कृषि अवजारांची खरेदी थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने
यवतमाळ, दि. 5 : जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाच्यावतीने विशेष घटक योजनाआदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील तसेच सेस फंड योजनेंतर्गत करण्यात येणारी कृषि साहित्य खरेदी संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाने कळविले आहे.
कृषि आयुक्तांच्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे शासन निर्णयात समाविष्ठ उत्पादकांच्या अधिकृत विक्रेत्यांकडून अथवा कृषि उद्योग विकास महामंडळाकडून तांत्रिक निकष असलेली सदर तांत्रिक निकषात कमी नसलेल्या निकषाची अवजारे खरेदी करण्याची मुभा आहे. या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे लाभार्थ्यांनी बाजारातून अवजाराची खरेदी केल्यानंतर देयकाची एक प्रत पंचायत समितीत सादर करावयाची आहे. सदर अवजारांची तपासणी केल्यानंतर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पंधरा दिवसात जमा केली जाणार आहे.
ज्या मंजूर शेतकऱ्यांनी जानेवारी ते मार्च 2017 या काळात पुर्ण किंमत भरून अवजारांची खरेदी केली नाही ते शेतकरी कृषि उद्योग विकास महामंडळाच्या विक्री कार्यालयाकडून अवजारांची फक्त लाभार्थी रक्कम भरून अवजारे विकत घेऊ शकतात, तशी मुभा देण्यात आलेली आहे. अशा प्रकरणी शेतकऱ्यांची अनुदानाची रक्कम कृषि उद्योग विकास महामंडळाला दिली जाणार आहे. सदर प्रक्रीया थेट लाभ हस्तांतरण पध्दतीने होत आहे. थेट लाभ हस्तांतरण ऐवजी जुन्या पध्दतीने महामंडळाकडून साहित्य खरेदी करण्याबाबत कोणत्याही प्रकारचे निर्देश देण्यात आलेले नाहीत, असे जिपचे उपाध्यक्ष तथा कृषि सभापती व कृषि विकास अधिकारी द.रा.कळसाईत यांनी कळविले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी