लोकशाही दिनाच्या तक्रारी आपले सरकार पोर्टलवर
यवतमाळ, दि. 3 :  राज्य शासनाने नागरीकांच्या तक्रारी ऑनलाईन नोंदविण्यासाठी आपले सरकार वेबपोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर आता लोकशाही दिनाच्या तक्रारी नोंदविण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आज बचत भवनात जिल्हास्तरीय लोकशाही दिन घेण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी याबाबत माहिती दिली. राज्य शासनाने आपले सरकार हे वेबपोर्टल नागरीकांच्या तक्रारी मांडण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. लोकशाही दिन हे एक ठिकाण असले तरी याठिकाणी मांडण्यात येणाऱ्या प्रत्येक समस्या आणि त्यावरील उत्तर आपले सरकार या वेबपोर्टलवर नोंदविण्यात यावे. या पोर्टलवरील कार्यप्रणालीच्या माहितीसाठी ई-डिस्ट्रीक्ट प्रोजेक्टचे जिल्हा मॅनेजर उमेश घुग्‍गुसकर यांच्याशी संपर्क साधावा. वेबपोर्टलवरील तक्रारींची मुख्यमंत्री कार्यालयातर्फे जातीने लक्ष घालण्यात येत आहे. त्यामुळे विभाग प्रमुखांनी आपल्या कार्यालयांशी संबंधित तक्रारी श्री. घुग्गुसकर यांच्याकडून जाणून घ्याव्यात. या तक्रारी तात्काळ निकाली काढण्यासाठी सर्व विभागांनी तातडीने कारवाई करावी.
आपले सरकार वेबपोर्टलवरील तक्रारींची माहिती संबंधित कार्यालयांना माहिती व्हावी, यासाठी प्रत्येक कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला प्रशिक्षण देण्यात येणार आहे. वेबपोर्टलवरील तक्रारींचे तातडीने उत्तर देण्यात यावे. हे उत्तर सिस्टीमवर कायमस्वरूपी दिसणार आहे. त्यामुळे विभागप्रमुखांनी या तक्रारी तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्री. खवले यांनी केले.
00000
मध्यस्थी जाणीव जागृती कार्यक्रम साजरा
*जिल्हा विधी सेवा सेवा प्राधिकरणाचा पुढाकार
यवतमाळ, दि. 3 :  जिल्हा विधी सेवा सेवा प्राधिकरणातर्फे येथील जिल्हा न्यायालयात मध्यस्थी जाणीव जागृती कार्यक्रम शनिवारी, दि. 1 एप्रिल रोजी साजरा करण्यात आला.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. सी. मोरे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा न्यायाधीश ए. टी. वानखेडे, ए. एस. वाघमारे, पी. एस. खुणे, एम. मोहिउद्दीन एम. ए. जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष राजेंद्र धात्रक, जिल्हा सरकारी वकील एन. एन. दवे आदी उपस्थित होते.
एम. मोहिउद्दीन एम. ए. यांनी न्यायालयांवरील प्रलंबित प्रकरणांचा ताण कमी करण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण न्याय निवाड्यासाठी ज्या प्रकरणांमध्ये मध्यस्थीद्वारे तडजोड शक्य असेल ती प्रकरणे मध्यस्थांकडे पाठविण्याबाबत मार्गदर्शन केले. श्री. खुणे यांनी मध्यस्थीमध्ये न्यायाधीश, वकील आणि पक्षकारांची भूमिका समजावून सांगितली. वैकल्पिक वाद निवारण केंद्रामधील व्यवस्था आणि मध्यस्थी प्रक्रियेदरम्यान पक्षकारांनी मध्यस्थाला सांगितलेली माहिती न्यायालयीन प्रक्रियेमध्ये उघड केली जात नाही. त्यामुळे पक्षकारांनी विश्वासाने मध्यस्थी प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले.सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती एन. के. पाटील यांनी पक्षकारांनी स्विकारण्यायोग्य वाटेल असा तडजोडीचा मुद्दा न्यायालयाच्या निदर्शास आल्यास कशाप्रकारे लवाद, समुपदेशन, लोकअदालत, मध्यस्थ यांच्याकडे पाठविता येईल, तसेच या संदर्भातील न्यायनिवाड्यांच्‍या आधारे विश्लेषन केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस. एम. आगरकर यांनी यावर्षीचा मध्यस्थी कृती आराखड्याबाबत माहिती दिली. यासाठी येत्या वर्षात कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक बी. एम. बेतवार यांनी सूत्रसंचालन केले. सहदिवाणी न्यायाधीश निलम पेठे यांनी आभार मानले.
00000
अन्नधान्याचे परिमाण, दर जाहिर
            यवतमाळ, दि. 3 : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरीत करण्यात येणाऱ्या एप्रिल महिन्यासाठी अन्नधान्याचे परिमाण आणि दर जाहिर करण्यात आले आहे. लाभार्थ्यांना त्यांच्या कोट्याप्रमाणे निर्धारीत अन्नधान्य पुरविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले  आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत गहु, तांदूळ, साखर, तूरडाळ, केरोसीन आदींचा पुरवठा करण्यात येतो. त्यानुसार बीपीएल, अंत्योदय योजना, अन्नपुर्णा योजना, एपीएल, एपीएल शेतकरी आणि कल्याणकारी संस्था, वसतीगृहांना पुरवठा करावयाच्या अन्नधान्याच्या परिमाणाचा यात समावेश आहे. वस्तूनिहाय दर व देय परिमाण जाहिर करण्यात आले असून त्यानुसार वाटप करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसिलदारांना दिल्या आहे.
00000
केरोसीन परवान्यासाठी अर्ज आमंत्रित
*स्वयंसहायता गटांना देण्याचा निर्णय
यवतमाळ, दि. 3 : जिल्ह्यातील गावांमध्ये किरकोळ केरोसीन परवाना आणि रास्तभाव दुकार मंजूर करावयाचे आहे. त्यासाठी महिला स्वयंसहाय्यता गटाकडून दिनांक 24 एप्रिलपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे.
किरकोळ केरोसीन परवाना मंजुर करावयाचे आहेत, त्या गावांची नाव खालीलप्रमाणे आहेत.
महागांव तालुक्यासाठी चिलगव्हाण, काऊरवाडी, महागाव शारदा बचत गट, महागाव पोदुतवार, धारकान्हा, हिवळणी, पिंपरी, चिंचोली, टेंभी (आमीलकंठवार) हिंगणी, साधुनगर, सारकिन्ही, सोवादासनगर, वाडी अंबोडा.
पुसद तालुका पालुवाडी, वेणी खु,, चिलवाडी, मुंगशी, अमृतनगर, हर्षी, घाटोडी, वसंतपुर, पुसद, वार्ड क्रमांक ३७, आदर्शनगर पुसद, शिवाजीनगर, पाळोदी, चिकणी, बाळवाडी, धरमवाडी, हौसावार, मरसुळ, नानंद ई., मोख, जवळा, जामनाईक क्र. २, मनसळ, लाभीवंतनगर, वामनवाडी, वरूड, वसंतवाडी, बेलोना, पुसद वार्ड क्र. १५, पुसद वार्ड क्र. १८, पुसद वार्ड क्र. १९, वडसर, देवकारला, गौळ बु., ईनापुर, सेवादासनगर, रंभा.
वणी तालुका विठ्ठलनगर, दहेगांव डोह, रासा-१, कुंभारखणी, साखरा को., टाकळी, चणाखा, परमडोह, पाथरी, मुर्ती, कवडसी, कुंड्रा, हिवरधरा, भुरकी, गोवारी नि., देऊरवाडा, तेजापूर-२, आमलोन, गाडेघाट, वारगांव, शिदोला, येनक, शिवणी, पिल्की वाढोणा, महाकालपूर, पठारपूर, पिंप्री-को., ब्राम्हणी, बोरगाव मे., लाठी, सावर्ला, निलजई, निवली, घोपटाळा, केसुली, कौरंबी, जुगाद, माथोली.
घाटजी तालुका जरूर, घाटंजी (खाडरें), बिलायता, दहेगाव, ठाणेगाव, डांगरगाव, टिपेश्वर, जुनोनी, टिटवी, नागेझरी, आंबेझरी, देवधरी, घोटी, कोपरी का./ कापशी, जांब, चिखलवर्धा, रामपूर, केळापूर, (रत्नापूर), दत्तापूर, रायसा, माणुसधरी, चांदापूर/चिंचोली/लिंगी, कोळी बु., मांजरी, ताडसावळी.
केळापूर तालुका बल्लारपूर, कृष्णापूर, सालबर्डी, कारेगांव बंडल, पांढरकवडा (रापर्तीवार), पांढरकवडा (सुराना) मोहदरी, मोहदा (अग्रवाल), पेंढरी, टोपन, सिंगलदिप, धारणा, वंसतनगर, खातारा, खैरगांव खु., घनममोड, वेडद, साखरा बु., दर्यापूर, सनई, ढोकी वाई, कोंढी, अंभोरा, वडनेर, झुझारपूर. वाढोणा बु,, वाढोणा खु,, मारेगाव सोनबर्डी, पढा, लिपी, सायखेडा, निलजई, नांदगाव, गोंडवाकडी, पिंपळापूर, सुकळी, वडवाट, अंधारवाडी, जिरा, सखी बु.
झरीजामणी तालुका टाकळी, पाटण, चिखलडोह, पांढरकवडा, अर्धवन, कमलापूर, मांगली, मुकुटबन – २, खडकडोह.
बाभुळगाव तालुका बाभुळगाव-१, बाभुळगाव-२, बाभुळगाव-३, बाभुळगाव-४, बाभुळगाव-५, बाभुळगाव-६, बाभुळगाव-७, बाभुळगाव-८, राणी अमरावती, यावली, पहुर-१, पहुर-२, गळव्हा, बागापूर, उमरी, उमरडा, वीरखेड, घारफळ, कोपरा-१, प्रतापपूर, पालोती, कोपरा बारड, पानस, मांगुळ, लोणी, नांदुरा खु., कुष्णापूर.
उमरखेड तालुका दराटी-१, दराटी-२, चातारी, कळमुला, वाणेगांव, दत्तनगर, टाकळी बंडी, सिंदगी, साजेगाव, कोरटा, सोनदाभी-१, सोनदाभी-२, उमरखेड-१ उमरखेड-२.
राळेगांव तालुका विजय नरमशेट्टीवार राळेगाव, न. गी. पोपट राळेगाव, रा. मा. नुन्नेवार राळेगाव, बोरी, मेगापूर, इचोरा, संगम, इजापूर, वाठोडा, चिंचोली, बरडगांव, चिकना, कोपरी, एकबुर्जी, भांब, मांडवा, गोपालनगर, रोहणी, रानवड, पार्डी, उमरेड, दहेगांव, बोरी, सावित्री पिंप्री, गाडेघाट, वाढोणा बाजार (खाडे), देखमुख राळेगाव, डायालाल कारीया राळेगाव, वडगाव, नागठाणा.
यवतमाळ तालुका भारी, बांगरनगर यवतमाळ, चिचघाट, शंकर तोदी यवतमाळ, कोळंबी हिवरी, भाकरे यवतमाळ, मिश्रा यवतमाळ, प्राजळे यवतमाळ, टाकळी, राठी यवतमाळ, शफाकत अली रूई, राजा रुई.
कळंब तालुका धनोडी, सावळपूर, म्हसोला, आंधबोरी, कात्री, कारक, दुर्ग, पिंपळखुटी, आलोडा, सोनखास, गलमगाव, वंडली, महितापूर, तिरझडा, हिरापूर, मुरादपूर, निलज, खुटाळा, खुदावंतपूर, तुळजापूर, शेळी, खोरद खुर्द, तासलोट, खटेश्वर, उमरगाव, पिठा, पिंपळखुटी, सोनखास, प्रधानबोरी, पिलखाना, रजवानी, डोंगरखर्डा, मुसळ, निमगव्हाण, खडकी, कुसळ, धोत्रा, जयस्वाल पोटगव्हाण, किनवट,
आर्णी तालुका लोणबेहळ, आसेगांवकर देऊरवाडी पु., दोनवडा, बोरगाव दा., केळझरा वरठी, जवळा, सुकळी, कोळवण, लिंगी, इवळेश्वर, चिमटा, बीड, काकडदरा, जलांद्री.
दिग्रस तालुका बेलोरा, बोरी पुर्नवसन, देऊरवाडा, लाखरायजी, संगोई दिग्रस वार्ड क्र. १६. राठी दिग्रस वार्ड क्र.१८ दिग्रस वार्ड क्र. 9
 मारेगाव तालुका किन्हाळा, रोहपट-२, कान्हाळगांव, मुक्ता दांडगाव, लाखापूर गवराळा, वसंतनगर, आपटी, डोल डोंगरगांव, सावंगी बोरी बु., साखरा, जळका, कुंभा- १, कुंभा-२, नवरगाव-२, वागदरा, घोडदरा, मारेगाव-१, मारेगाव-२, खैरगाव-२.
नेर तालुका पेढारा, पिंप्री कलगा, लोणी, मोझर, सिंगवी, पिंप्री ई., नेर प्रभुदास बुध्ददेव. या गावासाठी परवाने मंजूर करावयाचे आहेत.
सबंधित गावातील महिला बचतगटच अर्ज करु शकतील. इच्छूक गटांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 24 एप्रिलपर्यंत संबंधित तहसील कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.
00000
उन्हाळी जलतरण शिबीर सुरु
यवतमाळ दि. 3 : यवतमाळ येथील जिल्हा क्रीडा संकुल समिती अंतर्गत आझाद मैदानातील जलतरण तलाव येथे उन्हाळी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबीरात नियमित सराव करणाऱ्यांसोबत नवीन पोहणाऱ्यांकरीता सर्वसुविधायुक्त अद्यावत जलतरण तलाव उपलब्ध करून देण्यात आला आहे. याठिकाणी नवीन पोहणाऱ्यांसाठी प्रशिक्षक आणि जीवन रक्षकांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. उन्हाळी क्रीडा जलतरण प्रशिक्षण शिबीराचे आयोजन 1 एप्रिलपासून सुरु करण्यात आले आहे. सकाळी आणि सायंकाळी अशा दोन सत्रात हे प्रशिक्षण शिबीर सुरु राहणार आहे. महिलांसाठी या दोन्ही सत्रात वेळ राखीव ठेवण्यात आली आहे. सकाळी 5 ते 5.45 आणि सायंकाळी 4 ते 4.45 या वेळा राखीव ठेवण्यात आल्या आहे.
सकाळी 6 ते 9.45 आणि सायंकाळी 5 ते 8.45 पर्यंत प्रत्येकी 45 मिनीटांची जलतरण बॅच सुरू करण्यात आली आहे. प्रशिक्षणसाठी तज्ज्ञ मार्गदर्शक, जीवरक्षक, फिल्ट्रेशन प्लाँट ऑपरेटर यांची सेवा घेण्यात आली आहे. तसेच परिसरात प्रकाशझोताची व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी गोधणी रोड येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदिप शेटीये यांनी केले आहे.
000000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी