जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन
यवतमाळ, दि. 27 : ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात मराठी भाषा गौरव दिन म्हणून आज साजरा करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, डॉ. नितीन व्यवहारे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काटपेल्लीवार उपस्थित होते.
श्री. खवले यांनी मराठी भाषेचा वापर वाढविणे आवश्यक असल्याचे सांगितले. राज्यात मराठी भाषा रूजावी, तिचे संवर्धन होणे गरजेचे आहे. त्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमात अव्वल कारकुन भारती झाडे यांनी मराठी भाषेचे महत्व समजावून सांगितले. शालिनी बुटले यांनी कविता सादर केली. कार्यक्रमाला जिल्हाधिकरी कार्यलयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000
आरटीई अंतर्गत प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ
*2 मार्चपर्यंत करता येणार अर्ज
यवतमाळ, दि. 27 : शिक्षणाचा हक्क अंतर्गत दुर्बल व वंचित घटकांसाठी 25 टक्के राखीव जागांवर ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी 2 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
सन 2016-17 या वर्षासाठी संपूर्ण राज्यात 16 जानेवारीपासून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यात जिल्ह्यातील 25 टक्के प्रवेशपात्र 193 शाळांची नोंदणी करण्यात आली आहे. यात 25 टक्के प्रवेशांतर्गत नर्सरीसाठी 1 हजार 94 जागा, तसेच पहिलीसाठी 647 अशा एकूण 1 हजार 741 जागा राखीव आहेत. शाळा नोंदणीनंतर पालकांना student.maharashtra.gov.in/admportal/Users/rteindex या वेबसाईटवर 25 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करावे लागत होते. यात 2 हजार 817 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरले आहेत. याबाबत पालक आणि पालक संघटनांनी केलेल्या मागणीनुसार ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 2 मार्च पर्यंत वाढविण्यात आली आहे. या अंतिम मुदतीत पालकांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी केले आहे.
00000
67 रेतीघाटासाठी 1 मार्चला बैठक
यवतमाळ, दि. 27: जिल्ह्यातील सन 2016-17 साठी 106 रेतीघाटाचा लिलाव करण्यात आला आहे. यानंतर शिल्लक राहिलेल्या 70 रेतीघाटासाठी 1 फेब्रुवारी रोजी बैठक घेण्यात आली. यातूनही शिल्लक राहिलेल्या 67 रेतीघाटाचा देकार देण्यासाठी बुधवारी, दि. 1 मार्च रोजी दुपारी तीन वाजता अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक घेण्यात येणार आहे.
या बैठकीला शासकीय विभागांतर्गत कार्यरत असलेल्या तसेच रेतीघाट घेण्यास इच्छुक असलेल्या अहर्ताप्राप्त कंत्राटदारांनी बैठकीला उपस्थित राहावे. या 67 रेतीघाटांची माहिती www.yavatmal.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ, उपविभागीय अधिकारी आणि तहसिल कार्यालयात उपलब्ध आहे.
00000
अनुसूचित जातीसाठी सैन्य, पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण
            यवतमाळ, ता. 27 : जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील युवक, युवतींसाठी सैन्य व पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार आहे. अटी व शर्तींची पुर्तता करणाऱ्या युवकांनी 3 मार्च 2017 पर्यंत समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांच्याकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
            या योजनेंतर्गत जिल्ह्यातील उमेदवारांची चाचणी घेऊन 70 युवक आणि 30 युवती अशा एकूण 100 पात्र उमेदवारांना अमरावती येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात पाठविण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष उपस्थित राहून विहित नमुन्यातील अर्ज सादर करावेत, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी