, शासकीय महाविद्यालयाच्या पॅथॉलॉजिस्ट श्रीमती इगवे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, बालकां
जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन यवतमाळ, दि. 27 : ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात मराठी भाषा गौरव दिन म्हणून आज साजरा करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, डॉ. नितीन व्यवहारे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काटपेल्लीवार उपस्थित होते. श्री. खवले यांनी मराठी भाषेचा वापर वाढविणे आवश्यक असल्याचे सांगितले. राज्यात मराठी भाषा रूजावी, तिचे संवर्धन होणे गरजेचे आहे. त्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमात अव्वल कारकुन भारती झाडे यांनी मराठी भाषेचे महत्व समजावून सांगितले. शालिनी बुटले यांनी कविता सादर केली. कार्यक्रमाला जिल्हाधिकरी कार्यलयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 00000 आरटीई अंतर्गत प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ *2 मार्चपर्यंत करता येणार अर्ज यवतमाळ, दि. 27 : शिक्षणाचा हक्क अंतर्गत दुर्बल व वंचित घटकांसाठी 25 टक्के राखीव जागांवर ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी 2 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आ
मिनी ट्रॅक्टरचे अनुदान थेट बँक खात्यात *योजनेच्या नियमात अमुलाग्र बदल *3 लाख 15 हजार रूपयांचे अनुदान *स्वयंसहाय्यता बचतगटांना होणार लाभ             यवतमाळ, दि. 18 : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना अनुदानावर मिनी ट्रॅक्टरचा पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेत अमुलाग्र बदल करण्यात आले आहे. उपसाधनासह मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी 3 लाख 15 हजार रूपये गटाच्या आधारसंलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.             या योजनेच्या लाभासाठी गटामध्ये 80 टक्के अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील सदस्य असावे, गटाचे अध्यक्ष आणि सचिव अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील सदस्य असावे, गटाच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असावे, हे खाते अध्यक्ष आणि सचिवांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असावे, गटाने खरेदी केलेला मिनी ट्रॅक्टर तयची उपसाधने ही केंद्र शासनाच्या कृषि विभागाने ठरवून दिलेल्या मानकानुसार फार्म, मशिनरी, ट्रेनिंग आणि टेस्टींग इंन्स्टिट्यूट यांनी टेस्ट करून जाहिर केलेल्या उत्पादकांच्या यादीतील परिमानानुसार असावेत. पात्र स्वयंसहायता बचत गटांना शासनाने संबंधित जिल्ह्यासाठी निश्च
महिलांनी लैंगिक छळाची तक्रार तात्काळ करावी -जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह *लैंगिक छळाबाबत कार्यशाळा *महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद यवतमाळ, दि. 23 : महिलांनी कामाच्या ठिकाणी निर्भय वातावरणात कार्य करावे, यासाठी कामाच्या ठिकाणी होत असलेल्या लैंगिक छळपासून संरक्षण करण्यासाठी कायदा करण्यात आला आहे. त्यामुळे असा प्रकार महिलांबाबत होत असल्यास त्यांनी तातडीने लैंगिक छळाची तक्रार करावी, यासाठी सहकारी महिलांनी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले. येथील कोल्हे सभागृहात लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्य महिला आयोगाच्या सदस्य निता ठाकरे, नगराध्यक्ष कांचन चौधरी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अर्चना इंगोले, सरकारी अभियोक्ता निती दवे, प्रतिभा गजभिये, वैशाली केळकर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाबाबत महिला सहज समोर येत नाही. त्यामुळे अशा प्रकारांना वाव मिळतो. कार्यालयात किंवा इतर ठिकाणी महिलांना असा प्रकार आढळल्यास त्यांनी अशा तक्रारी कार्यालयस्तराव
Image
लोकशाही दिनाच्या तक्रारी आपले सरकार पोर्टलवर यवतमाळ,   दि. 3   :   राज्य शासनाने नागरीकांच्या तक्रारी ऑनलाईन नोंदविण्यासाठी आपले सरकार वेबपोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर आता लोकशाही दिनाच्या तक्रारी नोंदविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आज बचत भवनात जिल्हास्तरीय लोकशाही दिन घेण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी याबाबत माहिती दिली. राज्य शासनाने आपले सरकार हे वेबपोर्टल नागरीकांच्या तक्रारी मांडण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. लोकशाही दिन हे एक ठिकाण असले तरी याठिकाणी मांडण्यात येणाऱ्या प्रत्येक समस्या आणि त्यावरील उत्तर आपले सरकार या वेबपोर्टलवर नोंदविण्यात यावे. या पोर्टलवरील कार्यप्रणालीच्या माहितीसाठी ई-डिस्ट्रीक्ट प्रोजेक्टचे जिल्हा मॅनेजर उमेश घुग्‍गुसकर यांच्याशी संपर्क साधावा. वेबपोर्टलवरील तक्रारींची मुख्यमंत्री कार्यालयातर्फे जातीने लक्ष घालण्यात येत आहे. त्यामुळे विभाग प्रमुखांनी आपल्या कार्यालयांशी संबंधित तक्रारी श्री. घुग्गुसकर यांच्याकडून जाणून घ्याव्यात. या तक्रारी तात्काळ निकाली काढण्यासाठी सर्व विभागांनी तातडीने कारवाई करावी.
आज पोलिओ महिमेचा दुसरा टप्पा *बालकांच्या आधार नोंदणीसाठी 85 संच यवतमाळ,   दि. 1   :   पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेचा दुसरा टप्पा रविवारी, दि. 2 एप्रिल रोजी राबविण्यात येत आहे. यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा सज्ज झाली आहे. या मोहिमेंतर्गत बालकांच्या आधार नोंदणीसाठी प्रशासनाने 85 संच उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्ह्यात ग्रामीण 2 हजार 352 आणि शहरी 285 असे एकूण 2 हजार 637 बुथ, तसेच ग्रामीण 215 आणि शहरी 88 असे एकूण 303 ट्रांझिस्‍ट टीम आणि ग्रामीण 117 आणि शहरी 10 असे एकूण 127 मोबाईल   टीमद्वारे जिल्ह्यातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील एकूण अपेक्षित लाभार्थी ग्रामीण 1 लाख 94 हजार 217 आणि शहरी 57 हजार 299 असे एकूण 2 लाख 51 हजार 516 बालकांना पोलिओ लस पाजण्यात येणार आहे. ज्या बालकांना पल्स पोलिओ बुथवर काही कारणास्तव पोलिओ लस पाजण्यात आली नाही, अशा लाभार्थ्यांचा गृहभेटीद्वारे कर्मचाऱ्यांमार्फत शोध घेऊन पोलिओ लस पाजण्यात येणार आहे. जिल्ह्यातील गाव वाडी, पोड, पाडा, तांडा, मळा, यात्रा, बाजार, बस थांबा तसेच प्रवासातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा परि ष दे